साधारण १९६० साली राजकपूरचा हिन्दी चित्रपट आला होता, ’जिस देशमे गंगा बहती है’ त्यात राजकपूर एक वाक्य म्हणतो आमच्या भारत देशात भिकार्याला सुद्धा भीक द्यायची नसेल तर आम्ही म्हणतो,"बाबा, माफ कर." त्याचीही आम्ही माफी मागतो. लक्षांत घ्या I am sorry किंवा मला माफ करा हे शब्द आयुष्यात फार महत्वाचे आहेत. क्षमा मागायला सुद्धा फार मोठे मन लागते. कोणालाही ते जमत नाही. त्याचा आणि शिक्षणाचा सुद्धा संबंध नाही. रस्त्याने जाताना चुकून धक्का लागला तर फक्त म्हणा sorry बघा काय चमत्कार घडतो, नाहीतर महाभारतच. कधी कधी समोरासमोर माफी मागणे जड जाते, अहंकार दुखावतो, नंतर फोनवर माफी मागा, गुलाबाचे फूल किंवा बुके पाठवा परिणाम चांगला होईल. क्षमा मागणे म्हणजे कमीपणा नाही तर तो मनाचा मोठेणा दर्शवतो.
माझ्या माहितीत एक कुटुंब होते, अगदी सुखी. एकदा काय झाले याच्या आवडीची भाजी तिने केली नाही म्हणून त्यांच्यात शाब्दिक वाद झाले, दोघांनीही अबोला धरला. त्यांच्यात प्रश्न पडला, पहिल्यांदा कोणी बोलायचे, कोणीही माफी मागायला तयार नाही. कित्येक वर्षे हा संसार चालला होता. पण ते एकमेकांची सुखदुःखेसुद्धा जाणून घेत नसत. नंतर पुन्हा काही रागाने तो घर सोडून निघून गेला, तर तिने साधी चौकशी सुद्धा केली नाही. त्याचे बाहेर फार हाल झाले. नंतर तो खलास झाला पण ती त्याला बघायला सुद्धा गेली नाही. संसाराचे वाटोळे झाले. पण त्याच वेळेस कोणीतरी माफी मागितली असती तर ? जैन धर्मात क्षमायाचना दिन पाळतात. या दिवशी शांतपणे विचार करून झालेल्या चुकांबद्दल माफी मागायची असते.
लक्षांत घ्या आपण केलेल्या चुकांची आपल्याला जाणीव होते, मनातल्या मनात आपल्याला ते बोचते, पण आपण ते उघड करू शकत नाही, मग आपल्याला त्रास होतो त्यापेक्षा उघड माफी, क्षमा मागून बघा मनावरील किती ओझे हलके होते ते. I am sorry हे शब्द जीवन बदलतात.
रात्री अंथरुणावर झोपायच्या आधी हात जोडून म्हणा," मी माझ्या पवित्र आत्म्याने, सर्व आत्म्यांची माफी मागत आहे. जर दिवसभरात माझ्याकडून काही चुक झाली असल्यास अथवा कोणी दुखावले गेले असल्यास मला, माझ्या आत्म्याला क्षमा करावी"
No comments:
Post a Comment