संवय

आपल्या आयुष्यातील सर्वात कंटाळवाणा काळ कोणता तर कोणाची तरी वाट पाहणे. समजा कोणीतरी आपल्याला भेटायला एका ठिकाणी बोलावले आहे, आणि आपण त्याठिकाणी वेळेवर पोहोचतो, पण पलिकडचा इसम वेळेवर येत नाही, अशी चिडचिड होते पण आपण काही करू शकत नाही. बरं जाता पण येत नाही. काय करणार? अशा वेळेस एक उपाय असतो. प्रथम मनाचे समाधान करून घ्या, अरे तो ट्रॅफीक मध्ये अडकला असेल तर तो बिचारा काय करणार? बरं अशी वेळ आपल्यावर आली असती, आणि तो वाट पहात असता तर? बघा लगेच चिडचिड कमी होते की नाही. डॉक्टरची, वकीलाची वेळा ठरवून आपण त्यांच्याकडे जातो पण तेथेही वाट पहावे लागते, पण पर्याय नसल्याने स्वतःशीच चिडतो, अशा वेळेस जातानाच विचार करून जा की, तेथे आपल्या थांबावे लागणार आहे आहे तेव्हा एखादे पुस्तक वाचायला न्या, मग बघा कसे बरे वाटते. आजूबाजूचे लोक त्रासिक चेहरा करतात पण आपण मात्र ऐटीत पुस्तक वाचत असतो, मजा येते. त्यासाठी मी एक युक्ती केलीय. मी घरी रोज सकाळ आणि पुढारी दैनिके घेतो, ती वाचल्यावर दुसर्‍या दिवशी त्यातील विनोद कापून एका वहीत चिकटवून ठेवतो, रोज दोन तीन प्रमाणे आता कितीतरी विनोद जमलेत, जेव्हा वेळ जात नाही तेव्हा ही वही कामाला येते. घरात ही वही टी पॉय ठेवली आहे, पाहुणे आले की, प्रतिक्षेच्या वेळेत त्यांचाही वेळ चांगला जातो.

जर कोणाचा आपल्या मोबाईलवर मिस कॉल आला तर रागवायचे नाही, विचार करायचा अरे त्याला वाटत असेल याला वेळ आहे की नाही? मग आपण काय करायचे न रागवता उलट त्याला मिस कॉल द्यायचा, आणि सूचित करायचे मला वेळ आहे फोन कर.

सकाळी उठल्यावर काही जणांना अंथरुणात लोळण्याची संवय असते. पण लक्षात घ्या हा वेळ कारणी लागत नाही, विनाकारण वाया जातो. जाग आल्या बरोबर ताबडतोब उठा आणि मग बघा कसा अर्धा तास वाचतो ते. पहिल्यांदा नको वाटेल पण मग संवय होईल. लोळण्यातून काही साध्य होत नाही. उलट आळस वाढतो. ही वेळ आपल्या दिवसभराच्या कामाच्या नियोजनासाठी वापरता येईल. कारण सकाळी मेंदू ताजातवाना असतो. भराभर निर्णय होतात. हीच वेळ आपल्यासाठी असते, बाकी दिवसभर आपण कोणासाठी तरी मेंदू वापरत असतो. हा एक तास वाचवून आपल्याला दिवस पंचवीस तासांचा करता येतो.

Unknown

No comments: