पुण्यात १३-२ ला बॉम्बस्फोट झाला. १७ जणांना प्राण गमवावे लागले. त्या आरोपींचा अद्यापही तपास लागलेला नाही. कोणीही बहुतेक मनावर घेत नाहीत. किती गंभीर घटना आहे. पण कुणाला काय त्याचे. बरे दहशतवादी सापडले तरी पुढे काय? हा प्रश्न असतोच. त्यांना पकडल्यावर त्यांची खातीरदारी सुरू. त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रचंड पैसा खर्च होणार. खटला चालणार, आणि जर त्याचा निकाल जेव्हा केव्हा पाच दहा वर्षांनी लागेल तो पर्यंत त्याच्या सुरक्षेबद्दल पोलीसांचा जीव टांगणीवर. बरे खटल्याचा निकाल लागल्यावर तरी काय? मागील फाशीची शिक्षा झालेले आरोपी अजूनही तुरूंगात मजेत आहेत. काय गौडबंगाल आहे कळत नाही. त्यांच्या शिक्षेची अंमलबजावणीच होत नाही. आता हे नवीन कैदी आले तर त्यांचा खर्च सुरू. आता एका कसाबवर किती पैसे खर्च होतायत. किती कोर्टाचे तास वाया जात आहेत. वाया याचा अर्थ असा यातून काय निष्पन्न होणार आहे. त्यापेक्षा त्याला गोळ्या लागल्या असत्या तर बरे झाले असते. नंतर तो तुरूंगात मजाच करणार ना?
कालच नक्षलवाद्यांनी छत्तीसगडच्या दंतेवाडा भागात केंद्रीय राखीव दलाच्या गस्ती पथकावर बेछूट गोळीबार करून, ७६ जवानांना मारले, ते शहीद झाले. पण असे का व्हावे? देशातील हा आजवरचा सर्वात मोठा हल्ला आहे. नक्षलवाद्यांची एवढी हिम्मत झालीच कशी? त्यांच्यावर आतापर्यंत का कारवाई झाली नाही? काही नाही भारतात मरण स्वस्त झाले आहे. सर्वात जास्त कोण मारत असेल तर, सरकारच. काय महागाई झाली आहे. दहशतवादी एकदाच मारतात, पण महागाई, भ्रष्टाचारा रोजच थोडेथोडे स्लो पॉईझनिंग करत आहे, भारतीय जनता रोजच मरणकळा सोसत आहे.
No comments:
Post a Comment