I.P.L.

पूर्वीच्या काळी गावोगावी बाजार भरत असे आणि त्या बाजारात कोंबडे, बकरे एवढेच काय पैलवानही विक्रीला ठेवत. खरेदी करणारा काय करीत असे तर त्यांना खरेदी करून त्यांची एकमेकात झुंज लावत असत, त्यावर मग बोलीही लागायची. ज्यांच्यात झुंज असे तो कोठला याला काहीही किंमत नसे. झुंज लावणारे झुंज बघायला प्रेक्षकांकडून पैसे घेत. आता जी भारतात I.P.L. क्रिकेट स्पर्धा गाजते आहे, तो काय प्रकार आहे, ह्याच झुंजीचा ना? खेळाडूंची कोणीतरी लिलावाप्रमाणे बोली लावतो, आणि तो खेळाडू सर्व मान अपमान कंबरेला गुंडाळून त्या त्या मालकाकडून खेळतो. जे खेळाडू आधी देशाकडून खेळत, तेच स्वाभिमान विसरून झुंज खेळत आहेत. कोंबड्यांच्या झुंजीची कल्पना करा, आणि त्याची  I.P.L. शी तुलना करा, कोंबड्यांची झुंज तरी बरी वाटेल.

या I.P.L. मुळे भारताचे राजकारण ढवळून निघाले आहे. परदेशी खेळाडू कोट्यावधी रूपये कमावत आहेत आणि आपण भारतीय काळ्या बाजारात तिकीटे घेऊन सामन्यांसाठी गर्दी करतो, टी.व्ही.जवळ बसून तासन्‍तास खर्ची घालतो. देशाभिमान नाहीच. केवळ कोंबड्याच्या झुंजीची मजा. 

एक प्रसिद्ध बाबा म्हणाले, हा पैसा जर काळ्याबाजारातून, स्विस बॅंकेतून येत असेल, आणि आपल्या खेळाडूंना मिळत असेल तर मिळू देत ना? राजकारणी जो पैसा स्विस बॅंकेतून आणू शकले नाहीत, तो पैसा या निमीत्ताने जर भारतातील खेळाडूंना मिळत असेल तर काय बिघडले?  

उलट या झूंजी सरकारमान्य करा, त्यावर कर लावा, करमणूक कर लावा, आणि पैसा कमवा. असेच प्रकार दुसर्‍या क्षेत्रातही चालू करा.

Unknown

No comments: