ऑक्सिजन शिवाय

ऑक्सिजनशिवाय जिवंत राहणारे आणि प्रजनन करणारे प्राणी शास्त्रज्ञांना सापडले आहेत. हे प्राणी भूमध्य समुद्राच्या तळाशी असलेल्या जमिनीवर राहतात. इटलीतील  अ‍ॅक्नोना विद्यापीठातील शास्त्रज्ञ रॉबर्टो डॅनोव्हारो यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन करण्यात आले. त्यांनी लॉरिसीफेरा समूहातील तीन नव्या प्रजाती शोधून काढल्या आहेत. त्यांनी सांगितले की हे प्राणी आकाराने एक मिलीमीटर असून ते कवचधारी आहेत.

कवचात ते जेलीफीशसारखे दिसतात. त्यांच्यावर अधिक संशोधन केल्यावर त्यांना आढळून आले, की हे प्राणी ऑक्सिजनशिवाय जिवंत आहेत. या तीन प्रजातींपैकी एका प्रजातीला स्पिनोलोरिकस सिंझिया असे नाव देण्यात आले आहे. तर इतर दोन प्राण्यांना रूलीलोरीकस आणि प्लीसिलोरिकस अशी नावे देण्यात आली आहेत. आजपर्यंत केवळ जीवाणू म्हणजे बॅक्टेरियाच ऑक्सिजनशिवाय राहू शकतात, अशी समजूत होती. परंतु निसर्गाने ही समजूत खोटी ठरवली आहे. इतक्या वर्षांनंतरही अजूनही नवनवीन चमत्कार निसर्गात सापडत आहेत, म्हणजे अजूनही मानव भटकत आहे. पण आता हे  प्राणी ऑक्सिजनशिवाय कसे जिवंत राहू शकतात हे शोधून काढण्यात शास्त्रज्ञ गुंतले आहेत. शिवाय अजून एक चमत्कार म्हणजे हे प्राणी अंडी देत असल्याचे आढळून आले आहे.

आता आम्ही असा विचार करतो की, ते प्राणी पेशींपासूनच बनले असतील ना? मग त्या पेशी ऑक्सिजनशिवाय कसे चलनवलन करतात. त्यांच्या शरीरातील अवयव कसे काम करत असतील? ते दुसरा कुठलातरी वायू शोषून घेत असतील काय? प्रयोगशाळेत त्यांच्या पेशींची वाढ करून त्यांच्यापासून मनुष्य प्राणी निर्माण केले तर? (क्लोन). मानवाला दुसर्‍या ग्रहांवर जाण्याचा मार्ग मोकळा होईल.

याबद्दल सखोल संशोधन करता येईल. मी माझ्या प्रयोगशाळेत हा प्रयोग करणार.

( शास्त्रज्ञाचे मनोगत)

Unknown

No comments: