पुनः स्वाईन फ्लू

साधारण २००९च्या सुमारास जगात स्वाईन-फ्लूने आपली मस्ती सुरू केली, आणि त्याची लागण भारताही झाली. जागतीक आरोग्य संघटनेने जगाला सावध केले. डॉक्टरांनी लोकांना घाबरवून सोडले. तेव्हा साधं सर्दी पडसे झाले तरी नाना शंका यायच्या आणि लोक तोंड झाकून घेत. प्रत्येकजण घाबरलेला होता. खूप गाजावाजा झाला. भयावह चित्र निर्माण केले गेले. परवाच एका बातमीत W.H.O. संघटनेचे आग्नेय आशियाचे संचालक सॅमली पियानबांग यांनी कबूल केलेकी लोकांच्या मनात भिती निर्माण करायला W.H.O. च  कारणीभूत आहे. जगातील एक तॄतीयांश लोकांना बाधा होईल असे W.H.O.ने जाहीर केले, पणा काय झाले रोगाची तीव्रता दिवसेदिवस कमीकमी होत गेली.आज या स्वाईन फ्लूची स्थिती काय आहे. कुठे गेली ती भिती. भारतातील १२० कोटींच्या देशात केवळ ३० हजार रूग्ण आढळून आले, त्यापैकी १४६५ जणांचा मृत्यु झाला.
स्वाईन फ्लूचा बागुलबुवा उभा करून डॉक्टरांनी आणि औषध कंपन्यांनी भरमसाठ फायदा लुटण्याचे कारस्थान W.H.O.च्या मदतीने तर केले नसेल ना? का शंका येऊ नये? यात फक्त औषध कंपन्यांचे उखळ पांढरे झाले. भविष्यातील अतिरंजीत, भितीदायक चित्र रंगवून बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून भारताने सुमारे दीड अब्ज डोस आयात केले, ते तसेच पडून आहेत. अशा किती देशात या औषध कंपन्यांनी धंदा केला असेल. शिवाय टॅमी फल्यूचा झटका वेगळाच.

Unknown

No comments: