मन्नाडे

गायक मन्नाडेंना त्यांच्या ९० व्या वर्षी दादासाहेब फाळके पुरस्कार २००७ सालासाठी जाहीर झाला हे ऐकून  किती बरे वाटले. नाही म्हणजे भारत सरकार जागे होईल का नाही हा चिचारच मनाला खात होता.

मन्नादांनी ३५०० पेक्षाही जास्त गाणी गायली आहेत, त्यात सर्वात जास्त शास्त्रीय संगीतावर आधारलेली गायली म्हणून त्यांना तोच ठपका बसला, पण खरेतर असे नाही.

त्यांचे ’ ए मेरी जोहराजबी ’ हे रांगडे प्रीतीगीत ऐका, किंवा ’ ये रात भिगी भिगी ’ हे गाणे ऐका, आणि विचार करा दुसर्‍या गायकाच्या तोंडी हे गाणे शोभेल काय? ’ ए मेरी जोहराजबी ’ मध्ये तो जेव्हा म्हणतो ना ’ तुझपे कुर्बान मेरी जान मेरी जान मेरी जान’ अक्षरशः अंगावर रोमांच उभे राहतात. ’ एक चतुर नार ’ का यात धमाल नाही?’ आठवा शास्त्रीय संगीत पण विनोदी ढंगानं ’ फूल गेंदवा न मारो, न मारो, लगत करेजवामे चोट’

मन्नाडे म्हणजे समाधान मानणारे गायक. उगीच कुणाशीही वाद घालणे त्यांना पसंद नव्हते. त्यांनी तमन्ना चित्रपटासाठी पहिलं गाणं गायलं.

त्यांना १९७० आणि १९७१ साठी फिल्म पुरस्कारही मिळाले होते.

पुन्हा एकदा आम्हा रसिकांना दादासाहेब फाळके पुरस्काराचा अभिमान वाटू लागलाय.

Unknown

No comments: