भारतात दहावीचा निकाल 71 टक्के लागला, का नाही लागणार? प्रत्येकाला 30 मार्क वाढवून दिले. का तर, गणितातील प्रश्न चुकीचा होता. गणितात पास न होणारी मुलेही पास झाली. सर्वांना जर सरसकट 30 मार्क वाढवून दिले तर ज्या विद्यार्थ्याला 120 च्यावर मार्क आहेत त्यांना 150 च्यावर मार्क का नाही पडले? त्यांचे काय? त्या सर्वांवर अन्याय नाही काय?
ज्या विद्यार्थ्यांना गणितात 5 मार्क मिळाले ते सुद्धा पास झाले ना. म्हणजे यावर्षी 30 मार्कांच्या खाली कोणीच नाही.
किती छान गोंधळ घातला आहे ना? पुस्तकात चुका होतात, त्या नंतर कळतात, छापल्या जातात, ते पुस्तक तयार करणारे, छापण्या आधी बघत नाहीत, छापल्यावर कळते, आहेत कि नाही हुशार लोक?
सगळ्यात महत्वाचे, मी तर म्हणतो दहावीला कोणाला नापासच करू नये, म्हणजे कोणालाही वाईट वाटणार नाही. सगळे पास. 5-10 टक्के वाला आणि 98 टक्केवालाही पुढे कॉलेजला जाईल, जो जास्त टक्केवाला तो प्रवेश घेईल. सर्वांना पास करण्याचे फायदे-
- सर्वांना आनंद
- शाळांचा निकाल 100 टक्के
- पुन्हा ऑक्टोबर बॅच नको
- अकरावीला भरपूर विद्यार्थी असल्यामुळे शिक्षणसम्राटांना नवीन कॉलेजेस काढता येतील, त्यांचा धंदा वाढेल. कॉंपीटिशन वाढल्यामुळे भरपूर डोनेशन मिळतील.
आता अभ्यासक्रम बदलण्याची काय आवश्यकता होती? तोच अभ्यासक्रम चालला असता ना? नाहीतरी या ज्ञानाचा पुढील आयुष्यात काहीच उपयोग नाहीये. फक्त मार्क मिळविण्यासाठीच अभ्यास करायचा ना? मग काय फरक पडतो? पावसाचे चक्र शिकून काय करणार सांगा ना? उलटे लिहीले तर पाउस नाही पडणार? पण मार्क मात्र नाही पडणार.ते चक्र शिकून नंतर काय? थोडा विचार करा त्या चुकीच्या पुस्तकामुळे काय फरक पडला असता. उलट सरकारने जाहीर अरायला पाहिजे होते कि, या पुस्तकाच्या विषयात सर्वांना परिक्षेत कोणीही नापास होणार नाहीत. पुस्तके नवीन छापण्याचा खर्च वाचला असता. देशाचे नुकसान टळले असते. परीक्षेनंतर सगळे विसरायचेच असते.
खरे तर कोणालाही कधीच नापास करू नये. अगदी पदवीधरापर्यंत. पुढे जाऊन सगळेजण आपापल्या कुवतीप्रमाणे जीननात पुढे जातील.
यानंतर खेळ खंडोबा - 2 मध्ये.
No comments:
Post a Comment