शहरात नव्याने बांधलेले उड्डाणपूल हा मोठा विनोद

खालील बातमी आहे दैनिक 'सकाळ' मधील, नीट वाचावी आणि विचार करावा.

Sakal Papers International Marathi News Daily - Pune


शहरात नव्याने बांधलेले उड्डाणपूल हा मोठा विनोद - डी. एस. कुलकर्णी

पुणे, ता. १७ - ""शहरात नव्याने बांधण्यात आलेले उड्डाणपूल हा सर्वांत मोठा विनोद आहे. शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी हे पूल बांधण्यात आले आहेत. मात्र, त्यात थोड्या सुधारणा केल्या असत्या तर वाहतूक आणखी सुरळीत झाली असती, असे मत "डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड'चे अध्यक्ष डी. एस. कुलकर्णी यांनी आज व्यक्त केले.

शहरात हा पूल बांधण्याचा विनोद वर्षभर चालला होता, सर्व पुणेकर हैराण झाले होते तेव्हा हे महाशय कोठे होते? या साहेबांचा पुण्यात फार मोठा बांधकाम व्यवसाय आहे. त्यांना या पुलाचे बांधकाम चालले होते हे माहित होते तर त्यांनी त्याच वेळेस सुधारणा का सांगितल्या नाहित, नंतर जाहीरपणे बोलण्यात काही अर्थ आहे काय? माहित आहे कि आता काहीच होऊ शकत नाही मग बोलायला काय जाते? जेव्हा वरील विधाने केली त्याच वेळेस त्यातील सुधारणा का सांगितल्या नाहीत. पुढे मागे भविष्यात त्याचा दुसर्‍या पुलांच्या बांधकामाच्या वेळेस उपयोग होईल ना? कोणत्याही कामाला नंतर कशी नावे ठेवायची, त्याची कशी वरात काढायची हे भारतीयांना बरोबर माहित आहे. हि खोडी सामान्य पुणेकरांना नाही बरं का? हे काम अशी थोर मंडळीच करतात. पुण्याची वाहतूक सुरळीत व्हावी असे त्यांना वाटले असते तर त्यानी त्याच वेळेस वेळोवेळी जाहीर करायला पाहिजे होते, पुणेकरांनी नक्कीच त्यांच्या ज्ञानाचा फायदा घेतला असता. जर त्याबद्दल त्यांना माहीत होते, आणि त्यांनी सांगितले नाही तर त्यांनी पुणेकरांचे फार मोठे नुकसान केले आहे. खरे तर हे नंतर जाहीर करून तेच फार मोठा विनोद करीत आहेत.कृपया त्यांनी, कुलकर्णी साहेबांनी, आठवा 30 सप्टेंबर 1993, किल्लारीचा महाभयंकर भूकंप. किती हानी झाली, किती लोकांना प्राण गमवावे लागले.खूप दुःखाचे प्रसंग आले लोकांवर. मग काही दिवसांनी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ज्योतिषकार मा. नलिनी केळकर(नक्की नाव माहित नाही, माहित असणार्‍यांनी दुरूस्ती करावी) यांनी जाहीर केले कि, भारताच्या कुंडलीनुसार हा भूकंप होणारच होता, मग काय लोक चिडले, त्यांनी त्यांना जाब विचारला, जर हे तुम्हाला माहित होते तर तुम्ही एवढी हानी का टाळली नाही, याला तुम्हीच जबाबदार आहात. बस, मला वाटते नंतर त्यांचे नावच ऐकायला मिळाले नाही. घडलेल्या घटनांचे भविष्य सांगायला यांची काय जरूरी आहे. एखादी गोष्ट माहित असूनही लपवून ठेवली जाते, आणि त्यात जनतेचा संबंध असेल तर, अशा माहिती लपवून ठेवणार्‍याला योग्य शासन झालेच पाहिजे. खूप जाणकार भविष्य भास्कर, ज्योतिष भास्कर, शिरोमणी आहेत त्यांनी खालील घटनाचे भविष्य का सांगितले नाही? कारगील युद्ध, भयंकर पूर, क्रिकेटचा वर्ल्ड कप, निवडणुकीतील अंदाज वगैरे. भविष्य सांगणारे आणि वेधशाळा यात काहीच फरक नाही. पाउस पडेपर्यंत वेधशाळा काहीच अंदाज करीत नाही, पण लगेच अंदाज केला जातो, पुढील दोन दिवसात आकाश ढगाळ राहून, हलक्या ते मध्यम सरी पडण्याची शक्यता आहे. आणि पुढील दोनच काय तर आठवडाभर पाउस पडत नाही. आता आपणच तुलना करावी. त्यापेक्षा रस्यावरचा भविष्य सांगणारा पोपट बरा. सर्व जाणकार, भविष्य सांगणारे,ज्ञानी, अभियंते, थोर उद्योगपती, मंत्र, तंत्र शास्त्र पारंगत, सर्वांना विनंती, जे काही असेल ते आधीच सुचवा, नंतर नको.

Unknown

No comments: