हिंदू धर्म सनातन धर्म आहे. हिंदू धर्मात वेद, पुराणे, उपनिषदे, महाकाव्ये वगैरे प्रचंड साहित्य आहे, यातून आपल्या पूर्वजांनी अनमोल शिकवण दिलेली आहे. जीवनाच्या प्रत्येक पैलूवर बारकाईने उपदेश केलेला आहे. आपण रोज त्याची माहिती करून घेऊ यात. आयुष्यात काय करावे, आणि काय टाळावे याची जाणीव होते. माणसाचे आचार विचार कसे असावेत याबद्दल ऋषी मुनींनी काय सांगितले आहे ते रोज याठिकाणी मनन करू यात.
आचारहीनं न पुनन्ति वेदा
यद्यप्यधीताः सह षड्भिरङ्गैः ।
छन्दांस्येनं मृत्युकाले त्यजन्ति
नीडं शकुन्ता इव जातपक्षाः ॥
( वसिष्ठस्मृति ६।३; देवीभागवत ११।२।१ )
अर्थ - आचारहीन मनुष्याने, 'शिक्षा, कल्प, निरुक्त, छन्द, व्याकरण आणि ज्योतिष’ या सहाही अंगांनी वेदांचे अध्ययन केले असता सुद्धा वेद त्याला पवित्र करण्यास असमर्थ आहेत. ज्याप्रमाणे पंख फुटल्यावर पक्षी घरटे सोडून देतात, त्याचप्रमाणे मृत्युसमयी वेद त्या मनुष्याचा त्याग करतात.
आचाराल्लभते ह्यायुराचारादीप्सिताः प्रजाः ।
आचाराद्धनक्षय्यमाचारो हन्त्यलक्षणम् ॥
( मनुस्मृति ४।१५६ )
अर्थ - मनुष्य सदाचाराने दीर्घायुष्य प्राप्त करतो, गुणवान संतान प्राप्त करतो, अक्षय धन संपत्ती प्राप्त करतो त्याचप्रमाणे सदाचाराने वाईट लक्षणांचा नाश होतो.
उद्या - अनमोल विच्रार - २
No comments:
Post a Comment