पदर

मूल घाबरते तेव्हा आईजवळ जाते, आई त्याला पदराखाली घेते, तेव्हा त्या बाळाला जगातील सर्वात सुरक्षित जागा वाटते.

साडी कितीही भारी असो, तिचा पदर पाहिला जातो, त्यावरून तिची किंमत ठरते. ऊन असो अगर पाऊस, पदर डोक्यावर घेतला कि, संरक्षण. तो पदर जो सात फेर्‍यांच्या वेळेस गाठ बांधला जातो, तो जन्मजन्मांतरीची गाठ बांधतो. जेव्हा प्रियकर समोर असतो, अबोला असतो, गालावर गुलाबी लाली असते तेव्हा तो पदर बोटावर गुंडाळला जातो आणि  सर्व मनातले गुपीत उघड करतो. बंगालमध्ये हाच पदर तिजोरीच्या चाव्या सांभाळतो. जेव्हा स्व-संरक्षणाची वेळ येते तेव्हा हाच पदर खोचला जातो. पैसे म्हातारपणासाठी वाचवायचे असतील तर, पदराला दोन पैसे गाठ मारायला सांगीतले जातात. पैसे ठेवायला जागा नसेल तर पदराचा कोपरा कामाला येतो. अरेरे, लहान बाळाचे नाक कशाने पुसायचे, पदर काय कामाचा मग? खांद्यावरचा पदर डोक्यावर गेला कि, देवाचा, थोरामोठ्यांचा आशिर्वाद मिळतो. द्रौपदीच्या पदराला दुःशासनाने हात घातला आणि श्रीकृष्णाने लाखो साड्या पुरवल्या, पदराची लाज सांभाळली.  

हाच पदर पडला तर, विश्वामित्र व्हायला वेळ लागत नाही.  

पदर पारदर्शक असला तरी सुरक्षीत वाटतो ना? पण तोच पदर थोडासा जरी घसरला तर........? 

कल्पनाच न केलेली बरी.

Unknown

No comments: