हे शीर्षक आहे साधारण दहा बारा वर्षांपूर्वी गाजलेल्या लावणीचे, आणि ही लावणी गायली होती सुप्रसिद्ध अदाकारा सुरेखा पुणेकर यांनी. खरेतर या लावणी मुळेच त्यांचे नाव सार्या महाराष्ट्रभर झाले. ही आठवण येण्याचे कारण असे झाले,
काल झी मराठी वर ’ एका पेक्षा एक ’ कार्यक्रम चालला होता आणि त्यात सुप्रसिद्ध कलाकार सचिन पिळगावकर महागुरू होते, म्हणजे तसे ते या प्रत्येक कार्यक्रमात आहेत, आणि ते अशाच काही जुन्या आठवणी सांगत असतात. याच कार्यक्रमात ही लावणी ’ या रावजी बसा भावजी ’ एका कलाकाराने सादर केली, लावणी खूपच सुरेख झाली, आणि सुरेखा पुणेकर यांची आठवण झाली पण त्यानंतर महागुरू सचिन यांनी या लावणीबद्दल एक आठवण सांगितली,
आठवण कसली सत्य सांगितले.
ही लावणी त्यांचे वडील शरद पिळगावकर यांनी ’ नाव मोठं लक्षण खोटं ’ या जुन्या गाजलेल्या मराठी चित्रपटात सादर केली होती.
अगदी कालपर्यंत शरद पिळगावकर यांचा साधा उल्लेखही कोणी केला नाही. किंवा नंतर कुणीही एका अक्षरानेही यांचे साधे आभार मानले नाहीत. कितीतरी कार्यक्रमात ही लावणी सादर करून कलाकार वाहवा मिळवतात, तर त्यांनी शरद पिळगावकर यांचा किमानपक्षी उल्लेख तरी करावा.
2 comments:
अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं ...
By the way, मला शरद पिळगावकर यांची जन्मतारीख हवी आहे. आपल्याला माहित असल्यास जरुर कळवावी. मला ती या वेबपेजवर वापरायची आहे: http://mahitisagar.com/0617.php
अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं ...
By the way, मला शरद पिळगावकर यांची जन्मतारीख हवी आहे. आपल्याला माहित असल्यास जरुर कळवावी. मला ती या वेबपेजवर वापरायची आहे: http://mahitisagar.com/0617.php
Post a Comment