कायदेशीररीत्या विवाह न करता पत्नी म्हणून पुरुषासमवेत एकत्र राहणाऱ्या कोणत्याही महिलेला यापुढे पत्नीचा दर्जा देण्याच्या भारतीय दंड संहितेतील प्रस्तावित तरतुदीस बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने हा कायदा करुन संपुर्ण भारतीय विवाह संस्थेला मोडकळीत आणले आहे.
- भारतीय समाज आणि संस्कॄती वैवाहिक नात्यांवर अवलंबुन आहे. यामुळे विवाहबाह्य संबंध समाजाला मान्य करावे लागतील. यावरुन आपले कायदे चांगल्या-वाईटाचा विचार न करता फक्त निवडणुकीतील मतांसाठी केले जातात हे लक्षात येत आहे. असे कायदे देशाच्या मुळावर आघात करत आहेत.
- सरकारने "पत्नी" या शब्दाची व्याख्या बदलली आणि सगळ्या विवाहबाह्य संबंधांना कायदेशीर करुन टाकले आहे. कोणतिही स्त्री आता विवाह बंधनात न अडकता पत्नीचे फायदे मिळवु शकते. स्त्री-पुरुषांनी विवाहबाह्य संबंध ठेवणे हा त्यांचा व्यक्तीगत प्रश्न आहे. पण त्या नात्याला विवाहाचा दर्जा देणे हे अतिशय चूक आहे.
- सरकारने हा कायदा करताना सर्व द्वि-भार्या कयद्याचाही विचार करु नये हे अगदी चुकिचे आहे. आता जर कोणी विवहित पुरुष अन्य स्त्री बरोबर राहत असेल तर तो द्वि-भार्या कायद्यात अडकेल का?
- पण या कायद्याने सर्वात जास्त अडकला तो पुरुष, असे संबंध जर स्त्री-पुरुषाच्या परस्पर संमतीने घडत असतील तर फक्त स्त्री पोटगीला लायक कशी. आपल्या मुर्ख सरकारला "पती" या शब्दाची व्याख्या का बदलाविशी वाटत नाही? जर स्त्री आणि पुरुष कायद्यासमोर समान असतील तर त्यांना यात भेदभाव का? पुरुषाला पण पोटगीचा अधिकार का नसावा? सरकारच्या अशा व्यवहारामुळे, आपण अजुनही मानतो की स्त्री पुरूषापेक्षा जास्त कमत नाही.
- असे विवाहबाह्य संबंधाचे लोण "सुशिक्षीत-असंस्कॄत" उच्च-मध्यम वर्गीयांचे देणे आहे. विवाहबाह्य संबंधाचे खुळ भारतात पाश्चात्य प्रभावाने सुरु झाले आहे. जगातील व्यक्तीगत स्वातंत्र्याचा झेंडा मिरवणार्या अमेरिकेतही विवाहबाह्य संबंधानी पोटगी मिळत नाही. असे संबंध जगभरात तात्पुरते मानले जातात, ज्यामुळे स्त्री-पुरुषाला एकमेकांना समजण्याची संधी मिळते, आणि त्याचे रुपांतर विवाह व्हावे अशी सर्व सामान्य अपेक्षा असते.
असे कायदे करणारे भारतात असतील तर भारतीय संस्कॄतीची वाट लागायला वेळ लागणार नाही. त्यात महत्वाचा वाटा "सेवानिवृत्त न्या. मल्लीमथ, एस. वर्धाचार्य, आयएएस अमिताभ गुप्ता, आयपीएस डॉ. माधव मेनन, पी. व्ही. सुब्बाराव आणि महाराष्ट्र सरकार" या मुर्खांचा नक्की असेल.
1 comment:
काही दिवसांनी, या मूर्खांनी वेश्याव्यवसायाला Sex Service म्हणून मान्यता दिली नाही तरच आश्चर्य !
Post a Comment