खटला सुरू झाला

अखेर अजमल कसाबचा खटला सुरू झाला आहे. ज्या माणसाने गोळीबार करताना मिडीयाने पुन्हा पुन्हा दाखविले, माणसांचे मुडदे पाडताना करोडो लोकांनी त्याला पाहिले अशा गुन्हेगारावर खटला चालू आहे. काय लोकशाहीची दुर्दशा ! न्यायालयात जेव्हा खुनाचा खटला चालू असतो तेव्हा प्रत्यक्ष डोळ्याने पाहणार्‍या साक्षीदारावर विश्वास ठेउन कोर्ट गुन्हेगाराला शिक्षा देते, आणि इथे तर T.V. वर प्रत्यक्ष देशाने पाहिलेले असताना त्या कसाबवर खटला चालवावा म्हणजे काय?

आता त्याला न्यायालय सर्व संधी देणार. वर्तमानपत्रात त्याची सुरक्षा व्यवस्था पाहिली तर अंदाज तरी करता येईल काय, किती खर्च येत असेल ते. आपण उलटा विचार करू यात असे पाकिस्तानात घडले असते तर काय पाकिस्तानने लाड पुरवले असते काय? अरे कसला खटला चालवता त्याला दाखवा तो कसा गोळीबार करतो ते आणि हाच पुरावा ग्राह्य धरून द्या ना त्याला जाहीर जाहीर फाशी, मग कोणीही माईचा लाल यापुढे भारतावर दहशतवादी हल्ला करण्याचे धाडस करणार नाही. द्या त्या अफझल गुरूला जनतेच्या हवाली करून, मग बघा जनता त्याचा काय न्याय करते ते.

कसाब काय तक्रार करतो, जग काय म्हणेल, पाकिस्तानचे संबंध कसे राहतील याच काय विचार करायचा? बंदूक चालवताना त्याने विचार केला होता? त्याने किती कुटुंबांना निराधार केले आहे, त्यांनी काय करावे. काय भारताची घटना आहे, ज्याने खुले आम, ज्यांचा कुठलाही गुन्हा किंवा दोष नसताना, दीडेकशे माणसांचे मुडदे पाडले, जे सर्व भारताने पाहिले, त्याला कायदा संरक्षण देतो, न्यायाची संधी देतो आणि त्याच्या सुरक्षेची काळजी घेतो, मोठी चेष्टा आहे.

आपण जगाला काय दाखवायचे की, आम्ही किती न्यायप्रिय आहोत, भले मग आमच्या निष्पाप जनतेवर कोणीही कसाही गोळीबार करावा.  काय न्याय मिळणार आहे त्या कर्तबगार अधिकार्‍यांना, काय न्याय मिळणार आहे त्या कुटुंबीयांना, आपण त्यांना न्याय नाकारतो आहोत, त्या कसाबाला न्याय देताना याचे भान सर्वजण विसरलेत.

लोकसभेला मते मागणारे, जनतेचे सर्व कनवाळू उमेदवार दणादण भाषणे ठोकताहेत, पण कोणीतरी या कसाबाबद्दल बोलत आहे काय? कोणी त्या पोलीस अधिकार्‍यांबद्द्ल बोलत आहे काय? त्यांच्या कुटुंबीयांना भेट देऊन त्यांचे सांत्वन केले आहे काय? अरे ह्या उमेदवारांना एकमेकांची उणीधुणी काढायलाच वॆळ नाही तर या देशाच्या प्रश्ना कडे कोण लक्ष देणार  आहे.

Unknown

4 comments:

Honestly yours said...

दिलिप,

मला वाटते की तुम्ही स्वात मधे जाऊन रहाण्यास अत्यंत लायक आहात. तिथे ही विशेष कोणाचे ऐकून न घेता शिक्षा करत सूटतात.
होय, कसावला ताबडतोब फाशी झाली पाहिजे. पण, जर तुम्ही ज्या देशाचे कायदे करण्यात भाग घेत नसाल, तर असा घोळ कायमच घातला जाईल.
करा ना कायदा की कसावला लोकांच्यात फेकून देण्यात यावे. जाहीर फाशी द्यावी. मी तुम्हाला पूर्ण पाठींबा देइन. पोलिस किंवा राजकारण्यांकडून तुम्ही नक्की काय अपेक्षा करताय? आणि नेहमी काय करत रहाव अस म्हणताय ?

उगाच काहीही बोलून किंवा लिहून, काहीही कृती न करणे, हे मूर्खपणाचे आहे. आता जर आपण जागे झालो नाही तर नेहमीच आपल्यावर संकट येइल.

आणि आता जसे कायदे आहेत, त्याप्रमाणे, न्यायालयीन कारवाईशिवाय शिक्षा होत नाही. पण त्यासाठी ज्या गोष्टी करणे आवश्यक आहेत. ते ही जर लोक करू देत नसतील, तर खरोखरच मूर्खांचे राज्य आले आहे. कोणाला वकीलपत्र घेउ न देण्यामुळे जो ऊशीर झाला, त्याला जवाबदार कोण? जसा फाशी देणयासाठी मांग हवा, तसाच शिक्षा देणारा जज आणि वकिल सुद्धा हवा, हे न कळण्याइतके दूधखुळे झालो आहोत का आपण?

जर जगाला काही न्यायप्रियता ई. दाखवायचं आहे, वगैरे कोणी म्हणत असेल, तर मात्र अगदी शिव्या तोंडावर येतात. हरामखोर लेकाचे, इथे काय जळतंय आणि तुम्हाला काय नालायकपणा सुचतोय....

Vishal Khapre said...

प्रिय हॉनेस्ट्ली,
लोकशाहीत सर्वांना मतप्रदर्शनाचाही, जो या लेखातुन प्रदर्शित केला आहे, तोही भारतातुन. "स्वात" मध्ये तो हक्क मिळेल का ते कळवा.

मी तुमच्याशी थोडा-फार सहमत आहे. लोकशाहीत प्रत्येकाला न्याय आहे. तुमच्यामते अफजल आणि कसाबला सुद्धा? तुमच्या देशावर सरळ सरळ हल्ला केलेल्या अफजलला वकील आणि इतर सवलती दिल्यावर फाशी सुनवलेली आहे. याला दोन वर्षे झाली, पण भारतीय लोकशाहीत तो अजुन जिवंत का आहे, याचे उत्तर आहे का? जर त्याला वेळेत फासावर चढवला असता तर कसाबने मुंबईत पाऊल ठेवताना १००० वेळा विचार केला असता.

"नेहमी काय करत रहाव अस म्हणताय?" याला आज जर तुमच्या-माझ्याकडे उत्तर असले असते तर किती बरे झाले असते ना? O-49, मतदान इ. अशी पोकळ उत्तरे देऊ नका कारण तुम्ही मत द्या, नका देऊ, सत्ता चुकीच्या हातात जाणार हे मला आंणि तुम्हालाही माहीत आहे.

या सगळ्या संवादातुन सामुहीक राजकीय नैराश्य दिसत आहे असे तुम्हाला वाटत नाही का?

Anonymous said...

अच्छी ब्लॉग हे / मराठी और हिन्दी मे टाइप करने केलिए आप कौनसी टाइपिंग टूल का इस्तीमाल करते हे..?
रीसेंट्ली, मैने यूज़र फ्रेंड्ली इंडियन लॅंग्वेज टाइपिंग टूल केलिए सर्च कर रहा ता तो मूज़े मिला " क्विलपॅड " /
आप भी "क्विलपॅड" www.quillpad.in यूज़ करते हे क्या...?

Honestly yours said...

आनंदाची गोष्ट आहे, की मतदानाबद्दल आपल्याला आस्था आहे. मागील लेख http://www.khapre.org/blog/marathi/2009/04/blog-post_17.aspx च्या सुरानुसार माझा तसा ग्रह झाला.

"अफजल ...अजुन जिवंत का आहे" .... राष्ट्रपतींनी आपले काम न केल्याने.... सध्याचे राष्ट्रपती कॉंग्रेसची बाहुली आहे, हे काही लपून राहिले नाही.

"..... तुमच्या-माझ्याकडे उत्तर असले असते तर किती बरे झाले असते ना?" उत्तर स्पष्ट आहे... ताबडतोब न्याय होण्यासाठी योग्य ती व्यवस्था... विषेशत: कायदे, व अंगात धमक.

"सत्ता चुकीच्या हातात जाणार...." असे समजून काही न करणे म्हणजे, नालायक राजकारण्यांचा परत विजय झालाच म्हणून समजा.

नैराश्य दिसत असूनही, आज अनेक जण पेटून उठले आहेत. जर आपण सगळे एकत्र आलो तर परिस्थिती बदलण्यास वेळ लागणार नाही.