मनस्ताप

आज E Tv मराठीवर एक सिरीयल पाहिली, ’मंथन’

त्यात एका बँक मॅनेजरला मोबाईलवर फोन येतो, आणि त्याला विचारले जाते की, तुम्हाला लग्न करायचे आहे, तेव्हा माझे वय ४६ आहे आणि मी विचार करायला तयार आहे. त्या मॅनेजरला कळतच नाही की हि काय भानगड आहे, माझे लग्न होऊन ३० वर्षे झालेले आहेत, आणि यांना कोणी सांगितले की मी लग्न करणार आहे म्हणून. पुन्हा तसाच फोन येतो, तिच चौकशी होते, या माणसाला फार मनस्ताप होतो. काही वेळानंतर त्या बॅंकेतील एक कर्मचारी येतो आणि त्याला विचारतो काय साहेब आपण लग्न करणार आहात काय? तो म्हणतो तुम्ही असे काय विचारताय, तेव्हा तो कर्मचारी वर्तमानपत्रातील जाहिरात दाखवतो. ती जाहिरात कोणीतरी मुद्दाम त्या मॅनेजरला त्रास देण्यासाठी त्याच्या नावावर दिलेली असते.

जेव्हा पेपर मध्ये जाहिरात घेतली जाते , तेव्हा काहिही शहानिशा करत नाहीत, त्यामुळे असे प्रकार होऊ शकतात. हे तर आमच्याही डोक्यात कधी आले नाही. पण किती भयानक प्रकार आहे ना? आता असा प्रश्न पडतो की, T.V. वर दाखवले पण काही विक्षिप्त मंडळींना idea मिळाली ना.

तेव्हा असे प्रसंग दाखवताना काळजी घेणे जरूरीचे आहे. म्हणून T.V. वरील कार्यक्रमांना देखील sensor पाहिजे.

Unknown

1 comment:

Abhi said...

तुमचा ब्लॉग खूपच आवडला.

-अभी