जीभ

जीभ, शरीरातील अजिबात हाड नसलेला अवयव, पण हाच अवयव घसरला की, शरीरातील सर्व हाडे मोडतो. सरीराचे आरोग्य आणि सुरक्षितता जीभेवरच अवलंबून असते. जीभ जेव्हा बोलू लागते, तेव्हा काही चांगले तर काहीवेळेला वाईट परिणाम होतात. परंतु जीभ जेव्हा चोचले पुरवू लागते तेव्हा आरोग्य बिघडते आणि नियंत्रणात राहते तेव्हा आरोग्य निरोगी राहते. तलवार काय काम करेल तेवढी जीभ काम करते.

जीभने शब्द उच्चारले जातात, महात्मा गांधी बोलत तर इंग्रज हलत, लोकमान्य टिळक बोलले आणि जन्मसिद्ध हक्क मिळाला. तर बॅरिस्टर जीना बोलले आणि पाकिस्तानची निर्मीती झाली, आणि भारताला आयुष्यभरची डोकेदुखी झाली. एखाद्याशी बोलताना जिभेचा तोल गेला तर आयुष्यभरची नाती तुटतात.

माझ्या माहितीत एक सज्जन होते, म्हणजे ते आता नाहीत. त्याला कोळंबीची भाजी खायची होती, तसे त्याने बायकोला सांगितले तर ती म्हणाली, बरं. भाजी झाली, नवरा म्हणाला भाजीत मीठ जास्त पडले आहे, पण बायको काय कबूल होईना. याच्या जिभेला खारट ता बायकोच्या जीभेला बरोबर चव. खूप भांडण झालं. त्यांच्या अबोला निर्माण झाला. आता प्रश्न आला प्रथम कोणी बोलायचे. यात महिने निघून गेली. नवरा तावातावाने घर सोडून निघून गेला. त्याचा खूप शोध घेऊनही तो सापडला नाही, शेवटी त्याच्या मृत्युचीच खवर दहा एक वर्षाने मिळाली. संसार मातीत मिळाला, त्याचा बेवारस अंत झाला. हे सर्व कशामुळे घडले, जिभेची चव आणि जीभेचाच अबोला. आहे ना जीभेची कमाल. अमिन सायनीने जीभेवर,रेडिओ सिलोन वर बिनाका गीतमाला गाजवली. दोघांच्या भांडणात तीसर्‍याने जीभ चालवली, तर काय होईल, कल्पना करा.

आरोग्य जीभेवरच अवलंबून असते, कितीही व्यायाम करा, पण जो जीभेला सांभाळतो ना त्याला आरोग्यासाठी बाकी कशाचीही जरूरी नाही. माझ्या माहितीतली एक व्यक्ती, त्याच्या जीभेची शिस्त सांगू? सकाळी उठल्यावर कपभर चहा त्या बरोबर एक गरम चपाती. दुपारी दोन चपात्या आणि वाटीभर भात, तोच आहार रात्री सुद्धा. वेळा सुद्धा ठरलेल्या सकाळी सात, दुपारी बारा आणि रात्री साडे आठ. मधीआधी अजीबात खाणे नाही. जेवताना आग्रह अजिबात नको. साधीबभाजी असो, श्रीखंड असो, नाहीतर मांसाहार असो, दोन म्हणजे दोनच चपात्या. भाजी चांगली झाली, मटण मच्छी आहे म्हणून जरा जास्त नाही.  त्या माणसाचे आरोग्य अजूनही अबाधित आहे, डॉक्टरची ओळखच नाही.

जीभेच्या कार्याचा विचार केला तरी, महत्व लक्षात येते. जेवताना दाताखाली अन्न कोण ढकलते. जीभेमुळेच तर केस किंवा इतर अनावश्यक पदार्थांची जाणीव होते.

’अय्या’ करून जेव्हा मुली जीभ बाहेर काढतात, तेव्हा अहाहा! काय सांगू नका.

Unknown

No comments: