दुखवटा

काल दि.२७ जानेवारी २००९ रोजी भारताचे माजी राष्ट्रपती श्री. वेंकटरमण यांचे निधन झाले. त्यानिमीत्त सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. सर्व सरकारी कार्यक्रम रद्द. काय कारण? कोणाही नेत्याला त्या मरणाचे दुःख झाले नसेल. फक्त राष्ट्रपती म्हणून दुःख, पण तो माणूस म्हणून किती श्रेष्ठ होता याचा विचार कोणी करते काय? पूर्वी तर दुखवटा म्हणजे T.V. वरील कार्यक्रम सुद्धा रद्द असायचे, पण कोणाला सुख दुःख. उलट लोक केबल लावून बसायचे. असा सर्व्हे केलाच गेला नाही की, या दुखवट्याचा जनतेवर काय परिणाम होतो.

राजकारणी लोकांबद्दल लोकांना काय वाटते, याचा अभ्यास सर्व्हे करणे जरूरीचे आहे. १५ ऑगष्ट किंवा २६ जानेवारीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती T.V. वरून जे भाषण देतात, ते किती लोक ऐकतात? १० टक्के सुद्धा नसतील. लोकांचा राग मतपेट्यांद्वारे व्यक्त होत असेल तरी, भारतातील घटनेप्रमाणे एक मत जरी जास्त मिळाले तरी उमेदवार निवडून येतो. समजा कोणीच मतदानाला गेले नाही तर अगदी दोन तीन मते मिळाली तरी मतदान झाले असे समजण्यात येते. खरेतर कमीतकमी किती मते पडावीत याची टक्केवारी त्यात्या भागातील, मतदारांच्या संख्येवर निश्चित करावी.

भारतात किती धर्म आहेत, किती नेते होऊन गेले ( त्यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या) , किती सण येतात, किती स्मरणदिन या सर्वांचा विचार केला तर किती कामाचे दिवस उरतात. याचा कोणीही विचार करत नाही. पुण्यात पाहिले, मोहरम, ईद सुट्टी अशा शाळांना दिली जाते, त्या शाळेत एकही मुस्लीम विद्यार्थी नसतो. आता या सणांना हिंदू शाळांतील विद्यार्थी काय मस्जिदमध्ये नमाजासाठी जाणार काय?

असा कोणी नेता दिवंगत झाल्यास  जास्त्तीतजास्त एक दिवसाचा दुखवटा पाळायला हरकत नाही. नवीन वर्षाच्या सुरवातीला लोक जोडून सुट्ट्या पाहतात आणि पिकनिकचे बेत आखतात. कोणीही राष्ट्रीय सणांना घरी थांबत नाही, की सरकारी कार्यक्रमाचा आनंद घेत नाहीत. जे सरकारतर्फे पुरस्कार दिले जातात, कोणीही T.V. वर पहात नाहीत. सुट्टीच्या दिवसाचे महत्व फक्त मजा करण्यासाठी, कोणीही त्या दिवसाचे महत्व जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत. 

हे सगळं आठवले या दुखवट्या वरून.

Unknown

No comments: