खरंच संताप येतो

भारतात संसदेवर हल्ला झाला, मुंबईत बॉंब स्फोट झाले, पुन्हा मुंबईत समोरासमोर लढाई ताजमहाल हॉटेलात झाली, अशा छोट्यामोठ्या खूप अतिरेकी कारवाया झाल्या, सर्वांचे पुरावे मिळाले, पण कशात काही नाही. सर्व प्रकरणे कोर्टात. स्वच्छ निर्णय नाहीतच. केव्हा आपण धाडस करणार? अफझल गुरूला फाशीची शिक्षा होऊन वर्षे उलटली, पण तो मजेत बिर्याणीवर ताव मारत मजा करत असेल. ताजमहालवर हल्ला झाला, अगदी समोरासमोर लढाई झाली, कसाब जिवंत सापडला, त्याला हल्ला करताना अनेकांनी पाहिले, वार्ताहरांनी बातम्यांमध्ये T.V. वर दाखवले, अगदी समोरासमोर पुरावा असून सुद्धा त्याच्यावर कोर्टात दावा चालणार, काय म्हणावे या लोकशाहीला. आता हा खटला रेंगाळणार, आणि याला फाशीची शिक्षा झाली तर हा सुद्धा गुरू बरोबर भारताची टर उडवत बिर्याणीवर ताव मारणार. जर त्या कसाबला समक्ष पाहणारे एवढे साक्षीदार असतील, तर त्याच्यावर खटला चालविण्याऐवजी एकदम निकालच का होत नाही? आण्खी काय पुरावे न्यायालय मागणार?

अगदी लहान मुले गल्लीत भांडतात ना त्याप्रमाणे भारत पाकिस्तानात सद्या शाब्दिक खेळी चालली आहे. पाकिस्तान रडीची खेळी करतोय, आणि आपण फक्त तोंडाची वाफ वाया घालवतोय. पुरावे दिले तरी पाकिस्तान नाकारतोय, आणि भारत पुन्हा गळा काढतोय. सैन्य आहे,सैन्यात धैर्य आहे, लढण्याची ताकद आहे, पण नाही, राजकारण आडवे येतय ना! हे असेच चालणार, आणि कुठे तरी बंद होणार. पुन्हा काहीतरी होणार, आणि आपण मागचे विसरणार.

इतका संताप येतो पण काय करणार? शहीद झालेल्यांच्या घरची परिस्थिती काय असणार? कोण त्यांना न्याय देणार.

पाकिस्तानात महत्वाच्या जाऊ द्यात, पण अगदी साध्या पदावर तरी एखादा हिंदू आहे काय? एखादा राजकारणी तरी आहे काय? तेथे हिंदू असतील तर त्यांची काय अवस्था असेल. आणि इथे भारतात अगदी राष्ट्रपती सुद्धा मुस्लीम असू शकतो, आणि एकदा नाहीतर तीन वेळा. शिवाजी महाराजांचा आदर्श सांगणार्‍या महाराष्ट्रातही काही वेगळी परिस्थिती आहे काय? मतांसाठी हे राजकारणी कोणत्याही थराला जाऊ शकतात. एकंदर सर्व सरकारी आणि राजकीय पदांचा आढावा घ्यावा, आणि बिगर हिंदूंची टक्केवारी काढावी. का? भारतीय हिंदू ती पदे  भूषवू शकत नाहीत. कालच्या सकाळ मध्ये किती भारतीयांना अमेरिकेच्या राजकारणात, ओबामांच्या स्ररकारात स्थान आहे याची यादी प्रसिद्ध झाली आहे, अगदी इतर देशांच्या शास्त्रज्ञांच्या तुकडीतही भारतीयांना दर्जा आहे, आहे अशी यादी पाकिस्तान जवळ? भारतातील सर्व धर्मांच्या लोकांच्या मनात भारत प्रेम आहे हे खरे आहे, यात शंकाच नाही, पण शेवटी विचार होतोच ना?

Unknown

No comments: