बराक ओबामा

मंगळावारी ’बराक ओबामा’ अमेरिकेच्या ४४व्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेणार आहेत. एक इतिहास घडणार आहे. सव्वादोनशे वर्षांनंतर प्रथमच एक कृष्णवर्णिय व्यक्ति राष्ट्राध्यक्ष होत आहे. सव्वादोनशे वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी होती, तेव्हा अशी आव्हाने वगैरे काही नव्हती. दहशतवाद नव्हता. आता ओबामांसमोर खूप आव्हाने उभी आहेत. पण त्यांची तडफ पाहता ते हे सर्व नीट सुरळीत करतील अशी खात्री आहे. ओबामा अब्राहम लिंकनने जे कार्य केले, त्याच्याशी नाळ जोडण्याचा प्रयत्न करतील, कारण त्या वेळॆस अमेरिकेत यादवी चालू होती, आणि आज ओबामांना यादवीपेक्षा भयानक अशा मंदीला, आणि दहशतवादाला तोंड द्यायचे आहे, कारण सगळॆ जग त्यांच्या कडे दहशतवाद मोडून काढण्याच्या अपेक्षेने बघत आहे. ९-११च्या घटनेनंतर इराक अफगाणिस्तानात अमेरिकेचे युद्ध चालू आहे, रशिया आणि चीनबरोबरचे संबंध ताणले गेले आहेत. पाकिस्तानने मदत देऊन, दगाबाजी केली आणि दहशतवाद जोपासला.

आता ओबामांनी परराष्ट्र धोरण बदलण्याची गरज आहे. ते लगेच होणार नाही, पण दृष्टिकोन बदलला जाईल. बुश प्रशासनाने जी अशांतता माजवून ठेवली आहे, त्या पश्चिम आशियात शांतता निर्माण करण्याची गरज आहे. आता गाझा पट्टीतही अमेरिका लक्ष घालत आहे. खरेतर इस्त्राईल-पॅलेस्ताईन संघर्षात अमेरिकेने न पडलेलेच बरे. आज भारतही २६-११च्या हल्ल्यात पाकिस्तान विरुद्ध पुरावे गोळा करून अमेरिकेचे दार ठोठावत आहे.

खूपशी आव्हाने खांद्यावर घेऊन ओबामा अध्यक्ष होत आहेत, त्यांना मारूतीराया शक्ती देवो.

श्री. बराक ओबामांना हार्दिक शुभेच्छा, भारतासाठी त्यांचे सरकार फलदायी ठरो.

Unknown

No comments: