दैनिक ’सकाळ’, दि.७ डिसेंबर २००९ च्या ’मुक्तपीठ’ मध्ये छापून आलेला लेख खास या बॉगच्या वाचकांसाठी देत आहोत.
श्री.द.पु. पारखे, कर्वे रस्ता यांनी केलेला मधुमेहावरील प्रयोग आणि त्यांना त्यात आलेले यश. त्यांना १९९८ मध्ये मधुमेह झाला होता, तेव्हा साखर होती ३५५. नंतर डॉक्टरांनी औषध दिल्यावर चारपाच दिवसात हायपोमुळे ते आयसीयुत गेले व गंभीर परिणामापासून वाचले. या अशा स्थितीत त्यांनी स्वतःवर प्रयोग करून गेली दहा ते बारा वषे एकही औषध न घेता मधुमेह आटोक्यात ठेवला आहे. आहे ना आश्चर्य? मग त्यांनी काय प्रयोग केले असतील?
जर आपण रोज सकाळी उपाशी पोटी एक सफरचंद खाल्ले व रात्री एक विटॅमीन बी कॉम्प्लेक्सची गोळी घेतली तर साखर पूर्णपणे नियंत्रणात राहते. कारण सफरचंदामुळे मधुमेहाची प्रक्रिया तात्पुरती का होईना थांबते व त्याचे दुष्परिणाम व औषधे न घेतल्यामुळे त्याचेही दुष्परिणाम होत नाहीत. संपूर्ण माहितीसाठी त्यांची वेबसाईट इच्छुकांनी जरूर वाचावी.
http://www.applecontrolsdiabetes.com/
दिनांक ११ जानेवारीच्या दैनिक ’सकाळ’च्या मुक्तपीठ मध्ये एका वाचकाने लिहीलेला अनुभव -
श्री. अनिल बर्वे, कर्वे रस्ता यांनाही मधुमेह होता. त्यांनी विचार केला, उपाय करून बघायला काय हरकत आहे? दुसर्या दिवसापासून उपाशीपोटी रोज एक सफरचंद खाण्यास सुरूवात केली.आणि मधुमेहावरील गोळ्या बंद करून रोज रात्री ’बी कॉम्प्लेक्स’ची गोळी घ्यायला लागले. दहा दिवसांच्या प्रयोगानंतर भीतभीतच ब्लड शुगर चेक केली तर ती नॉर्मल दाखवत होती.
हा आहे अनुभव, तरी आमच्या सर्व वाचकांनी याचा जरूर विचार करावा. आणि आपल्या जबाबदारीवर प्रयत्न करावा.
No comments:
Post a Comment