ही आहे दैनिक लोकसत्तातील एक बातमी -
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=27&Itemid=4
नवी दिल्ली, २० जानेवारी/पीटीआय
दिवंगत माकप नेते व पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योती बसू हे वयाच्या पंचाण्णव्या वर्षीही अतिशय चपळ होते, त्यामुळे त्यांच्या मेंदूचा अभ्यास बंगलोर येथील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ अँड न्यूरो सायन्सेस (निमहंस) ही देशातील अग्रगण्य वैद्यकीय संस्था करणार आहे.
आता यावरून काय लक्षात येते, की ज्योती बसूंचा मेंदू तपासायचा आहे, की ते पंचाण्णव्या वर्षी एवढे चपळ कसे. तपासा आमचे काय जाते? पण आता मुद्दा येतो की मग इतरांचे मेंदू का तपासायचे नाहीत? अतिरेकी एवढ्या लहान वयात, एवढे जीवावर उदार होऊन कामे करतात, त्यांना फाशीची शिक्षा दिल्यावर त्यांचासुद्धा मेंदू तपासा, कायकाय भरलंय त्यांच्या मेंदूत ते तरी एकदा कळू देत. म्हणजे तसेच धर्म आणि देशप्रेम आपल्या कोणाच्या मेंदूत भरता येईल काय? आता त्यावर संशोधन होणे जरूरीचे आहे. भारतात एवढा भ्रष्टाचार माजलेला आहे, त्यांचे ही मेंदू ते मेल्यानंतर तपासून, जतन करून ठेवावेत. शिवाय आताचे राजकारणी एवढे निगरगट्ट कसे हे सुद्धा त्यांचा मेंदू तपासून बघता येईल. जन्म झाल्यानंतर त्यांच्या मेंदूत अशी काय प्रक्रिया घडत होती, ते तरी संशोधनातून बाहेर येऊ देत. अशा सर्वांचे मेंदू जतन करून ठेवावेत, आणि जमल्यास हे मेंदू, जुने मेंदू काढून त्याजागी, रोपण करता येतात का ते पहावे. काही काही राजकारणी, भ्रष्टाचारी असे काही सुपीक मेंदू चालवतात, ज्याचे नाव ते. आम्ही तर म्हणतो अशा मेंदूचे एक कायमस्वरूपी संग्रहालय बनवावे. मग त्यात सर्वांचे मेंदू ठेवावेत.
राजकारणी जेव्हा शपथ घेतात, तेव्हाच त्यांच्याकडून देहदानाचे प्रतिज्ञापत्र करून घ्यावे. नव्हे तसा कायदा करावा. देहदानानंतर फक्त त्यांचा मेंदू काढून घ्यावा आणि बाकी निरूपयोगी भाग नातेवाइकांच्या स्वाधीन करावा. अंडरवर्ल्ड मधील जे अतिरथी महारथी आहेत त्यांचे मेंदू तर काय विलक्षण असतील ना! त्यांचा अभ्यास करणार्या डॉक्टरांनाच घेरी येईल.
खरे तर हा विचार आपल्या पूर्वजांना का सुचला नाही कोणास ठाऊक. नाहीतर आज आपल्याला चंगेजखान, हिटलर, नेपोलियन, सिकंदर, म.गांधी, नेहरू, लो.टिळक, इंदिरा गांधी वगैरेंचे मेंदू तपासून एक डाटा तयार करता आला असता. म्हणून आम्ही म्हणतो आपल्या पुढील पिढीसाठी, त्यांना स्फूर्ती येण्यासाठी आतापासूनच तयारीला लागले पाहिजे आणि कोणाकोणाचे मेंदू जमा करून त्यावर संशोधन करायचे आहे त्याची यादी बनवून त्याप्रमाणे संसदेत कायदा पास करून लगोलग त्याची अंमलबजावणी करावी.
No comments:
Post a Comment