दहावीच्या परिक्षा ४ मार्च पासून सुरू होणार आहेत. वर्षभर मुलांनी अभ्यास केला असेल, कोणी क्लासला जात असतील, कोणी होम ट्युशन लावली असेल, पणा सर्वंचे ध्येय एकच असेल, परोक्षेत चांगले मार्क मिळावेत. अशी अपेक्षा तर पालकांची सुद्धा असेल.
बघा परिक्षेत चांगले मार्क तर चांगले कॉलेज म्हणजे प्रवेश मिळणार, चांगले मित्र, मग चांगले संस्कार, मग पदवी परिक्षा पास होणार. चांगली गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळणार, स्वतःचे घर वगैरे होणार. मग जेव्हा आईवडिल लग्नासाठी मुलगी बघणार ती सुद्धा शिकलेली मिळणार, संसार सुखाचा होणार, आयुष्य मजेत, समाधानी होणार त्यातून आईवडिलांनासुद्धा जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटणार. मग पालक म्हणणार आम्ही समाधानाने डोळे मिटायला मोकळे. हे सर्व घडणार एका दहावीच्या परिक्षेत चांगले गुण मिळाले तर, मग फक्त आता दोनच महिने उरलेत अभ्यास करायला, मुलांने चला तर मग या शेवटच्या दोन महिन्यांचा पूर्ण उपयोग करून घेऊ यात.
१) प्रथम वेळेचे टाईम टेबल ठरवा. पहाटे ४ वाजता उठा. फ्रेश व्हा आणि अभ्यासाला बसा. जमल्यास एक कप चहा घ्या, म्हणजे आळस निघून जातो. आठपर्यंत पाठांतर करा, कारण ही वेळ पाठांतरासाठी चांगली. आठ नंतर आंघोळ, नाष्टा करावा आणि पुन्हा साडेआठला बसावे, आता लिखाण करावे ते दहा वाजेपर्यंत. काय लिखाण करावे तर जे पाठांतर केले ते आठवते का पहावे. नंतर शाळेचे तयारी. सायंकाळी सहा वाजता शाळेतून आल्यावर प्रथम फ्रेश होऊन काहीतरी खाऊन घ्यावे आणि पुन्हा सात ते नऊ अभ्यासाला बसावे. आता मात्र मोठयाने वाचूनच अभ्यास करावा, ही वेळ मनन करण्याची नाही. कारणा बाहेर फार गडबड असते आणि मन एकाग्र होत नाही म्हणून मोठयाने वाचून अभ्यास करावा. परत जेवण करून नऊ नंतर बसावे आणि धडे अथवा गाईड चाचून लिहीण्याचा सराव करावा. हा अभ्यास अकरा वाजेपर्यंत करावा यात थोडाफार बदल करण्यास हरकत नाही. पाच ते सहा तास झोप पुरेसी होते. उगीचच रात्रभर जागू नये, त्याने प्रकृतीवर परिणाम होते, परिक्षा देण्यासाठी आरोग्य ठीक पाहिजे ना?
२) आता ही वेळ आहे, सराव प्रश्नपत्रिका सोडविण्याची. बाजारात नवनीतचे सराव प्रश्नपत्रिकेचे पुस्तक मिळते, ते आणून त्यातील प्रश्न पत्रिका सोडवाव्यात. पण कशा तर, पाचही सराव प्रश्नप्रत्रिकेतील पहिला प्रश्न सोडवावा, म्हणजे बीजगणितातील पहिल्या प्रश्नात आठ प्रश्न असतात, तर ते आठच्याआठ मिळून चाळीस होतात, तर ते सर्व सोडवावेत, अशाप्रकारे दुसरा, तिसरा सर्व सोडवावेत. असाच अभ्यास सर्व विषयांचा करावा.
३) भाषेच्या निबंधात विषय ठरवावा, आणि सतत संध्याकाळच्या वेळेस निबंध वाचावेत, पुन्हापुन्हा वाचल्यास निबंध कसा लिहावा याचे ज्ञान होते. नंतर न बघता सराव करावा. आता गणिताचा अभ्यास करताना, गणिते सोडवायला वेळ नाही, तर गाणिते फक्त वाचावीत आणि रीती समाजावून घ्याव्यात. सायन्सच्या आकृत्यांचा सराव करावा. पण हे सर्व संध्याकाळी सहा ते नऊ पर्यंतच करावे.
४) एक मास्टर वही बनवावी त्यात गणिताची सूत्रे, सायन्स मधील सूत्रे, आकृत्या, महत्वाचे शब्द लिहून ठेवावेत म्हणजे ऐनवेळेस पुस्तकात शोधावे लागत नाही.
बाकी उद्या.
2 comments:
THAT'S GREAT for me because I also in 10th standard
माझा मुलगा १०वीला आहे. त्याच्यासाठी हे खूप उपयोगी आहे . खूप छान धन्यवाद !!!!!
Post a Comment