या वर्षी NBC-वर Outsourcd नवीन मलिका चालु होत आहे. काही ठराविक विनोद सोडता, मालिका चांगली वाटते. चालु झाल्यावर बघु अमेरिकन प्रेक्षक किती दिवस ते बघतात.
१ ते ९९ या अंकांच्या स्पेलिंगमध्ये कुठेही ‘A', `B'. `C', अणि ‘D' हे अक्षरे आढळत नाहीत. १०० या अंकाच्या स्पेलिंगमध्ये सर्वप्रथम ‘D' हे अक्षर आढळते.
१ ते १९९ च्या स्पेलिंगमध्ये ‘A’,`B', आणि ‘C' आढळत नाही. तर १००० च्या स्पेलिंगमध्ये प्रथमच ‘A' हे अक्षर येते.
१ ते ९९९,९९९,९९९ या अंकांच्या स्पेलिंगमध्ये ‘B' आणि `C' अक्षरे नसतात. बिलियनच्या स्पेलिंगमध्ये पहिल्यांदाच ‘B' हे अक्षर येते.
तर इंग्लिश अंकांच्या मोजदादीत कुठेही ‘C' हे अक्षर येतच नाही .
There is no A,B,C and D alphabets in the spellings of 1 to 99 and D alphabet enters first time in the spelling of number 100.
There is no A, B and D alphabet in the spellings of numbers 1 to 199, but A enters first time in the spelling of number 1000.
There is no B and C alphabet in the spelling of numbers 1 to 999,999,999 but alphabet B comes first time in the spelling of number `Billion'.
Very important nowhere there C alphabet in English number counting.
‘ सारे जहॉंसे अच्छा हिंदोस्तॉं हमारा ’ ‘ दूर हटो दूर हटो ए दुनियावालो, हिंदुस्थान हमारा हैं.’ इंग्रजांच्या काळांत भारताला हिंदुस्थान म्हणत. पण नंतरच्या काळात ‘ हिंदुस्थान ’ हा शब्दच गायब झाला आहे. स्वातंत्र्यानंतर भारत हा शब्द का स्वीकारला गेला? हिंदुस्थान का नाही? खरे तर हिंदूंचा प्रदेश म्हणजेच हिंदुस्थान. पण पध्दतशीरपणे, हा शब्द डावलला गेला. कोणातरी जमातीसाठी हा शब्द उच्चारणे जड होते म्हणून हिंदुस्थान हा शब्द सरकारी कामकाजातून बहिष्कृत केला गेला. ‘ स्टेट बॅंक ऑफ इंडिया ’, ‘ बॅंक ऑफ इंडिया ’ हे कशासाठी? इंडिया हा शब्द इंग्रजांनी आणला आता आपण ‘ स्टेट बॅंक ऑफ हिंदुस्थान ’ किंवा ‘ बॅंक ऑफ हिंदुस्थान ’ का नाही म्हणू शकत. हिंदुस्थान या नावात एवढे सामर्थ्य होते कि त्यामुळे या प्रदेशाशी असलेले हिंदूंचे नाते प्रकर्षाने जाणवते शिवाय स्वातंत्र्यलढा या हिंदुस्थानसाठीच झाला आणि स्वातंत्र्य सैनिकांनी हिंदूंच्या प्रदेशाच्या स्वातंत्र्यासाठीच हौतात्म्य पत्करले. नंतर मात्र राजकारण्यांनी कांही अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालना साठी हिंदुस्थानातून ‘ हिंदुस्थान ’ या शब्दाला हद्दपार केले.
जर भारतातील शहरांची नावे आपण बदलू शकतो तर हिंदूंची ओळख असलेल्या प्रदेशाचे नाव ‘ भारत ’ किंवा ‘ इंडिया ’ का? जगात हिंदू धर्माला वैदिक परंपरा आहे, हिंदूंना सुध्दा परंपरा आहे. स्वामी विवेकानंद, म. गांधी, पं जवाहरलाल नेहरु आदींसारखे नेते स्वत:ला हिंदू म्हणवून घेत. हिंदूस्थानाच्या स्वातंत्र्यासाठी लढले मग हिंदुस्थान या शब्दाला कोणी हद्दपार केले? ज्याज्या ठिकाणी भारत आणि इंडिया शब्द आहेत ते काढून त्या ठिकाणी हिंदुस्थान हाच शब्द योग्य आहे. जर स्वातंत्र्यावेळेस पाकिस्तान निर्माण होऊ शकते मग हिंदुस्थान का नाही?.
भारतीय न्यायव्यवस्थेने “ लिव्ह इन रिलेशनशिप ” ला मान्यता दिली आणि एक समुदाय या निर्णयामुळे सुखावला गेला, आता मजेत राहता येईल, कशाचीही जबरदस्ती नाही, कोणतेही पाश नाहीत. पण हा विचार तेवढ्या पुरताच होता. भविष्यात काय अडचणी येतील, याचा विचार ना न्यायव्यवस्थेने केला, ना संबंधित जोडप्यांनी केला. भारतात जाती, धर्म व्यवस्था किती कट्टर आहे, याचा अनुभव पदोपदी येतो, यात भर म्हणूनच काय, सध्याची जनगणना सुध्दा जातीनिहाय होणार आहे.अर्थात, याचेही दुष्पपरिणाम जाणवणार आहेत आणि ते एवढे भयंकर असणार आहेत कि, मागे फिरु म्हणता ही फिरता येणार नाही, एवढी परिस्थिती हाताबाहेर गेलेली असेल.
असो. तर परवा न्यायालयासमोर अजून एक प्रश्न आला, “ लिव्ह उन रिलेशनशिप ” मध्ये राहणार्या प्रेमींना अपत्य झाले, आणि पूर्वजांच्या मालमत्तेत वाटणी करताना या अपत्याचा प्रश्न आला कारण एकाच कुटुंबातील काही लग्न केलेले तर एखादा लग्न न करता तसाच संसार करीत असेल, आणि त्यांना अपत्य झाल्यास त्याला वाडवडिलांच्या संपत्तीत वाटा मिळेल का? यावर हा वाद गेला कोर्टात.कोर्ट पण किती अजब त्याच कोर्टाने निकाल दिला लिव्ह इन रिलेशिपमधून झालेल्या वारसास वाडवडिलांच्या मालमत्तेत हिस्सा मिळू शकत नाही. आता आली का पंचाईत. एकीकडे कोर्ट परवानगी देते पण दुसरीकडे त्यांच्या अपत्यांना न्याय नाही. आता असा विचार होतो, कि त्या बिचार्या मुलाची काय चूक, की त्याचा जन्म “ लिव्ह इन रिलेशनशिप ” मधून झाला !
हा ! तर आता खरे त्याचे दुष्पपरिणाम दिसू लागलेत. उद्या त्या मुलांच्या लग्नाचे काय? कोण त्यांच्याशी सोयरिक करणार? जी विवाहसंस्था जगाने, सर्व धर्मानी मान्य केली त्याचे काय? जर त्या पतीपत्नीत वाद निर्माण झाले तर ते समाजाने सोडवायचे का? कोणत्या समाजाने? जर कोणाचा मृत्यु झाल्यास त्याचे अंत्यसंस्कार कशा प्रकारे करायचे? शेवटी त्या दोघात काही भावनिक जिव्हाळा असेल काय? जर जोडीदारांपैकी कुणा एकाचा मृत्यु झाला तर दुसर्याची जबाबदारी कोणत्या समाजाने, कोणत्या धर्माच्या आधाराने घ्यायची? या सर्व प्रश्नांना आणि त्यांच्या परिणामांना फक्त तेच जबाबदार आहेत, ज्यांना या अशा अधार्मिक, नियमबाह्य, विवाहसंस्था मोडीत काढून परवानगी दिली.
२८ मे २०१० रोजी रात्री ज्ञानेश्वरी एक्सप्रेसवर हल्ला झाला आणि कित्येक लोकांनी प्राण गमावले हा हल्ला माओवादी संघटनेने केला असे बोलले जाते. या हल्ल्यास जबाबदार असणार्या पीसीएपीए या संघटनेचा नेता म्हणतो, “ सॉरी, मला माफ करा, आम्हाला मालगाडी उडवायची होती पण, चुकीने प्रवासी रेल्वे उडवली गेली ”. अरे वा ! काय पण विनयशीलता ! अगदी क्षमा मागून मोकळे झाले, संघटनेचे नेते, बापी महातो. मग ज्यांचे नातेवाईक गेले, ज्यांचे संसार उघड्यावर पडले त्यांचे काय? पीसीएपीए संघटनेचे नेते, कार्यकर्ते याची भरपाई करणार आहेत काय? त्यांना जर कोणी गोळी घातली आणि सॉरी म्हटले तर? त्यांच्या कुटुंबीयांचे कोणी हाल केले आणि त्यांनी क्षमा मागितली तर? फार फार भयंकर आहे या भारतात. तो नेता, क्षमा मागतो पण प्रायश्चित्ताची भाषा करतो काय? प. बंगालचे पोलिस महासंचालक जेव्हा या हल्ल्याचा सूत्रधार बापी महातोच आहे म्हणतात आणि त्याचा शोध घेण्याचे जारी करतात, तेव्हा या बापी महातोला कोलांटी उडी मारण्याची बुध्दी होते, आणि आपले सरकारही त्याने माफी मागितली म्हणून त्याला क्षमा करेल.
रेल्वेमंत्री ममता बॅनर्जीच तर औरच, त्यांनी रात्रीच्या गाड्याच बंद करण्याचे फर्मान सोडले. जर दिवसा हल्ले झाले तर मग काय दिवसाही गाड्या बंद करणार? अहो अशाने या दहशतवाद्यांपुढे गुडघे टेकल्यासारखे होऊन तो भाग त्यांना आंदण दिल्यासारखे होईल? एखाद्या गावावर दहशतवाद्यांनी हल्ला केला तर त्या गावातील लोकांना गाव सोडून द्यायला सांगून तो भाग दहशतवाद्यांच्या हवाली करणार काय? हे सरकारचे धोरण आहे, हेच अतिरेक्यांना धीट करते. जर फाशीचे शिक्षा झाली आणि लगेचच त्या आरोपीला फाशी दिली गेली तरच त्या फाशीला अर्थ आहे, नाहीतर कागदोपत्रीच फाशीचा काय उपयोग. कसा आरोपींना धाक राहणार.
संसदेवर हल्ला झाला तर काय लोकसभेचे कामकाज दुसरीकडे जंगलात चालू करणार का? हा शुध्द पळपुटेपणा आहे आणि हा भारतीय नेत्यांनीच करावा, आणि त्याचे परिणाम भारतीय जनतेने भोगावेत, हेच भारतीयांच्या नशीबाचे भोग आहेत. तेव्हा चला पासपोर्ट व्हिसा काढा आणि परदेशी स्थायिक व्हा. मग तिथे बसून म्हणा ‘ मेरा भारत महान ’.
भारतात पहिली जनगणना १८७१ इंग्रजांच्या राजवटीत झाली. त्या जनगणनेत सर्व जातींची गणना करुन मुस्लिमांच्या पोट जातींचीही, पंथांचीही गणना करण्यात आली होती. नंतरच्या १९०१ च्या जनगणनेत भारतात एकंदर १६४६ विविध जाती आढळून आल्या, आणि त्याच जातींची संख्या १९३१ च्या जनगणनेत ४१५० पर्यंत वाढल्या म्हणजे हा फरक काय असावा? १९०१ च्या गणनेत लोकांनी आपली जातच लपविली का? पण ते कसे शक्य आहे.?
एकेकाळी आपण उच्च जातीचे आहोत हे सांगण्यासाठी लोक पुढे सरसावत. उदा०. १९२१ च्या जनगणनेत एकाने हलकी जात सांगितली असेल तर तोच मनुष्य १९३१ च्या जनगणनेत ब्राह्मण जात सांगत असे. कारण त्या काळी जातीवरुन राजकारण होत नव्हते तर, सामाजिक वर्तनात फरक पडत होता. १९५३ मध्ये शेवटची जातीनिहाय जनगणना झाली. त्यानंतर सरकारने हि पध्दत बंद केली.
काय जमाना बदलतो बघा, लग्न करताना लोक उच्च जात बघतात तर सरकारी नोकरी,शैक्षणिक फायदे, आरक्षण मिळविण्यासाठी आपण अनुसूचित जमातीचे कसे आहोत हे सांगण्याची स्पर्धा होते. उच्च जातीचे लोकही आज सरकारकडे अर्ज करत आहेत, त्यांना ओ. बी. सी. मध्ये समावेश हवा आहे. त्यासाठी समाजकल्याण मंत्रालयात कोटींनी लाच देण्यासाठी वर्गणी काढायला समाजातील घटक तयार आहेत. मुस्लिम, ख्रिश्चन धर्मीयही जातीची नोंद करण्याचा आग्रह धरतात. हा सर्व खेळ राजकारण्यांचा आहे. सर्व गणना झाल्यावर प्रदेशाप्रमाणे जातींची संख्या लक्षात घेऊन, निवडणूक लढवताना त्याप्रमाणे आराखडे आखता येतील, हे उघड आहे. विशिष्ट नेत्यांची पोळी भाजली जाणार हे उघड सत्य आहे.
या जातीनिहाय जनगणनेस शिवसेनेने आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विरोध केला आहे. या नोंदणीतून जातीजातीतील युध्द भडकणार हे निश्चित आहे. संसदेत आणि विधानसभेत ओबीसींना आरक्षण हवे आहे, त्यामुळे जातीव्यवस्था आणखी संवेदनशील होणार यात शंका नाही. आत्ताच नक्की आकडेवारी नसताना टोकाचे राजकारण खेळले जाते तर जातगणना झाल्यावर ठराविक प्रदेशांवर, वस्त्यांवर किती अत्याचार होतील, याचा कोणी विचार केला आहे काय?
उदा. मुंबईतील परळ भागात कोणत्या जातीचे लोक, काय संख्येने आहेत हे समजल्यावर नेते मंडळी त्या भागासाठी काय भूमिका घेतील हे देवच जाणो. जर प्रेमविवाह जातीपातीच्या पुढे जाऊन होतात तर जात गणना काय कामाची? स्त्री आणि पुरुष, हे सध्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाने वागतात तर ते आपली जात आता कोणती सांगणार. आत्ताच्या जमान्यात आंतरजातीय विवाह होतायेत त्याबद्दल कोणालाही काहीही आक्षेप येत नाही तर उद्या आंतरधर्मीय विवाह होऊ लागले तर, जात हा शब्द जातच राहील आणि हातात काय उरेल? भली मोठी पोकळी.
दिनांक २२ मे २०१० रोजीच्या वर्तमानपत्रात एक प्रमुख बातमी होती, अमेरिकेतील डॉ. क्रेग व्हेंटर आणि त्यांच्या सहकार्यांनी प्रयोगशाळेत सजीव प्रजातीची निर्मिती केली. खरोखर त्यांनी निर्जीव वस्तुमधून सजीव निर्माण केला काय? मग जणू ते साक्षात विश्वामित्रच झाले म्हणा ना! आता आपणा जीव आणी जीवन समजावून घेऊ यात. पेशी हा जीवनाच सर्वात मुलभूत घटक आहे. पेशींचे कार्य म्हणजेच जीवनकार्य. मानवासारखा प्राणी बहुपेशीय आहे. या पेशी वेगवेगळ्या समूहात कार्य करतात. पेशींची अंतर्गत रचना फार गुंतागुंतीची असते. यात बाह्यावरण, आंतर आवरण, पेशीद्रव्य, रासायनिक संयुगे, आणि लाखो प्रथिने असतात. पेशीत केंद्रक असते, आणि या केंद्रकात डीएनएपासून बनलेली गुणसूत्रे असतात. ह्या DNA मध्ये A-अडेनाईन, T- थायमाईन, G-गॉनाईन, C-सायटोसीन अशा चार मूळ रसायनांच्या साखळ्या असतात. DNAचा रेणू म्हणजे चार अक्षरसमूहांची करोडे बेस असलेली साखळीच.
अशा काही हजार बेसेस प्रयोग शाळेत तयार करणे शक्य आहे, पण सलग गुणसूत्र तयार करणे शक्य नाही. मग यावर उपाय काय तर हे छोटे तुकडे एकत्र जोडणे, आणि हेच अवघड काम आहे. सध्याच्या प्रयोगात डॉ. व्हेंटर यांनी १०८६ बेसे लांबीचे छोटे DNA चे तुकडे करून ते मग एकत्र जोडून मोठा DNA तयार करण्याचे तंत्र विकसित केले. आणि हेच फार महत्वाचे आहे. डॉक्टरांनी प्रयोगशाळेत मायकेप्लाज्मा मायकोडीस ह्या जिवाणूचा १० लाखाहून जास्त बेसेस लांब असलेला संपूर्ण DNA तयार केला. आणि हा DNA मायकोप्लाज्मा काप्रिकोलम ह्या जिवाणूच्या पेशीत, शरीरात म्हणू यात संक्रमित केला. आता त्यांच्या असे लक्षात आलेकी, नव्या प्रत्यारोपित मायकोप्लाज्मा मायकोडीसचा DNA घेऊन वाढणार्या पेशी मायकोप्लाज्मा काप्रीकोलमच्या मिळाल्या. त्याचा त्यांनी अभ्यास केल्यावर असे आढळून आले की, ह्या पेशी काप्रीकोलमच्या नसून मायकोडीसच्या झालेल्या आहेत. म्हणजे त्यांनी काय केले, DNAची लांब साखळी तयार केली, जी कोणालाही शक्य नव्हती, आणि तिचे दुसर्या पेशीत प्रत्यारोपण करून, त्या पेशीची वाढ केली. A पदार्थाचे DNA काढून B पदार्थात घालून A चे B त रूपांतर केले, पण लक्षात घ्या B पदार्थ तयार केला नाही. प्रयोगशाळेत DNA चे रूपांतर करता आले,पण ’सजीव’ निर्माण करता आलेला नाही. म्हणजेच नवी पेशी निर्माण करून तिची वाढ करता आलेली नाही. DNA म्हणजे संपूर्ण पेशी नव्हे. कारण पेशीत इतर अनेक घटकही असतात.
दिनांक २५ मे च्या वर्तमानपत्रात एक अतिशय महत्वाची बातमी लक्ष वेधून घेत होती, ती म्हणजे डॉ. रमेश भोंडे आणि डॉ सतीश पत्की यांनी शोध निष्कर्ष काढला की, मानवाला वरदान ठरलेल्या मूळ पेशी (स्टेम सेल्स) मातेच्या दुधात असतात. आणि या मूळ पेशींच्या सहाय्याने बालमृत्यु रोखता येतील. हा त्यांचा शोध ’ह्युमन सेल’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकाने स्वीकारला आहे.
यात अतिशय महत्वा गुणधर्म आढळला, की या मूळ पेशींचे विभाजन होते. आणि या पेशी तरंगतात. आईच्या दुधातील मूळ पेशींचा वापर करून स्वादुपिंडाच्या पेशी, मेंदूतील चेतातंतू आणि हाडातील निर्मीती करण्यात यश येईल.
मूळ पेशींचा अर्थ असा, मूळ पेशींमध्ये अमर्याद काळपर्यंत विभाजन होण्याची क्षमता असते. त्या शरीरातील कोणत्याही अवयवातील पेशींमध्ये परावर्तित होतात. वाढत्या वयामुळे मूळा पेशींची संख्या कमी होते, तेव्हा या पेशी त्याठिकाणी पुन्हा रोपण करता येतील. असा शास्त्रज्ञांचा दावा आहे. स्टेम सेल्स चिरंतन असतात.
अजून एक महत्वाचा शोध म्हणजे, शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत कृत्रिमरित्या पेशीची निर्मिती केली. शिवाय त्या पेशींचे विभाजनही होते.
कसाबसारख्या निर्दय घातपात्याला शिक्षा देतांना न्यायालय म्हणते, जर त्याला वेळेत फाशी दिले नाहीतर, त्याच्या सुटकेसाठी दुसरे घातपाती प्रकर्ण भारताला सोसावे लागेल. न्यायालयाचा रोख अफझलगुरूच्या रेंगाळलेल्या फाशीकडे आहे. आता न्यायालये सुद्धा सरकारचे कान उपटत आहेत, पण शेवटी सरकार म्हणजे कोण? एक वेगवेगळ्या विचारांची, आचारांची बांधलेली मोळी.
अफझलगुरूने १३ डिसेंबर २००१ रोजी संसदेवर हल्ला केला. त्यात अफझलगुरू हा पुराव्यानिशी दोषी ठरला आणि त्याला न्यायालयाने १८ डिसेंबर २००२ रोजी फाशीची शिक्षा सुनावली. फाशीच्या शिक्षेला हायकोर्टात मान्यता लागते म्हणून हे प्रकरण हायकोर्टात जाऊन तिथे २९ ऑक्टोबर २००३ रोजी फाशीवर शिक्कामोर्तब झाले. तेव्हा या निकालावर आरोपीच्या वकीलांनी सुप्रीम कोर्टात अपील केले तेथेही ४ ऑगस्त २००५ रोजी फाशी कायम झाली. दिल्ली सत्र न्यायालयाने २० ऑगस्ट २००६ हा दिवस फाशीसाठी नक्की केला. या दिवशी तिहार जेलमध्ये फाशी दिली जाणार होती, परंतु त्याची बायको,अफसान गुरू हिने राष्ट्रपतीकडे दयेचा अर्ज केला आणि मग त्याची लम्बी कहानी सुरू झाली. आजपर्यंत त्यावर विचार चालला होता, आणि असे जवळजवळ ५० अर्ज प्रतिक्षेत आहेत. सर्व आरोपी मजेत सरकारी पाहुणचार झोडत आहेत. कसाबला जेव्हा फाशीची शिक्षा सुनावली गेली तेव्हा पुन्हा हे प्रकरण कबरीतून उकरले जाऊन अफझलगुरूच्या फाईलवरील धूळ झटकली गेली. आणि पुन्हा त्याचा काथ्याकुट चालू झाला.
मतांच्या राजकारणासाठी तर त्याच्या फाशीचा निकाल होत नसेल ना? सरकारला देशाच्या सुरक्षेची चाड नाही काय? का सरकार दहशतवाद्यांना घाबरून आहे? जर अफझलगुरूला फाशी द्यायला सरकारचे हातपाय थरथरतात तर हे सरकार दहशतवाद कसा रोखणार? सामान्य नागरीकांनी रोज सकाळी कामावर जाताना बायकोचे कुंकू पुसून जायचे काय? आता सामन्य जनतेने क्रांती करण्याची वेळ आलेली आहे.
भारतात दर दहा वर्षांनी जनगणना होते आणि त्यावरून भारताची लोकसंख्या कळते. पण फक्त आकडाच कळतो. मग ह्या जनगणनेला काय अर्थ उरतो. जनगणना करतांना एका वाक्यात चालू सरकारबद्दल लोकांकडून मत नोंदवून घ्यावे, म्हणजे किती लोकांना हे सरकार पाहिजे ते कळेल.
या वेळेस लालूप्रसाद आणि मुलायमसिंगांच्या सहकार्यांनी सरकारला जनगणना जातीच्या आधारावर करण्यास भाग पाडले. म्हणजेच या जनगणनेत लोकांची जातही विचारली जाणार आहे. जातीच्या राजकारणामुळे आज देश कोणत्या थराला गेला आहे, जातपातीमुळे देशात कोणकोणती संकटे उभी आहेत, हे सरकारला कळत नाही काय? ’जी जात नाही ती जात’ हे विधान आज सरकारने खरे ठरवले आहे. हे सर्व जे चालले आहे ते मतांसाठीहे न कळण्याइतकी भारतीय जनता आता भोळी राहिलेली नाही. सर्व राजकीय पक्षांना लोकांच्या जातीशी काहीही देणेघेणे नसते, ते आता आपली वोट बॅंक तयार करणार. कारण या जनगणनेवरून कोणत्या भागात कोणत्या जातीचे लोक राहतात,यावरून राजकारण खेळले जाणार, हे उघड आहे.
जो कोणी आपली जात सांगेल, त्याला काय जातीचा दाखला मागणार काय? का त्याला समाजकल्याण खात्याचे व्हेरिफिकेशन मागणार? तो सांगेल ते जात खरी कशावरून? जर त्याने अशी जात सांगितली तर सरकार काय मदत करणार आहे.
जातीनिहाय जनगणना भविष्यात भारताला फार महाग पडणार आहे, एवढे बाकी निश्चित. ही जनगणना नसून जातगणना आहे.
आजच्या संगणकाच्या युगात आपण भारतीय आद्य वेद विसरत चाललो आहोत. त्यातीलच एक प्रकार म्हण्जे ’वैदिक गणित’. म्हणजे मोठमोठे भागाकार, गुणाकार, वर्ग, घन, समीकरणे वगैरे चुटकीसरशी कशी सोडवायची. याचे सखोल ज्ञान अथर्ववेदात विखुरलेले आहे. यात एकंदर सोळा सूत्रे आणि उपसूत्रे आहेत, या सुत्रांच्या अधारे कोणत्याही प्रकारचे उदाहरण कमीतकमी वेळात व श्रमात सोडवता येतं. आणि याचे सर्व श्रेय गोवर्धनमठ ( जगन्नाथपुरी ) चे शंकराचार्य ब्रम्हलीन स्वामी भारती कृष्ण तीर्थ यांना जातं. यांचा जन्म १८८४ चा. मूळ नाव वेंकटरमण. १८९९साली मद्रास विद्यापीठाने त्यांना ’ सरस्वती ’ ही पदवी बहाल केली.
वैदिक गणितात एकंदर १६ सूत्रे आणि तितकीच उपसूत्रे आहेत. उदा. निखिलम्, उर्ध्वतिर्यग्भ्याम्, आनुरूप्येण, शेषाण्यङ्केन चरमेण, एकाधिकेन पूर्वेण, एकन्योकेन पूर्वेण वगैरे.
विद्यार्थ्यांच्या मनात गणिताबद्दल भय व तिटकारा असतो, कारण शाळांमधून शिकवली जाणारी पद्धत. आज भारतात अशा गणिताची जरूरी आहे. परदेशात वैदिक गणित शिकविण्यासाठे वेगळा विभाग आहे. आपल्या वेदांमधून उचलून परदेशी विद्यापीठात वैदिक गणित शिकवले जाते आणि आम्ही...!
अजूनही वेळ गेलेली नाही. आता आपण वैदिक गणित शिकले पाहिजे, न पेक्षा याचा भारतात प्रसार झाला पाहिजे. स्वामीजींनी शोधून काढलेल्या वैदिक गणितातील सर्वच पद्धती सोप्या, सुटसुटीत व मनोरंजक आहेत.
आज्च्या युगात गणिताला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेले आहे. दैनंदिन जीवनातील प्रत्येक गोष्टीसाठी गणित लागते. गणिताशिवाय विज्ञान व तंत्रज्ञानाची प्रगती अशक्य आहे. समाजामध्ये गणिताविषयी एक प्रकारचे भय दाटले आहे, अगदी अमेरिकेतही हीच परिस्थिती आहे. म्हणून आज या वैदिक गणिताची अत्यंत आवश्यकता आहे.
रविवार दि.१५ मे रोजी ’अक्षयतृतीया’ आहे, त्या निमीत्ताने. अक्षयतृतीया म्हणजे ज्या तिथीचा कधीही क्षय होत नाही. वैशाख मासातील शुद्ध तृतीयेला ’अक्षयतृतीया’ म्हणतात. यादिवशी कृत युगाला सुरूवात झाली, म्हणून कृत युगात या देवसाला पाडवा म्हणत. यादिवशी ब्राह्मणाला पाण्याचा कलश दान करतात, त्याने विष्णू, शिव आणि पितरांचे तृष्णाशमन होते. या दिवशी शेतकरी शेताच्या कामाला सुरूवात करतात. ते लोक वसंतोत्सव साजरा करतात. या दिवशी दान, हवन केलेले क्षयाला जात नाही, आणि पितरांविषयी केलेले कार्य अविनाशी होते. महत्वाचे म्हणजे या दिवशी सोने खरेदी करून घरातील सोन्यात ठेवल्यास सोने कधिही चोरीला जात नाही, ते अक्षय मालकाजवळच राहते. जर बुधवारी अक्षयतॄतीया आल्यास, त्या दिवसाचे दान जन्मजन्मांतरी प्रभावी ठरते. या दिवशी जो ताक दान करतो तो धनवान होतो.
अक्षयतृतीयेला भगवान परशुरामांचा जन्म झाला. त्यावेळेस सत्ययुग आणि त्रेतायुग यांवा संधिकाल होता म्हणजेच सत्ययुग संपून त्रेतायुग सुरू होत होते. त्रेतायुग आणि द्वापारयुगाच्या संधिकाली श्री प्रभु रामचंद्रांचा जन्म झाला. यादिवशीही अक्षयतृतीयाच होती. म्हणजेच युग प्रारंभ अक्षयतृतीयेला होते, एवढे महत्व या तिथीला आहे. श्रीराम आणि परशुराम यांच्याबद्दल सर्वसामान्य लोकात अनेक गैरसमज आहेत. या दिवशी परमपिता भगवानांच्या दिव्य आणि भव्य कार्याचे स्मरण करावे.
जे लोक या दिवशी भगवान श्रीकृष्णाला चंदन विलेपन करतात, ते वैकुंठ लोकाला जातात. यादिवशी आपण जे जे काही करू ते निरंतर अक्षय राह्ते, म्हणून पुण्य कर्मच करावे. या दिवशी श्राद्ध अथवा तर्पण केल्यास पितर मुक्त होतात. यादिवशी कुलदेवतेची पूजा केल्यास अक्षय कृपा राहते. यादिवशी आंबरसाचा नैवेद्य दाखवावा, आणि आंबे खायला सुरूवात करावेत.
रविवारी अक्षयातृतीया असून मृग नक्षत्र आहे. सुकर्मा योग आहे. तैतिल करण असून चंद्र मिथुनेत आहे. गुरू मीनेत असून सूर्य वृषभेत आहे.
या दिवशी थोडेका होईना, आपल्या ऐपतीप्रमाणे सोने खरेदी करा.
भारतात केंद्र सरकारने एक कायदपास केला, या वर्षी पासून आठवीपर्यंत कोणाही विद्यार्थ्याला नापास करायचे नाही. आणि या वर्षापासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. कोणाच्या डोक्यात असले खूळ येते कोण जाणे. याचे भविष्यात किती गंभीर परिणाम होतील याची कोणीच कशी दखल घेत नाही? आठवी पर्यंत परिक्षा नाही म्हणजे कोण अभ्यास करील. शिक्षक कशाला गंभीरतेने शिकवतील? आणि पालक काय आनंदीच. पण तोच विद्यार्थी नववीला आला तर त्याला नववीचा अभ्यासक्रम झेपेल काय? मग तेव्हा परिक्षेत नापास होणार्या मुलांचे काय? दहावीचे काय? या निर्णयाचे समर्थन करताना सांगण्यात येते की, विद्यार्थी अभ्यासाच्या ताणामुळे आत्महत्या करताहेत, अरे, हे काय कारण झाले? आत्महत्या का करतात याचे कारण शोधून काढले पाहिजे. जर उद्या दहावीच्या मुलांनी आत्महत्या केल्यातर दहावीची परिक्षा रद्द करणार काय? आम्ही मागे एकदा येथेच ब्लॉग मध्ये म्हटले होते की, दहावीच्या परिक्षेत कोणालाही नापास करायचे नाही. सर्वजण पास. ज्याला जसे मार्क मिळतील तसा त्याचा फायदा होईल. आणि बघा आमची भविष्यवाणी खरी ठरायची वेळ आली आहे.
अशा जर परिक्षा न होऊ लागल्या तर आपण स्पर्धेपासून मुलांना लांब ठेवत आहोत, आणि मग त्यांना जागतिक स्पर्धेत आपण कसे उतरवणार? यामुळे आपण एकच, नाहीतर भविष्यातील सर्व पिढ्या बरबाद करत आहोत याचे जाणीव कोणालाही नाही, अगदी पालकांनाही नाही. या देशातील विध्यार्थ्यांचे दुर्दैव दुसरे काय! काही दिवसानंतर शाळा ही संकल्पनाच भारतातून नष्ट होऊ नये म्हणजे मिळवले.
साधारण १९६० साली राजकपूरचा हिन्दी चित्रपट आला होता, ’जिस देशमे गंगा बहती है’ त्यात राजकपूर एक वाक्य म्हणतो आमच्या भारत देशात भिकार्याला सुद्धा भीक द्यायची नसेल तर आम्ही म्हणतो,"बाबा, माफ कर." त्याचीही आम्ही माफी मागतो. लक्षांत घ्या I am sorry किंवा मला माफ करा हे शब्द आयुष्यात फार महत्वाचे आहेत. क्षमा मागायला सुद्धा फार मोठे मन लागते. कोणालाही ते जमत नाही. त्याचा आणि शिक्षणाचा सुद्धा संबंध नाही. रस्त्याने जाताना चुकून धक्का लागला तर फक्त म्हणा sorry बघा काय चमत्कार घडतो, नाहीतर महाभारतच. कधी कधी समोरासमोर माफी मागणे जड जाते, अहंकार दुखावतो, नंतर फोनवर माफी मागा, गुलाबाचे फूल किंवा बुके पाठवा परिणाम चांगला होईल. क्षमा मागणे म्हणजे कमीपणा नाही तर तो मनाचा मोठेणा दर्शवतो.
माझ्या माहितीत एक कुटुंब होते, अगदी सुखी. एकदा काय झाले याच्या आवडीची भाजी तिने केली नाही म्हणून त्यांच्यात शाब्दिक वाद झाले, दोघांनीही अबोला धरला. त्यांच्यात प्रश्न पडला, पहिल्यांदा कोणी बोलायचे, कोणीही माफी मागायला तयार नाही. कित्येक वर्षे हा संसार चालला होता. पण ते एकमेकांची सुखदुःखेसुद्धा जाणून घेत नसत. नंतर पुन्हा काही रागाने तो घर सोडून निघून गेला, तर तिने साधी चौकशी सुद्धा केली नाही. त्याचे बाहेर फार हाल झाले. नंतर तो खलास झाला पण ती त्याला बघायला सुद्धा गेली नाही. संसाराचे वाटोळे झाले. पण त्याच वेळेस कोणीतरी माफी मागितली असती तर ? जैन धर्मात क्षमायाचना दिन पाळतात. या दिवशी शांतपणे विचार करून झालेल्या चुकांबद्दल माफी मागायची असते.
लक्षांत घ्या आपण केलेल्या चुकांची आपल्याला जाणीव होते, मनातल्या मनात आपल्याला ते बोचते, पण आपण ते उघड करू शकत नाही, मग आपल्याला त्रास होतो त्यापेक्षा उघड माफी, क्षमा मागून बघा मनावरील किती ओझे हलके होते ते. I am sorry हे शब्द जीवन बदलतात.
रात्री अंथरुणावर झोपायच्या आधी हात जोडून म्हणा," मी माझ्या पवित्र आत्म्याने, सर्व आत्म्यांची माफी मागत आहे. जर दिवसभरात माझ्याकडून काही चुक झाली असल्यास अथवा कोणी दुखावले गेले असल्यास मला, माझ्या आत्म्याला क्षमा करावी"
पूर्वीच्या काळी गावोगावी बाजार भरत असे आणि त्या बाजारात कोंबडे, बकरे एवढेच काय पैलवानही विक्रीला ठेवत. खरेदी करणारा काय करीत असे तर त्यांना खरेदी करून त्यांची एकमेकात झुंज लावत असत, त्यावर मग बोलीही लागायची. ज्यांच्यात झुंज असे तो कोठला याला काहीही किंमत नसे. झुंज लावणारे झुंज बघायला प्रेक्षकांकडून पैसे घेत. आता जी भारतात I.P.L. क्रिकेट स्पर्धा गाजते आहे, तो काय प्रकार आहे, ह्याच झुंजीचा ना? खेळाडूंची कोणीतरी लिलावाप्रमाणे बोली लावतो, आणि तो खेळाडू सर्व मान अपमान कंबरेला गुंडाळून त्या त्या मालकाकडून खेळतो. जे खेळाडू आधी देशाकडून खेळत, तेच स्वाभिमान विसरून झुंज खेळत आहेत. कोंबड्यांच्या झुंजीची कल्पना करा, आणि त्याची I.P.L. शी तुलना करा, कोंबड्यांची झुंज तरी बरी वाटेल.
या I.P.L. मुळे भारताचे राजकारण ढवळून निघाले आहे. परदेशी खेळाडू कोट्यावधी रूपये कमावत आहेत आणि आपण भारतीय काळ्या बाजारात तिकीटे घेऊन सामन्यांसाठी गर्दी करतो, टी.व्ही.जवळ बसून तासन्तास खर्ची घालतो. देशाभिमान नाहीच. केवळ कोंबड्याच्या झुंजीची मजा.
एक प्रसिद्ध बाबा म्हणाले, हा पैसा जर काळ्याबाजारातून, स्विस बॅंकेतून येत असेल, आणि आपल्या खेळाडूंना मिळत असेल तर मिळू देत ना? राजकारणी जो पैसा स्विस बॅंकेतून आणू शकले नाहीत, तो पैसा या निमीत्ताने जर भारतातील खेळाडूंना मिळत असेल तर काय बिघडले?
उलट या झूंजी सरकारमान्य करा, त्यावर कर लावा, करमणूक कर लावा, आणि पैसा कमवा. असेच प्रकार दुसर्या क्षेत्रातही चालू करा.
ऑक्सिजनशिवाय जिवंत राहणारे आणि प्रजनन करणारे प्राणी शास्त्रज्ञांना सापडले आहेत. हे प्राणी भूमध्य समुद्राच्या तळाशी असलेल्या जमिनीवर राहतात. इटलीतील अॅक्नोना विद्यापीठातील शास्त्रज्ञ रॉबर्टो डॅनोव्हारो यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन करण्यात आले. त्यांनी लॉरिसीफेरा समूहातील तीन नव्या प्रजाती शोधून काढल्या आहेत. त्यांनी सांगितले की हे प्राणी आकाराने एक मिलीमीटर असून ते कवचधारी आहेत.
कवचात ते जेलीफीशसारखे दिसतात. त्यांच्यावर अधिक संशोधन केल्यावर त्यांना आढळून आले, की हे प्राणी ऑक्सिजनशिवाय जिवंत आहेत. या तीन प्रजातींपैकी एका प्रजातीला स्पिनोलोरिकस सिंझिया असे नाव देण्यात आले आहे. तर इतर दोन प्राण्यांना रूलीलोरीकस आणि प्लीसिलोरिकस अशी नावे देण्यात आली आहेत. आजपर्यंत केवळ जीवाणू म्हणजे बॅक्टेरियाच ऑक्सिजनशिवाय राहू शकतात, अशी समजूत होती. परंतु निसर्गाने ही समजूत खोटी ठरवली आहे. इतक्या वर्षांनंतरही अजूनही नवनवीन चमत्कार निसर्गात सापडत आहेत, म्हणजे अजूनही मानव भटकत आहे. पण आता हे प्राणी ऑक्सिजनशिवाय कसे जिवंत राहू शकतात हे शोधून काढण्यात शास्त्रज्ञ गुंतले आहेत. शिवाय अजून एक चमत्कार म्हणजे हे प्राणी अंडी देत असल्याचे आढळून आले आहे.
आता आम्ही असा विचार करतो की, ते प्राणी पेशींपासूनच बनले असतील ना? मग त्या पेशी ऑक्सिजनशिवाय कसे चलनवलन करतात. त्यांच्या शरीरातील अवयव कसे काम करत असतील? ते दुसरा कुठलातरी वायू शोषून घेत असतील काय? प्रयोगशाळेत त्यांच्या पेशींची वाढ करून त्यांच्यापासून मनुष्य प्राणी निर्माण केले तर? (क्लोन). मानवाला दुसर्या ग्रहांवर जाण्याचा मार्ग मोकळा होईल.
याबद्दल सखोल संशोधन करता येईल. मी माझ्या प्रयोगशाळेत हा प्रयोग करणार.
( शास्त्रज्ञाचे मनोगत)
आपल्या आयुष्यातील सर्वात कंटाळवाणा काळ कोणता तर कोणाची तरी वाट पाहणे. समजा कोणीतरी आपल्याला भेटायला एका ठिकाणी बोलावले आहे, आणि आपण त्याठिकाणी वेळेवर पोहोचतो, पण पलिकडचा इसम वेळेवर येत नाही, अशी चिडचिड होते पण आपण काही करू शकत नाही. बरं जाता पण येत नाही. काय करणार? अशा वेळेस एक उपाय असतो. प्रथम मनाचे समाधान करून घ्या, अरे तो ट्रॅफीक मध्ये अडकला असेल तर तो बिचारा काय करणार? बरं अशी वेळ आपल्यावर आली असती, आणि तो वाट पहात असता तर? बघा लगेच चिडचिड कमी होते की नाही. डॉक्टरची, वकीलाची वेळा ठरवून आपण त्यांच्याकडे जातो पण तेथेही वाट पहावे लागते, पण पर्याय नसल्याने स्वतःशीच चिडतो, अशा वेळेस जातानाच विचार करून जा की, तेथे आपल्या थांबावे लागणार आहे आहे तेव्हा एखादे पुस्तक वाचायला न्या, मग बघा कसे बरे वाटते. आजूबाजूचे लोक त्रासिक चेहरा करतात पण आपण मात्र ऐटीत पुस्तक वाचत असतो, मजा येते. त्यासाठी मी एक युक्ती केलीय. मी घरी रोज सकाळ आणि पुढारी दैनिके घेतो, ती वाचल्यावर दुसर्या दिवशी त्यातील विनोद कापून एका वहीत चिकटवून ठेवतो, रोज दोन तीन प्रमाणे आता कितीतरी विनोद जमलेत, जेव्हा वेळ जात नाही तेव्हा ही वही कामाला येते. घरात ही वही टी पॉय ठेवली आहे, पाहुणे आले की, प्रतिक्षेच्या वेळेत त्यांचाही वेळ चांगला जातो.
जर कोणाचा आपल्या मोबाईलवर मिस कॉल आला तर रागवायचे नाही, विचार करायचा अरे त्याला वाटत असेल याला वेळ आहे की नाही? मग आपण काय करायचे न रागवता उलट त्याला मिस कॉल द्यायचा, आणि सूचित करायचे मला वेळ आहे फोन कर.
सकाळी उठल्यावर काही जणांना अंथरुणात लोळण्याची संवय असते. पण लक्षात घ्या हा वेळ कारणी लागत नाही, विनाकारण वाया जातो. जाग आल्या बरोबर ताबडतोब उठा आणि मग बघा कसा अर्धा तास वाचतो ते. पहिल्यांदा नको वाटेल पण मग संवय होईल. लोळण्यातून काही साध्य होत नाही. उलट आळस वाढतो. ही वेळ आपल्या दिवसभराच्या कामाच्या नियोजनासाठी वापरता येईल. कारण सकाळी मेंदू ताजातवाना असतो. भराभर निर्णय होतात. हीच वेळ आपल्यासाठी असते, बाकी दिवसभर आपण कोणासाठी तरी मेंदू वापरत असतो. हा एक तास वाचवून आपल्याला दिवस पंचवीस तासांचा करता येतो.
महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी धान्यापासून दारू गाळण्याचा निर्णय घेतला आणि चारी बाजूंनी रान उठल्यावर तो निर्णय मागे घेतला. पण असे निर्णय घेऊन लोकांची मने सतत ढवळत का ठेवायची हे काही समजत नाही. आता एक नवीनच फॅड सरकारच्या सुपीक डोक्यातून बाहेर आले आहे, करवंदापासून दारू निर्मिती करणे. आहे मग त्याला भरपूर अनुदान. मुळात एवढे गंभीर विषय सरकारपुढे असताना, हे राजकारणी दारू गाळण्याच्या का मागे लागले आहेत समजत नाही. सरकारला काय वाटते राज्यातील समस्त जनतेने तळीराम होऊन दिवस रात्र तर्र होऊन जावे काय?
राज्यात दिवसढवळ्या बलात्कार होताहेत, दरोडे पडत आहेत, तडीपार गुंड मोकाट सुटले आहेत, अजूनही जर्मन बेकरीच्या बॉम्ब स्फोटाच्या तपासात प्रगती नाही, आदिवासींचे प्रश्न भेडसावत आहेत, महावितरणने तर सरळसरळ दरोडेखोरी सुरू केलेली आहे, नक्षलवादी डोके वर काढताहेत, दुधाचे भाव रोज वाढताहेत, एक ना अनेक प्रश्न सरकारपुढे असताना सरकारला हे सर्व कसे काय सुचते एक परमेश्वरच जाणो. मला वाटते तोही बिचारा यांचे राजकारण बघून कंटाळला असेल. एकेकाळी औद्योगिक विकासात महाराष्ट्र देशात आघाडीवर असताना आता त्याची काय परिस्थिती आहे, हे सरकारने जाहीर करावे. दारू पिऊन विकास करता येत नाही. गावोगावी महिला बाटली आडवी करण्यासाठी जीवाचे रान करताहेत आणि त्याच राज्यात सरकार मात्र बाटलीचा पाया मजबूत करत आहे. या गुन्ह्याला माफी नाही. एकीकडे दारूबंदीची भाषा करायची आणि दुसरीकडे दारू गाळण्याचे परवाने द्यायचे.
हे सरकार काही दिवसांनंतर शालेय अभ्यासक्रमात दारू गाळण्याचा प्रोजेक्ट ठेवेल आणि त्यावर धडा सुद्धा असेल. अगदी महात्मा गांधींच्या फोटोच्या साक्षीने. सरकारने आता पुरस्कार जाहीर करावेत - दारूश्री, दारूभूषण, दारूविभूषण, दारूरत्न, दारूसम्राट, दारूकेसरी.
काय होणार आहे या महाराष्ट्राचे आणि येथील जनतेचे.
लोकमान्य टिळक गर्जले होते. या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?
साधारण २००९च्या सुमारास जगात स्वाईन-फ्लूने आपली मस्ती सुरू केली, आणि त्याची लागण भारताही झाली. जागतीक आरोग्य संघटनेने जगाला सावध केले. डॉक्टरांनी लोकांना घाबरवून सोडले. तेव्हा साधं सर्दी पडसे झाले तरी नाना शंका यायच्या आणि लोक तोंड झाकून घेत. प्रत्येकजण घाबरलेला होता. खूप गाजावाजा झाला. भयावह चित्र निर्माण केले गेले. परवाच एका बातमीत W.H.O. संघटनेचे आग्नेय आशियाचे संचालक सॅमली पियानबांग यांनी कबूल केलेकी लोकांच्या मनात भिती निर्माण करायला W.H.O. च कारणीभूत आहे. जगातील एक तॄतीयांश लोकांना बाधा होईल असे W.H.O.ने जाहीर केले, पणा काय झाले रोगाची तीव्रता दिवसेदिवस कमीकमी होत गेली.आज या स्वाईन फ्लूची स्थिती काय आहे. कुठे गेली ती भिती. भारतातील १२० कोटींच्या देशात केवळ ३० हजार रूग्ण आढळून आले, त्यापैकी १४६५ जणांचा मृत्यु झाला.
स्वाईन फ्लूचा बागुलबुवा उभा करून डॉक्टरांनी आणि औषध कंपन्यांनी भरमसाठ फायदा लुटण्याचे कारस्थान W.H.O.च्या मदतीने तर केले नसेल ना? का शंका येऊ नये? यात फक्त औषध कंपन्यांचे उखळ पांढरे झाले. भविष्यातील अतिरंजीत, भितीदायक चित्र रंगवून बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून भारताने सुमारे दीड अब्ज डोस आयात केले, ते तसेच पडून आहेत. अशा किती देशात या औषध कंपन्यांनी धंदा केला असेल. शिवाय टॅमी फल्यूचा झटका वेगळाच.
स्वाईन फ्लूचा बागुलबुवा उभा करून डॉक्टरांनी आणि औषध कंपन्यांनी भरमसाठ फायदा लुटण्याचे कारस्थान W.H.O.च्या मदतीने तर केले नसेल ना? का शंका येऊ नये? यात फक्त औषध कंपन्यांचे उखळ पांढरे झाले. भविष्यातील अतिरंजीत, भितीदायक चित्र रंगवून बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून भारताने सुमारे दीड अब्ज डोस आयात केले, ते तसेच पडून आहेत. अशा किती देशात या औषध कंपन्यांनी धंदा केला असेल. शिवाय टॅमी फल्यूचा झटका वेगळाच.
पुण्यात १३-२ ला बॉम्बस्फोट झाला. १७ जणांना प्राण गमवावे लागले. त्या आरोपींचा अद्यापही तपास लागलेला नाही. कोणीही बहुतेक मनावर घेत नाहीत. किती गंभीर घटना आहे. पण कुणाला काय त्याचे. बरे दहशतवादी सापडले तरी पुढे काय? हा प्रश्न असतोच. त्यांना पकडल्यावर त्यांची खातीरदारी सुरू. त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रचंड पैसा खर्च होणार. खटला चालणार, आणि जर त्याचा निकाल जेव्हा केव्हा पाच दहा वर्षांनी लागेल तो पर्यंत त्याच्या सुरक्षेबद्दल पोलीसांचा जीव टांगणीवर. बरे खटल्याचा निकाल लागल्यावर तरी काय? मागील फाशीची शिक्षा झालेले आरोपी अजूनही तुरूंगात मजेत आहेत. काय गौडबंगाल आहे कळत नाही. त्यांच्या शिक्षेची अंमलबजावणीच होत नाही. आता हे नवीन कैदी आले तर त्यांचा खर्च सुरू. आता एका कसाबवर किती पैसे खर्च होतायत. किती कोर्टाचे तास वाया जात आहेत. वाया याचा अर्थ असा यातून काय निष्पन्न होणार आहे. त्यापेक्षा त्याला गोळ्या लागल्या असत्या तर बरे झाले असते. नंतर तो तुरूंगात मजाच करणार ना?
कालच नक्षलवाद्यांनी छत्तीसगडच्या दंतेवाडा भागात केंद्रीय राखीव दलाच्या गस्ती पथकावर बेछूट गोळीबार करून, ७६ जवानांना मारले, ते शहीद झाले. पण असे का व्हावे? देशातील हा आजवरचा सर्वात मोठा हल्ला आहे. नक्षलवाद्यांची एवढी हिम्मत झालीच कशी? त्यांच्यावर आतापर्यंत का कारवाई झाली नाही? काही नाही भारतात मरण स्वस्त झाले आहे. सर्वात जास्त कोण मारत असेल तर, सरकारच. काय महागाई झाली आहे. दहशतवादी एकदाच मारतात, पण महागाई, भ्रष्टाचारा रोजच थोडेथोडे स्लो पॉईझनिंग करत आहे, भारतीय जनता रोजच मरणकळा सोसत आहे.
पुण्यात दि.२६, २७ आणि २८ मार्च या तीन दिवशी अखिल भारतीय मराठी साहिय संमेलनाचे सूप अखेर खूपशा राजकारणीय वादाने गाजले, आणि एकदाचे पार पडले. काही कोटी रूपये खर्च झाले. पण एवढे करून जे सामान्य नागरीक, त्यांना काय मिळाले याचा कोणी विचारच केला नाही.
मराठी पुस्तकांचे स्टॉल लागले होते, पण मराठी पुस्तकांची किंमतच एवढी की घेताना डोळे पांढरे व्हायची वेळ येत होती. पण गाजावाजा एवढा बस्स! किती पुस्तकांमधून किती टक्के पुस्तकांची वेक्री झाली, भेट दिलेल्या एकंदर रसिकांमधून किती टक्के रसिकांनी पुस्तके विकत घेतली हे मात्र जाहीर करणे सोईस्करपणे टाळण्यात आले.
खरंतर एवढे रसिक गावोगावाहून आले होते, एवढ्या देणग्या मिळाल्या पण त्याचा विवीयोग कसा झाला, हे काही सांगायला नको. एवढ्या पैशातून एखादी ज्ञानेश्वरी, तुकाराममहाराजांची गाथा, किंवा रामदासमहाराजांचे मनाचे श्लोक मोफत वाटले असते तर कितीतरी लोकांना फायदा झाला असता. हा विचार देणगी देणार्यांनी करायला पाहिजे होता. त्यांनी देणगीरूपाने पुस्तकांच्या प्रती विनामूल्य वाटायला पाहिजे होत्या.
ग्रंथ प्रदर्शनात एक मुस्लिम समाजाचा स्टॉल होता त्यांनी त्यांचा धर्मग्रंथ कुराण, ज्याची ९५० पाने आहेत, फक्त ५० रूपयांना विकत दिले. आता बोला. असे कोणी दानशूर हिंदू धर्मिया नाहीत काय? की जे गीतेची प्रत स्वस्तात उपलब्ध करून देतील.
पण एकंदर संमेलनाने काही लोकांचाच उदौउदो झाला एवढे मात्र नक्की.
महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्र्यांनी एक नवीनच फतवा काढला की, इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत घटक चाचणी परिक्षा लेखी स्वरूपात न घेता फक्त तोंडीच घ्यायची, का तर म्हणे मुलांवर अभ्यासाचा ताण पडतो. दिवसेदिवस शिक्षण फारच सोपे होत चालले आहे. आम्ही मागे एकदा ब्लॉग मधून लिहीले होते की मुलाची एवढी काळजी असेल तर सर्व इयत्तांच्या परिक्षाच रद्द कराव्यात, म्हणजे मुलांना परिक्षेचा ताण येणार नाही, पर्यायाने पालकांची सुद्धा या प्रकारातून सुटका होईल. सर्वांना फक्त पुढील वर्गात ढकलायचे. अशा प्रकारे दहावीच्या मुलांना किती सोईस्कर होईल. परिक्षा मंडळाचा किती खर्च वाचेल. शिवाय सगळे पास. टक्केवारी प्रमाणे पुढील प्रवेश द्यावेत. कॉपी अजिबात होणार नाहीत. कॉपी कशासाठी होते पास होण्यासाठीच ना! सगळेच पास तर कॉपी कोण करणार.कल्पना करा परिक्षाच रद्द केल्यातर किती पैसा वाचेल. कितीतरी विद्यार्थ्यांच्या आत्महत्या वाचतील. ज्याला गरज आहेत तो अभ्यास करेल. नाही केला तरी बिघडत नाही पास होणारच आहे. अजून एक सुचवावेसे वाटते, मुलांना विषय ऐच्छिक ठेवावेत, भले त्याने एक विषय का घ्यायना, पण त्याने त्या विषयात पास व्हायचे. मग त्याच्या करियरचा त्यानेच विचार करावा. कशाला त्या बिचार्यावर विषयांचे ओझे लादायचे. मग सर्व मंडळी खुष.
आपल्याला या भारतात एक कर्तबगार बाबा, महाराज, अम्मा, ताई वगैरे बनून नाव, प्रसिद्धी, पैसा मिळवायचा असेल तर खालीलप्रमाणे कमीतकमी पात्रता (qualification) पाहिजे.
१) आकर्षक व्यक्तिमत्व पाहिजे.
२) नावापुढे किंवा नावाआधी पुरूषांनी परमपूज्य, कृपालू, दास, महाराज, नाथ, बाबा, ह.भ.प., राधा, स्वामी, योगी, बालयोगी, सिद्धयोगी आणि स्त्रीयांनी अम्मा, अक्का, मा, माता, बाई, देवी, बहेना अशा उपाध्या लावण्याची तयारी ठेवावी.
३) स्वतःच्या जयंत्या साजर्या करताना लाज बाळगू नये.
४) लाज, शरम, मान, अभिमान सर्व गहाण टाकावे.
५) धर्माचा अभ्यास चांगला असावा, शिवाय लोकांना न समजेल अशा भाषेत धर्म, अध्यात्म समजावून देता आले पाहिजे.
६) छोटेमोठे जादूचे प्रयोग शिकून घ्यावेत.
७) शिष्यगण भरपूर असावा, त्यात महिलांना प्राधान्य द्यावे.
८) स्वतःचे माहात्म्य सांगणारी पुस्तके, हॅंडबिले छापून वाटण्याची तयारी ठेवावी.
९) कोणतीही तक्रार आल्यास तक्रार निवारण न करता, तक्रारदारालाच निवारण करता आले पाहिजे.
१०) कमितकमी बोलावे, शक्यतो शिष्यगणांनाच बोलू द्यावे.
११) नकली गिर्हाईक ओळखण्याची क्षमता पाहिजे.
१२) खालील वस्तु जवळ बाळगाव्यात - लिंबू, सुई, टाचण्या, भगवी कफणी, पांढरे कपडे, कमंडलू, रूद्राक्ष, शंख, बिब्बा, कवड्या, उडीद काळे आणि पांढरे, काळे दोरे, अंगारा, पाणी,जानवे, लाल दोरा, भंडारा, नारळ, देवांच्या मूर्ती, हळदीकुंकू, त्रिशूल, तावीज वगैरे.( हे सर्व साहित्य विकण्याचे दुकान नातेवाईकालाच द्यावे.)
आमचे असे ऐकिवात आहे की,या देशातील सर्व बाबा आणि अम्मा लोक एकत्र येऊन एक अधिवेशन भरवणार आहेत आणि त्यात खालील ठराव पास करून घेणार आहेत.(अगदी संस्कार आणि आस्था चॅनेलवरील सुद्धा)
युनियन करणे, अभ्यासक्रम ठरवून विद्यापीठाची स्थापना करणे, सरकारकडे अनुदान मागणे, मठ आश्रमासाठी आरक्षण मागणे, लोकसभेत जागा राखीव, झेड सिक्युरिटी.
भारतात बुवाबाजीचे आणि माताजींचे प्रमाण एवढे आहे की, पदवीधर, अनाडी, गरीब, श्रीमंत, राजकारणी सर्व त्यांच्या नादी लागलेले असतात, आणि त्यांच्यात आपले भले, शांतता, पैसा शोधत असतात. यातील काही नमुने -
१) बाबुभाई पठाण - कारंजा, ता.राहुरी २) माऊली - नारायणपूर ३) रमजान गुंडू शेख - कोल्हापूर ४)अरुणा लोखंडे उर्फ ताईमाऊली - आळंदी ५) हनुमानभक्त शिवाजी कोते - शिर्डी ६) भास्कर शंकर वाघ, धर्मभास्कर - धुळे ७)नरेंद्रमहाराज उर्फ जगदीश सुर्वे - नाणीज ८)विनोदानंद झा उर्फ स्वामी सदाचारी उर्फ ॐ महाराज ९) नेमीचंद गांधी १०) मल्लीनाथ महाराज - लातूर ११) लीलाताई कर्वे - बदलापूर १२) बैठक पंथ - रेवदंडा,जि.रायगड १४) बशीर पटेल - शहादा १५) माणिक अवघडे - सातारा १५) तात्या सरमळकर - नेरूळ १६) निर्मला माता १७) मानसी देवस्थान - वेंगुर्ला १८) मल्लीनाथ आश्रम - भिगवण १९) महादेव मोरे - जयसिंगपूर २०) करमालीबाबा - खेडशिवापूर २१) तुर्रेवालाबाबा - जुन्नर २२) दत्तईदास - तळेगाव देवशी २३)सिद्ध सायन्स - वडगाव शेरी, पुणे २४) भानुदास गायकवाड उर्फ गोडबाबा - बारामती २५) अनुराधाबाई देशमुख - मोहोळ, सोलापूर २६) सत्यसाईबाबा - पोट्टपर्ती, आंध्र प्रदेश २७) जयराम पवार - रत्नागिरी २८) जयरामगिरी - सांगली २९) साहिबजादी - सातारा ३०) बेबी राठोड - यवतमाळ ३१) श्री डुंगेश्वर - कोचरे ३२)श्री देवभोम - आंबुर्ले ३३) शेषचंद्र महाराज - बुलढाणा ३४) अमृता काळे - पंढतपूर ३५) बाल दत्तमहाराज - नांदेड ३६) करीमबाबा - मिरज ३७) संतोष शेवाळे - औरंगाबाद ३८) रईसाबेगम - परभणी ३९) दत्त भगत - परभणी ४०) कोंडीराम बढेबाबा - पारनेर, नगर ४१) डॉक्टरबाबा - असलोद, शहादा ४२) गुरव बंधू - कोल्हापूर ४३) रनाळकर महाराज - डोंबिवली, कल्याण ४४) विलासबाबा - लोणंद, सातारा.असे अनेक महाराज, बाबा, आनंद, गुरू, योगी, बालयोगी, स्वामी राधा, दास, नाथ, नागनाथ, सखा, तारणहार, परमपूज्य, ह.भ.प., माता, ताई, अम्मा, अम्माभगवान, अक्का, देवी अशी नावे लावून हा बुवाबाजीचा धंदा खोलतात.
हा धंदा एवढा तेजीत चालतो की बस्स! फक्त थोडी चलाखी पाहिजे.
आजमितीला पुणे शहरात देवऋषी बघणारे ८०० ते ९०० देव्हारे आहेत, जे अधिकृत आहेत. शिवाय लहानलहान तर जवळजवळ ५०००च्या आसपास आहेत. यांची दुनिया निराळी आहे. यांचे कायदे, नियम वेगळे आहेत. यांच्याबद्धल पुन्हा बघू.
भारतातील उत्तरप्रदेशमध्ये श्रीकृपालुमहाराजांच्या आश्रमात चेंगराचेंगरी होऊन ६६ लोक जागेवरच ठार झाले, तर शेकडो जखमी झाले. भारतात मरण स्वस्तझाले आहे. दर रोज कोणी ना कोणी तरी, अगदी डझनावरी माणासे मरतात. घातपात, अपघात, खून यातून हे होते, अगदीच नाहीतरी दहशरवादी तयारच आहेत. आतातर काय हे रोजचेच झाले आहे. बाबांना किती प्रसिद्धीचा सोस त्यांनी गरीबांसाठी अल्प भेट ठेवली होती, प्णा भारतात दारिद्र्य एवढे आहे की, लोक जीवाची पर्वा न करता गर्दी करतात. महाराजांच्या पत्नीचे वर्षश्राद्ध होते आणि त्यानिमित्त भोजन, स्टीलचे ताट, आणि दहा रूपये मिळाणार होते त्यासाठी एवढी गर्दी. कॄपालूमहाराजांनी गर्दीचे प्रदर्शन करण्यासाठी हा स्टंट केला होता.पण त्यात माणसे मेली त्याबद्धल महाराज काय देणार. त्यांनी भक्तांचे प्राण का वाचवले नाहीत? त्यांना हे आधीच का कळले नाही.
सरकार महागाई रोखू शकत नाही, अशात जगणे म्हणजे रोजच मरण आहे. पण कुणला काय त्याचे, ज्यआंना आम्हीनिवडून दिले तेल ागलेत पैसे कमवायला. त्यांना जातीचे, धर्माचे राजकारण कराय्ला भरपूर वेळ आहे, पणा लोकांच्या समस्या सोडवायला वेळा कुठे आहे. आता भारतात एक नवीनच प्रकार आहे, जिवंत माणसांना किंमत नाही, पाण मेल्यावर मात्र अनुदान घोषित होतात. म्हणजेच काही सरकारकडून मिळवायचे असेल तर मात्र, पण योग्य जागा योग्य वेळ निवडा.
काही महत्वाचे काम निघाले म्हणून स्वतःची कार घेतली आणि चाललो होतो गावाला. खुप छान प्रवास चालला होता. रात्रीची वेळ होती. अमावास्येची रात्र असल्याने सर्वत्र काळोख पसरला होता. चंद्रच नाही तर उजेड कुठला. त्यातच उन्हाळ्याचे दिवस असल्याने रात्रीचा हवेत गारवा जाणवत होता म्हणून कारच्या काचा उघड्या ठेवूनच प्रवास चालला होता. टेपवर मधुर गाणी वाजत होती. निर्जन रस्ता. फक्त कारच्या उजेडात जी काही झाडी किंवा रस्ता दिसेल तेवढाच. साधारण १० वाजले असतील काय झाले माहित नाही पण कार आचके देऊन बंद पडली. गाडी थांबली. उतरुन बाँनेट उघडून पाहिले तर काही कळत नव्हते. फक्त एवढेच लक्षात आले कि इंजिन खूप गरम झाले आहे. कधीही दुरुस्तीचा संबंध न आल्याने हतबल होतो. आता काय करावे? रात्रीची वेळ, आजूबाजूला चिटपाखरु नाही. रहदारी नाही. भयाण शांतता. तेवढ्यात कोठून कोण जाणे एक गृहस्थ येतात त्यांनी अंगात पांढरा लांबकोट, जसा डॉक्टर घालतात, घातलेला आहे. आणि विचारतात काय झाले? मी म्हणालो गाडी बंद पडलीय कोणी मेकॅनीक मिळेल का? तर डॉक्टर म्हणतात आता उद्या सकाळीच मेकॅनिक मिळेल, शिवाय गाव दोन किलोमीटर दूर आहे. तिथे गॅरेज आहे तेव्हा आता इथे एकटे थांबून काय करणार? इथेच पलीकडे आमचे घर आहे तेव्हा गाडी राहू देत इथे. माझ्याबरोबर चला. रात्री तिथेच रहा, मग सकाळी पुढच्या गावातून मेकॅनिक आणा आणि मग गाडी दुरूस्त करून जा. मी विचार केला नाहीतरी आता इथे रात्रभर थांबून काय करणार? त्यापेक्षा या डॉक्टरांसोबत त्यांच्या घरी रात्र तरी काढावी. म्हणून मी त्यांच्याबरोबर जाऊ लागलो.
थोड्याच वेळात आम्ही एका छोट्याशा घराजवळ आलो घर छान टुमदार होते. पण आजूबाजूला दूरवर घर नव्हती म्हणून ते घर एकाकी वाटत होते. आत लाईट लागलेल्या होत्या. आणि आतमध्ये अजून कोणीतरी होते, मी विचार केला बरे झाले चांगली सोबत झाली. आता रात्र सुखात जाईल. गप्पागोष्टी होतील म्हणून आम्ही घरात आलो. तिथे सुध्दा दोन डॉक्टर होते आणि एक नर्स पण होती. जणू तो छोटासा दवाखानाच होता. मला कळेचना एवढ्या रात्री ही मंडळी जागी का ? जाऊ द्या आपल्याला काय करायचे आहे ?.
थोड्या वेळातच गप्पांना सुरुवात झाली तेव्हा कळले कि ते तिघे डॉक्टर तो दवाखाना चालवितात आणि ती नर्स त्यांना मदत करते. शक्य तो दवाखाना दिवसरात्र चालतो. रात्री तर जास्तच कारण आजूबाजूचे पेशंट रात्री अपरात्री सुध्दा येतात. अगदी विशेष म्हणजे तिथे आँपरेशनसुद्धा केले जाते.
त्यांनी विचारले तुम्ही कांही खाणार जेवणार का ? मी अगदी नको म्हणत असताना सुध्दां त्यांनी बळेबळेच मला काही खायला दिले. मलाही जरा बरे वाटले. नाहीतरी सकाळपर्यंत कांही मिळणार नव्हतेच. खाल्ल्यावर जरा बरे वाटले. मग गप्पा सुरु झाल्या ती नर्स सुध्दा हसतखेळत आमच्या गप्पांमध्यें भाग घेऊ लागली.
अचानक काय झाले कुणास ठाऊक माझ्या पोटात दुखू लागले. थोडावेळ सहन केले पण दुखणे कांही थांबेना. नाहीतरी आपण दवाखान्यातच होतो तेव्हां त्या डॉक्टरांना शंका आली आणि त्यांनी विचारले कांही त्रास वाटतो का ? मी म्हटले हो जरा पोटात दुखते आहे. एकदम त्या डॉक्टरांची धावपळ सुरु झाली त्यांनी मला झोपायला सांगितले आणि काहीसे औषध दिले. एक इंजेक्शन ही दिले. ते आता आपापसात काही कुजुबुजू लागले. मला काहीच अंदाज येत नव्हता. डोळ्यावर थोडीशी ग्लानी आली होती. तेवढ्यात डॉक्टरांनी काहीतरी ठरवले आणि ते माझ्याकडे आले. आता त्यांचे म्हणणे पडले कि मला बहुतेक किडनीचा त्रास असावा. तेव्हा लगेच आँपरेशन करावे लागेल. आँपरेशनची सर्व सोय आहे. कारण सकाळपर्यंत खूप उशीर होईल मी म्हटले पण खर्च वगैरे ? डॉक्टर म्हणाले त्याची काळजी तुम्ही करु नका. बाकी सकाळी बघू.
आता त्यांनी मला एक इंजेक्शन दिले आणि मला गुंगी आली बहुतेक त्यांनी त्यांचे काम चालू केले वाटते. नंतर काय झाले माहित नाही.
सकाळी मला जाग आली तेव्हा काहितरी हलके हलके वाटत होते. पोटात खड्डा पडल्यासारखे वाटत होते. बहुतेक पोट दुखणे बरे झाले म्हणून असेल ?
पण आश्चर्य म्हणजे आजूबाजूला कोणीच नव्हते. ते डॉक्टर आणि ती नर्स कोणीही नव्हते. मी विचार केला. अरे कोठे गेले असतील म्हणून उठू लागलो तर मला उठताही येईना. तसाच पडून राहिलो. कारचा विचार करु लागलो, पुढच्या गावात जाऊन मेकॅनीक आणावा आणि कार दुरुस्त करुन पुढे जावे. पण मला उठताच येईना. डॉक्टरांना बोलवावे तर त्यांचा पत्ताच नव्हता. जणू ते गायबच झाले होते.
आता चांगले उजाडले होते. आणि एक खेडूत त्या ठिकाणी आला. मला पाहून त्याला आश्चर्य वाटले तो म्हणाला आपण कोण साहेब? आणि आपण इथे कसे? इथे तर कोणीच रहात नाही. मीच केव्हातरी साफसफाईला येतो. कारण मालक बाहेरगावी असतात आणि ते कधीच इथे येत नाहीत.
मी त्याला रात्रीची सर्व हकीकत सांगितली. आणि पोटात दुखण्याचे सांगितले शिवाय इथे तीन डॉक्टर आणि नर्स होती तेही सांगितले. तेव्हा त्याने कपाळावर हात मारुन घेतला आणि म्हणाला.
साहेब इथेच या रस्त्यावर वर्षापूर्वी एका कारला अपघात झाला होता. त्यात तीन डॉक्टर आणि एक नर्स होती. त्यांच्यावर किडनी विकण्यासंदर्भात आरोप होते म्हणून ते पळून चालले होते आणि त्यातच त्यांच्या कारला अपघात होऊन ते तिघेही त्यात मृत्यु पावले होते. तेव्हा पासून कधीकधी रात्री ते दिसतात.
मी अतिशय घाबरलो आणि मग माझ्या लक्षात आले कि, माझ्या डाव्या पोटाजवळ टाके घातलेले आहेत आणि म्हणून मला उठता येत नाही. बहुतेक माझी किडनी रात्री काढून घेण्यात आली होती.
आपल्याला जर सुखी आणि आनंदी जीवन जगायचे असेल तर सकारात्मक विचार करा. याचे फायदे अनेक आहेत. या सृष्टीत दोन प्रकारच्या उर्जा सतत निर्माण होत असतात. चांगल्या आणि वाईट, सुखी आणि दु:खी, सकारात्मक आणि नकारात्मक, सुगंधी आणि दुर्गंधी, योग्य आणि अयोग्य पण यातून आपण कुठल्या आकर्षित करायच्या ते आपल्याच हातात आहे. यात महत्त्वाचे भूमिका बजावते ते आपले मन. मनच सर्वांचा कर्ता करविता आहे. हे मनच आत्म्याचे एक रुप आहे. आत्मा दिसत नाही, मन दिसत नाही पण त्याला अखिल ब्रह्मांडाची जाणीव आहे. ते क्षणार्धात करोडो मैलांचा पल्ला पार करु शकते. अक्षरश: ईश्वराला समोर उभे करु शकते. म्हणजेच मनाद्वारे आपण शरीरावर नियंत्रण, सभोवतालच्या परिस्थितीवर नियंत्रण आणू शकतो. बघा मन प्रसन्न असेल तर आजूबाजूचा परिसर, सजीव, निर्जीव सर्व गोष्टी प्रसन्न वाटू लागतात. अक्षरश: बाभळीला गुलाब दिसू लागतात. सुगंधी वातावरण जाणवते. आता ह्या सृष्टीतल्या सकारात्मक, उर्जा जर आपण मनाद्वारे ग्रहण केल्या तर जीवन सकारात्मक ( positive) च असेल. मग म्हणा,“ माझा शुध्द आत्मा सृष्टीतलील सर्व शुध्द आणि पवित्र उर्जा ग्रहण करण्यास समर्थ आहे आणि त्या मी ग्रहण करीत आहे.”
असे दिवसातून ५ ते १० वेळा आकाशाकडे तोंड करुन, मोठ्याने, हात वर करुन म्हणा बघा काही दिवसातच काय फरक जाणवू लागतो.
सकरात्मक विचारात प्रचंड शक्ती दडलेली आहे. अगदी इंजिनमधल्या वाफेच्या दाबाइतकी, अणुबाँबमधल्या शक्ती इतकी. सकारात्मक विचाराने मानसिक त्रास होत नाही. विचारच करायचा ना?. तर मग सकारात्मक करुयात ना?
एखाद्याचे ह्रदयाचे ऑपरेशन आहे आणि त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यासाठी नेले जात आहे. जर त्याने विचार केला कि, माझे ऑपरेशन ठीक पार पडून मी लवकरच बरा होइन. तर मग इथेच विचार थांबतात. पण त्याने नकारात्मक विचार केला तर काय होईल? मग मला भूल नीट दिली जाईल काय? डॉक्टर निष्णात असतील का? ऑपरेशन जर यशस्वी झाले नाही तर? काय होईल? मग माझ्या बायका मुलांचे काय होईल? वगैरे वगैरे. या विचारांना अंतच नाही. शिवाय सर्व लोकांवर संशय येऊ लागतो. मला नीट बघतील का? डाँक्टर नीट आँपरेशन करतील ना? वगैरे वगैरे. आता बघा, असा विचार करुन काही उपयोग आहे का? आपण डॉक्टर मंडळी बदलू शकतो का? ऑपरेशन टाळणे आपल्या हातात आहे का? मग नकारात्मक विचार करुन आपले मानसिक खच्चीकरण कशासाठी?
दुसरे उदाहरण सांगतो. मला कोणाचे मोबाइलवर मिसकॉल आले तर मी खूपच चिडायचो. खूपच चिडचिड व्हायची हे लोक कशासाठी फोन घेतात वगैरे. मग मी काय करु लागलो. कुणाचा मिसकॉल आला ना?, त्याला परत उलट मिसकॉल देऊ लागलो. विचार करु लागलो अरे कदाचित त्याला मिसकॉल देऊन हे पहायचे असेल की आपल्याला वेळ आहे की नाही? मग मी उलट मिसकॉल देऊन गप्प राहू लागलो तर मग माझी चिडचिड कमी झाली. कारण मी त्याला सांगू लागलो, कि बाबारे मला वेळ आहे तू फोन कर. त्या दिवसापासून मी शांत राहू लागलो.
जी गोष्ट आपण टाळू शकत नाही, बदलू शकत नाही, पण त्यावर विचार करु शकतो तर मग सकारात्मक विचार का नको?
खाली काही प्रश्न मी देतो बघा त्यांची नकारात्मक उत्तरे तयार करुन. खूप त्रास होईल.
१) परिक्षेत जाणार्या विद्यार्थ्यांना विचारा- बाबारे नीट अभ्यास केलास ना?. नाहीतर नापास झालास तर काय करणार?.
२) रुग्णाला विचारा- औषधे वेळेवर घेत जा बरे का? औषधे नाही घेतली तर आजार बळावतो आणि मग त्यातच त्याचा अंत होतो.
३) प्रवासाला निघालेल्या माणसाला विचारा- अरे लवकर जा, नाहीतर गाडी चुकली तर काय करशील?.
४) कोर्टात निकालाच्या वेळेआधी विचारा- आपल्या बाजूने निकाल लागला तर उत्तम नाहीतर विरुध्द गेला तर काय करायचे?.
म्हणून म्हणतो , नेहमी सकारात्मक चिंतन करा. बघा निर्णय चांगलेच मिळतात.
१) कामाला बाहेर जाताना- मी ह्या कामाला जात आहे ते काम होणारच तो माणूस मला भेटणारच. आणि माझे काम होणार?.
२) परिक्षेला जाताना- मी अभ्यास चांगला केला आहे, मग मला पेपर सोपा जाणारच, मला चांगले मार्क मिळणार.
३) कोणाकडची उधारी वसूल करताना- मी पैसे देताना शुध्द मनाने दिलेत तरी तो मला पैसे परत देईन.
४) डाँक्टरकडे जाताना- मला बरे वाटत नाही पण मी मनाची खात्री करतो की मला बरे वाटेल आणि मी ठणठणीत बरा होईन. प्रत्येक वेळेस असे सकारात्मक विचार करा आणि परिणाम पहा.
शेवटी अजून एक मंत्र देतो.
“ रात्री झोपताना, दोन्ही हात जोडून म्हणा-
“ माझ्या शुध्द आत्म्याने, मी जगातील सर्व आत्म्यांची माफी मागत आहे. माझे हातून दिवसभरात काही अपराध झाल्यास, कोणी आत्मा दुखावला गेल्यास, त्यांनी माझ्या आत्म्याला क्षमा करावी ”.
जगात देव आहे की नाही? आतापर्यंत या विषयावर अनेकांनी आयुष्य खर्ची पाडलीत मग आता आपण नव्याने त्या विषयात बोलण्यात काहीच अर्थ नाही. मग हा विषय आता का? तर आमचे असे मत, नाही खात्री आहे की, आता जगात जो हिंसाचार चालला आहे, त्यामागे देवाबद्दल श्रद्धाच असावी. बघा, प्राचीन इतिहास बघा, माणसात जाती संस्था, धर्म होता काय? नाही मग असे काय घडले की, धर्म निर्माण झाले. धर्म प्रथम कोणी निर्माण केला, ही संकल्पना कोणाच्या डोक्यात आली, आणि त्याला धर्माची काय जरूरी भासू लागली. हिंदू कसे निर्माण झाले, यांनी हे आपले देव आहेत हे कशाच्या आधारावर मानले? नंतर ख्रिश्चन धर्माचा उदय झाला, तेव्हा त्यांच्या धर्मसंस्थापकाला अशी काय जरूरी भासली की, नवा धर्म स्थापन करावा त्यांच्यासाठी वेगळी नियमावली म्हणजेच धर्मग्रंथ प्रमाण ठेवावा. मुस्लिमांनी तरी विशीष्ट धर्म का पाळावा. काय झाले यामुळे लोक धर्मांध होऊ लागले, धर्म प्रसार करून आपल्या देवांच्या संकल्पना दुसर्याच्या माथी मारू लागले. जर जगात प्रथम धर्माची गरज निर्माण नसती झाली तर आज ही परिस्थिती आली असती का?
देव कोणी पाहिलाय का? नाही, मग हे पुतळे, मुर्त्या, चित्रे काय आहेत तर ते असतील, फक्त कल्पनाशक्तीव्या भरार्या. नाहीतर एकेका देवा्चे अनेक प्रकारचे फोटो का मिळाले असते. वेगवेगळ्या मुर्त्या का पूजील्या असत्या.प्रत्येकजण आपापल्या विचाराप्रमाणे देव शोधत असतो. इतर देवांबरोबर आपल्या देवाची तुलना करत असतो. मग श्रेष्ठत्वा बद्दल वाद निर्माण होतात. आदिमानवाला देव माहीत नव्हता पण तो या पंचमहाभूतांमध्येच देव शोधत होता. पंचमहाभूते कोणातही कसलाही फरक नाहीत. कोणत्याही देशातला माणूस असो हवा त्याला प्राणवायू देणारच, तो जे पेरेल तेच उगवणार. साखर सर्वांना गोडच लागणार, भले नाव वेगळे असू देत. म्हणून पंचमहाभूतेच सत्य आहेत.
आज जगातील सर्व लोकांची भाषा एकच असती तर. कोणीही मोठेपणा साठी नवा धर्म, नवा पंथ न स्थापता याच धर्मातून कार्य केले असते तर? तत्वज्ञान सांगण्यासाठी वेगळ्या भाषेच्या कुबड्या कशासाठी? वेगवेगळे धर्म, जाती, पंथ, धर्मग्रंथच आज या सर्व दहशतवादाला कारणीभूत आहेत. सर्व एकाच धर्माचे असते तर धर्मांधता असती काय? धर्मात अतंर्गत कलह झाला असता काय? कधी कधी वाटते हे धर्मसंस्थापकच निर्माण झाले नसते तर?
पुण्यात १३ फेब्रुवारीला जर्मन बेकरीत स्फोट झाला. आख्खे पुणे शहर हादरले. मुंबईच्या आठवणी जाग्या झाल्या पण त्याच बरोबर न्यायालयात जो खेळखंडोबा चाललाय, ते पाहून या पुण्यातील तपासातून काय निष्पन्न होणार आहे आणि पोलीसांनी अथक प्रयत्न केल्यावर ते आरोपी न्यायालयात काय गोंधळ घालणार आहेत हे आता स्पष्ट आहे. कितीतरी अतिरेकी फाशीची सजा होऊनही तुरूंगात मेजवानी झोडत आहेत. खटल्यावर खर्च, शिवाय त्यांच्या सुरक्षिततेवर खर्च, नंतर त्यांचा तुरूंगातील खर्च, म्हणजे कोणीकडून सगळा त्रासदायकच प्रकार.
आज पुण्यातील बॉम्ब स्फोटाला दहा दिवस झालेत पण अजूनही पोलीस चाचपडतच आहेत, त्यांना काहीही सुगावा लागत नाही, काय म्हणावे या प्रकाराला. कोणीही गंभीर नाहीच. जसा वेळ जातो, दिवस जातात तसा लोकांचा त्यातील सहभाग कमीकमी होत जातो. स्फोट झाला सगळे जागे झाले, भरपूर बंदोबस्त वाढवला, सगळीकडे डोळ्यात तेल घालून तपासणी, जणू काय आता अतिरेकी लगेचच हल्ला करणार. साधी गोष्ट आहे सगळे वातावरण थंड झाले, लोक शांततेत जीवन जगू लागले तेव्हाच अतिरेक्यांना जोर येणार ना? म्हणजेच सर्वांनी सतत जागरूक राहिले पाहिजे, सतर्क पाहिजे. आणि पोलीसांनी आपली सुरक्षितता पाहण्याऐवजी नागरिकांची सुरक्षिततापाहिली पाहिजे.
आला ’शिमगा’ आला. नुसती बोंबाबोंब. पण या सणालाच काय मारायची बोंब. अरे बाबा एथे तर रोजच बोंबाबोंब आहे, त्यामुळे खास शिमग्यासाठी बोंब मारण्यासाठी कुठे अंगात त्राण आहे.
साखरेचे भव वाढले, अन्नधान्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत संसार कसा हाकायचा हा मोठा प्रश्न आहे, संसारात बोंबाबोंब. वीज वितरण कार्याल्यात गोंधळ, त्यांचे काम फक्त वीज दरवाढ करण्याचे, वीजेचे दर हाताबाहेर गेलेत, पण काय करणार त्यांची मोनोपॉली आहे, बाजारात दुसरीकडे वीज मिळत नाही, आहे ना बोंबबोंब. आर.टी.ओ. कार्यालयात तर एजंटांचा सुळसुळाट आहे त्यांच्या शिवाय लायसेंस मिळतच नाही, अगदी कोणताही वशिला लावा. दररोज नवीनवी बोंब कानावर येते, वर्तमानपत्रात छापून येते, राजकारण्यांबद्दलची. त्यांनी तर भारताची होळीच केली आहे, सर्वसामान्यांच्या जीवनाची होळी करून, त्यांच्या पोळ्या चांगल्या भाजल्या जाताहेत. शिक्षणात तर एवढ्या मोठा प्रमाणावर बोंबाबोंब आहे की, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या, त्यांच्या पालकांच्या आर्त वेदना कोणालाच ऐकू जात नाहीत. जे आता जिवंत आहेत त्यांया भवितव्याचे काय, ती पण मूक बोंबाबोंबच ना? सार्वजनिक बससेवा, महानगरपालिका, महाराष्ट्र सरकार, गावपातळीवरील राजकारण, काय चाललंय?......च. ना!
या सर्वांवरची सर्वात मोठी होळी अतिरेकी करतायत, आपण होळीत लाकडे, गोवर्या जाळतो, हे अतिरेकी जिवंत माणचेच जाळतायत, आणि सापडतच सुद्धा नाहीत, सापडले तरी भारत सरकारकडे न्यायालयात सुरक्षित असतात. त्यांना माहिती आहे, आपाण कितीही मोठी होळी केली तरी, आपल्या नावाची बोंबाबोंब होत नाही.
आम्ही भारतीय रोजच होळी, शिमगा अनुभवतो आहोत, पण आता बोंब मारण्यासाठी फुरसतच नाही, अंगात त्राण नाही. रंगपंचमीचे रांग उधळायला मनात उमेद नाही , आम्ही रंगांधळे झालोत, अतिरेक्यांनी आम्हांला रक्ताचा लाल रंगच दाखवलाय, पण सरकार त्यांना आपला रंग दाखवत नाही.
भारतात मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांनी सर्व भारतात दहावीचा आणि बारावीचा अभ्यासक्रम एकच असण्याची घोषणा केली. खूप वर्षांनंतर एक चांगला निर्णय होणार आहे. असा निर्णय घ्यायची पाळी का आली तर त्याला विद्यार्थ्यांव्या आत्महत्या कारणीभूत आहेत. बरोबर आहे, सर्व राज्यातून अभ्यासक्रम वेगळा असेल तर, जेव्हा विध्यर्थी उच्च शिक्षणासाठी परराज्यात जातात तेव्हा त्यांना तेथील अभ्यासक्रमाशी जुळवून घ्यावे लागते. तसं पाहिलं तर पदविकेचा अभ्यासक्रमही सर्व भारतातून एकच पाहिजे. परदेशात ही पद्धत आहे, त्यामुळे शिक्षणपद्धतीत आमुलाग्र बदल झालेला आहे, मुलांना ही त्या विषयात अभ्यास करण्यापेक्षा ती आपली भविष्ये घडवता येतात.
एक समान शिक्षणपद्धती असल्यास सबंध भारतातून हुशारीचा कस लागला जाईल. कोणी कोठेही करियर घडवू शकेल. कोणा एका विद्यापीठाची मक्तेदारी संपुष्टात येईल. मग फी वाढीलाही आळा बसेल. अजून एक करता येईल, नव्हे करावे, अभिमत विद्यापीठाचा दर्जा काढून टाकावा.
मागे आम्ही सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे, आपलीच मातृभाषा शिकण्याची गरज आहे का? फक्त लिहायवाचायला आले तर बस नाही का? अलंकार, वृत्त, व्याकरणाचा काय उपयोग आहे रोजच्या जीवनात? ज्याला आवाड असेल त्याने अभ्यास करावा ना? सर्वांना का त्रास? संस्कृत भाषा शिकवतात, मुले अतोनात कष्ट घेतात, परिक्षा झाल्यावर दुसर्या दिवशी सगळं विसरून जातात. बाबांनो प्रॅक्टिकल विचार करायला शिका.
आपली भारतीय शिक्षण पद्धती म्हणजे काय तर गुजराथी, मारवाडी, जैन, ब्राम्हण अशा शाकाहारी समाजाला मांसाहारी पदार्थ जबरदस्तीने शिकवण्यासारखे आहे, ज्याचा त्यांना भविष्यात काडीमात्र उपयोग नाही.
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला खाण्यापिण्यापेक्षा मानसिक ताणच जास्त आहे. माणसाने कुठे कुठे मनावर ताण घ्यायचा. घ्यायला कशाला पाहिजे, आजूबाजूचे वातावरणच एवढे गंभीर आहे की आपोआप न मागताही मानसिक ताण आपल्याला सहन करावा लागतो. आता पहा आपण दर महिन्याला वीज बिल वेळेवर भरत असतो. कसं समाधानकारक चाललेले असते. पण एखाद्या महिन्यात काय होते, बिलच येत नाही. आपण वाट पाहतो, मग दुसर्या महिन्तात बिल येते भरमसाठ, कारण काय तर मिटर बंद असल्याने, सरासरी बिल पाठविलेले असते, आला का ताण? मग आपण म्हणतो जाऊ वीज बिल कार्यालयात आणि आपली बाजू मांडून बिल कमी करून आणू आणि भरू बिल. पण कय होते, वीज पुरवठा बंद करणारा येतो आणि सुनावतो, साहेब आपण दोन महिन्यांपासून बिल भरलेले नाही, तेव्हा आम्ही वीज कापणार. आपल्याला प्रचंड ताण येतो, आणि चिडचिड होतो, सांगा आता काय करणार? झक मारत आपण सगळं बिल भरतो, आणि त्या महिन्याचे बजेट कोलमडते.
दुसरा प्रसंग घाईघाईत आपल्याला तातडीच्या कामासाठी जायचे असते आणि पुढच्याच चौकात ट्रॅफिक जाम असते, धड पुढे जाता येत नाही धड मागे येता येत नाही. वरून ऊन लागत असते, असा राग येतो, नंतर कळते की, सिग्नलचे दिवे बंद असल्याने ट्रॅफिक जाम झालेय काय करणार? असो, तर असे खूप प्रसंग असतात, मग काय करणार? उपाय शोधणे.
आम्ही एक उपाय सांगतो पहा, आता आपली गाडी गर्दीत अडकलीयना ह्म एक काम करा, आपले आवडते गाणे थोड्या मोठ्याने म्हणा, आणि मध्येच त्याच गाण्यावर शिटी वाजवा,बघा कसा ताण नाहिसा होतो ते. अजून एक सांगतो, शेजारी उभा असलेलाही वैतागलेलाच असणार ना? एक तर त्याला नकळत तुमच्या गाण्यात इंटरेस्ट वाटू लागतो आणि त्याचाही ताण कमी होतो. किंवा काय करायचे, त्या माणसाशी बोलायचे, अरे मी तुम्हाला कुठेतरी पाहिलेय आपण साने ना? तो म्हणतो नाही, मी दाते. ओके ओके काय करता आपण? बस झाले संभाषण सुरू. तो सुद्धा सगळा ताण विसरतो. शिवाय आजुबाजूचे लोकं सुद्धा कळत नकळत आपल्या कडे बघू लागतात. आणि आपण मानसिक ताणाची साथ कमी करण्यास मदत करीत असतो.
काही उपाय बघू यात.
आपल्या काही आजार झालाय का? डॉक्टरकडे गेलात ना? औषधे आणलीत ना? बरं आपण काही करू शकतो का? नाही ना? मग चिंता कशाला करता?डॉक्टरवर विश्वास ठेऊन गप्प बसा. ताण नका वाढवू.
सतत काहीतरी वाचा, विचार करा, नाहीतर कोरे कागद घेऊन काहीतरी लिहीत बसा. रिकामं मन सैतानाचं घर.
जवळपास एखादा मॉल असेल तर छान ए.सी.त फिरून या. असं थोडंच आहे काहीतरी खरेदी केलीच पाहिजे?
जे काही आहे ते आपण स्वतःच आहोत प्रथम आपल्यावर प्रेम करा. आपल्याला मनाच्या आरशात बघा. समजून घ्या. भगवान रजनीश नेहमी म्हणायचे एकदाच सर्व कपडे काढून, नग्न अवस्थेत आरशासमोर उभे रहा आणि आपल्याला ओळखा.
समाजात लोक कोर्टाची पायरी का चढतात, त्यांना काय हौस असते काय? पण नाही जे कायदे आपण बनवलेत तेच राबविण्यासाठी न्यायालये उघडली, कायद्याचे शिक्षण घेऊन वकील तयार झाले, लोकांना कायद्याचा अर्थ समजावून देण्यासाठी. जेव्हा न्यायाधीश न्याय सुनावतात, तेव्हा ते जगातील परिस्थितीचा विचार करत माहीत, कारण त्या चार भिंतींपलिकडेही समाजाचे जग असते, पण न्यायाधीश मात्र समोर आलेल्या पुराव्यावरून न्यायदान करतात. हे किती योग्य आहे. कायदा राबविणारे कितीही चतुर असले तरी, सामाजिक सभ्यता ही समाजाच्या वळणावरच अवलंबून असते ना? नुसता कायदा राबवून शांतता प्रस्थापित होत नसते, कारणा कायदा समाज, समाजातील माणसे जन्माला घालत नसतो. मासांचे आचार विचार बदलू शकत नाही, उलट अशी कित्येक उदाहरणे आहेत की, थोड्याशा शिक्षेने मोठमोठे गुन्हेगार तयार झालेत. लक्षात घ्या कायदा राबविण्यासाठी प्रत्येक वेळॆस पोलीसांची फौज उभी राहू शकत नाही, त्यालाही मर्यादा आहेत. नाहीतर माय नेम आणि जर्मन बेकरी असा प्रकार घडतो.
काश्मीरमध्ये दर दोन तीन माणसांमागे एक पोलीस किंवा जवान आहे, मग तिथे तर कायदा चांगलाच राबवला गेला पाहिजे, मग मागील दोन दशकांमध्ये तिथे शांतता का प्रस्थापित झाली नाही? आसाममध्ये बोडो किंवा उल्फा दहशतवाद्यांना आळा बसला काय? त्यामानाने महाराष्ट्र खूप सुरक्षित आहे.
कायद्याचे राज्य होण्यासाठी, न्याय मिळण्यासाठी आज वृत्तपत्रे आणि प्रसार माध्यमे महत्वाची भूमिका बजावत आहेत हे आपल्याला विसरून चालणार नाही.
पुण्यात बॉम्बस्फोट झाला आणि पुणे दहशतवादाखाली आले. याला कोण जबाबदार याबद्दल आता उलटसुलट चर्चा होतील. पण ज्यांचे प्राण गेले आणि जे कायमस्वरूपी अधू झाले, त्यांचे काय? पुणॆ शहरातील सर्व पोलीसदल शाहरूखखानाच्या माय नेम इज खान चित्रपटाला संरक्षण देण्यात मोठेपणा समजत होते आणि याच ढिलाईचा अतिरेक्यांनी फायदा घेतला. कोण तो शाहरूखखान त्याच्या चित्रपटाला एवढी सुरक्षित?ता कमाल आहे. बरं यात पोलीसांची तरी चूक म्हणता येईल का, नाही कारणे फायद्याचे राजकारण हे राजकारणीच करतात. म्हणाला असेल शाहरूखखान काहीतरी, पणा त्याकडे दुर्लक्ष करायचे हे या राजकारण्यांना कोण सांगणार. महागाई वाढते आहे याबद्दल कोणी आवाज उठवत नाही. असले चाळे मात्र चांगले जमतात. पोलीसही साधा विचार करत नाहीतकी काय बरोबर आहे ते. नसता प्रदर्शित झाला असता त्याचा सिनेमा तर काय बिघडले असते? किती खर्च झाला असेल, पोलीसांवर. तो काय शाहरूखखान देणार आहे.
पण या मानसिकतेचाच फायदा अतिरेक्यांनी घेतला. आता सर्वत्र नाकाबंदी करतात. सर्वांच्या झडत्या चालू आहेत. अरे काय आता लगेच अतिरेकी येणार आहेत काय? आणि ते काय शस्त्रे घेऊन रांगेत उभारून झडती देणार आहेत? पण झाले ते अतिशय गंभीर झाले. सर्वांनी आपल्या जीविताची काळजी स्वतःच घेतली पाहिजे, कारण सामान्य माणसांना कोणीही वाली राहिलेला नाही.
समजा फक्त समजा बरं का, जास्त विचार करू नका, पण जर केलात तर माझा नाईलाज आहे.
एका रम्य संध्याकाळी तुम्ही बाजारात काही खरेदी करायला गेलात. दोन चार दुकाने फिरलात पण काही तुमच्या मनासारखे मिळत नाही, काही ठिकाणी भाव जास्त तर काही ठिकाणी वस्तुच चांगल्या नाहीत. चालता चालता तुमच्या ध्यानात यायला लागते की खूप वेळेपासून एक स्त्री आपल्या मुलाला कडेवर घेऊन तुमच्या बाजूबाजूने चालत आहे. ज्या दुकानात तुम्ही जाताल त्यात्या ठिकाणी ती तुमच्या मागेमागेच आहे. अगदी तुम्ही विचारपूस करीत असलेल्या वस्तूतही नाक खुपसत आहे. तुम्ही म्हणता जाऊ दे बायकांचा स्वभावच असा असतो, तुम्ही विरोध करीत नाही.
अचानक त्या बाईला तुमचा धक्का लागतो. आणि ती बाई आरडाओरडा करू लागते. हा माणूस माझी छेड काढत आहे म्हणून. तुम्हाला काही कळतच नाही अचानक असे काय झाले. मघापासून तुम्ही या बाईला पाहताय पण दुर्लक्ष करताय. मग असे अचानक काय झाले? लागला असेल गर्दीत धक्का म्हणून एवढा आरडाओरडा? लोक जमा होतात, ते त्या बाईलाच विचारतात, काय झाले, तुम्हाला कोणीच काही विचारत नाहीत. बघताबघता पाच पन्नास लोक जमा होतात . तरूण, म्हातारे, स्त्रिया, मुली सर्वजण जमतात. सर्वजण आता तुमच्याकडे संशयित नजरेने बघतात. काही जण म्हणतात, अरे अरे काय कलियुग आले आहे, एका लेकुरवाळी बाईला दिवसाढवळ्या छेडतात. काहीजण म्हणतात याला बदडा. आता मात्र तुमची पाचावर धारण बसते. ती बाई काहीच बोलत नाहिये, आणि बोलायचा प्रयत्न करीत असेल तरी तिचे आता कोणीच ऐकून घेत नाही, सर्वांच्या नजरा तुमच्या कडेच. आता मात्र प्रकरण फारच सिरीयस झालेय. तुम्ही त्या बाईला विनवणी करताय ती काही बोलायचा प्रयत्न करतेय पण तिचे कोणी ऐकूनच घेत नाहिये. तुम्ही म्हणताय अरे ही माझी बायको आहे, झाले मग तर असा भडका उडतो की लोकं म्हणतात, अरे काय निर्लज्ज माणूस आहे आता ह्या बाईला आपली बायको म्हणतोय, द्या याला पोलिसांच्या ताब्यात. पोलीसय येतात आणि तुम्हाला घेऊन जाऊ लागतात, ती बाईही पाठोपाठ येते, पण काही उपयोग नसतो. ती तुम्हाला नंतर सोडवून घरी घेऊन जाते. कारण ती त्याची बायको असते.
अरे मी सुरूवातीसच म्हणालो ना की समजा म्हणून, काय टेन्शन घेऊ नका, पण भर रस्त्यात आपलीच बायको अशी वागली तर? फक्त कल्पना करा.
जगातील सर्वाधिक भूकग्रस्त लोक भारतात आहेत. भारतात रोज ३४ कोटी लोक रात्री न जेवताच झोपतात. १० हजारापेक्षा अधिक भारतीय भुकेपायी मरतात. जगातील उपाशी व्यक्तींमध्ये भारतीयांची संख्या १/३ (तिसरा हिस्सा) भरते. एका आकडेवारी नुसार ग्रामीण भारतातील ३७% जनता दारिद्र्य रेषेखाली आहे. त्यातील ८०% लोक कुपोषित आहेत. आहार, कँलरीज, सकस अन्न इ. बाबत झालेल्या संशोधनाच्या अधिकृत आकडेवारीवरुन ही दीर्घकालीन उपासमारीचे दर्शन घडते. याला भूकबळी म्हणायचं की अदृश्य नरसंहार? (परशुराम रे, निर्देशक - सेंटर फॉर एन्हार्यमेंट अँड फूड सिक्युरिटी)
दुसर्या बाजूला भारतात १९९० ते २००६ या काळात अन्नधान्य शेतीखालची जमीन ६० लाख हेक्टर्सनी घटली आहे आणि याच काळात सरासरी प्रतिमाणसी दैनिक अन्नग्रहण ४६८ ग्रँमवरुन ४१२ ग्रँमवर आले आहे. (जागतिक खाद्य परिषद, राष्ट्रीय आरोग्य सर्व्हेक्षण)
महाराष्ट्रात (सडलेल्या) अन्नधान्यापासून दारु बनवण्याची परवानगी ३६ कारखान्यांना देण्यात आली आहे.
एवढे सडलेले धान्य त्यांना कुठून मिळणार? शेतकरी त्याचे धान्य सडू नये यासाठी आटोकाट प्रयत्न करतो. अवकाळी पावसाने एखादे वेळी होते नुकसान, ते ही २० ते ३० टक्के. पण दर वर्षी असे कुठे असते? शिवाय त्यातील बरेचसे धान्य पशुखाद्य म्हणून वापरता येते.
अगदीच जर सडले असेल तर मग त्या धान्याला परत सडवून दारु बनवणे तरी कसे शक्य होईल? (एका शेतकरी बाईचा आश्चर्याने विचारलेला प्रश्न)
अहो बाई, भूक लागली म्हणजे दोन भाकरी जेवता तुम्ही, दारु काय, एक पौवा मारला की भूक गायब, सरळ झोपच लागते. अन्नधान्य टंचाईवर नामी उपाय आहे हा ! पण अशी रोज भूक मारल्याने शरीर टिकेल का?
शरीर कशाला टिकायला पाहिजे? भारतात गरीबांचीच तर लोकसंख्या जास्त आहे. हळूहळू ते कमी झाले तर चांगलेच होईल. पॄथ्वीवरचा भार कमी होईल.
पण दारुची टंचाई आहे, शौकिनांना पुरेशी मिळत नाही असे तर काही ऐकू आले नाही, मग ह्या नवीन कारखान्यांना परवानगी देऊन दारुचा महापूर वाहवायची गरज काय?
ऊसाच्या मळीपासून जे अल्कोहोल बनते ते पेट्रोल, डिझेल मध्ये मिसळता येते. धान्याची दारु पिण्यासाठी चांगली असते. ते मोठे शास्त्र आहे. तुला नाही कळायचे.
मला नकोच आहे ते .... दारु पिऊन माणूस कसा हैवान बनतो ते मी रोजच पाहते. पोरगा मायबापाला ओळखत नाही, नवरा बायकोचा जीव घ्यायला धावतो. बाप-पोरं, शेजारी-पाजारी सगळ्यांची भांडणच भांडणं सुरु असतात. ह्या सर्वांच्या मुळाशी दारुच असते. फ़क्त गरीबांचेच संसार दारुने उध्द्वस्त होतात असेही नाही. आपल्या शेजारचे गाव पाहा ना ! तिथे तर वर्षी १५-२० जीव दारुपायी जातात. त्यातील अर्ध्यापेक्षा जास्त मध्यमवर्गीय असतात. मरणार्यांचे वय ४०-४५ च्या आत असते. अशांची मुलं मग मोकाट सुटतात अ गुंडागर्दीकडे वळतात. आमच्या लहानश्या रवाळा गावात २५ मुलं अशी आहेत किंवा अति मद्यपानाने लिव्हर निकामी होऊन अथवा अपघातात बापच मरुन गेले आहेत. काहींचे तर त्याच कारणाने आई-बाप दोघेही नाहीत. हे सर्व सरकारला कळत नाही का?
सगळे कळते. आताच्या मुख्यमंत्र्यांनी मागील वर्षी मद्य नियंत्रण नीती ठवविण्यासाठी समिती नेमली. त्या समितीच्या शिफ़ारसी आम्ही स्वीकारु असे सांगितले. बेकायदा दारुचे पूर्ण उच्चाटन व वैध दारुचे प्रभावी नियंत्रण अशी ह्या समितीने एकमताने शिफ़ारस केली. तशी ग्वाही सरकारने द्यावी असे समितीने सुचविले आहे. पण हा अहवाल मंत्री मंडळासमोर आणण्याऐवजी सरकार तर उलटच पावले टाकत आहे. येत्या दोन वर्षात धान्यापासून दारु बनवण्याचे २३ कारखाने पूर्ण क्षमतेनिशी काम करु लागतील. प्रत्येकी रोज ३० हजार ते सव्वा लाख लिटर दारु ते बनवतील. ही दारु बनवतांना तोटा होणार आहे. म्हणून दयाळू मायबाप सरकार प्रत्येक लिटरमागे १० रुपये अनुदान देणार आहे. एका उद्योजकाला ५० कोटी इतके कमाल अनुदान देण्यात येईल. हे सर्व मद्य महाराष्ट्रातच विकणे बंधनकारक आहे.
‘बापा बापा,एवढी दारु बनवाले धान्य किती लागेल?’
‘दरवर्षी ८ लाख टन धान्य या कारखान्यांना लागणार आहे. ३६ कारखान्यांना पूर्ण परवानगी मिळाल्यास १४ लक्ष टन धान्य लागेल. एवढे सडके धान्य कुठून मिळणार? हा प्रश्न त्यामुळे खराच आहे. सगळ्यांनाच कळते की सडक्या धान्याच्या नावाखाली चांगलेच धान्य वापरले जाणार आहे.’
‘ह्याच्या विरोधात कोणी बोलत नाही का?’ कोण बोलणार? विरोधी पक्ष नेत्यांच्या अ सत्ताधारी नेत्यांच्याही मुलामुलींना ह्या प्रकल्पासाठी मंजुरी देण्यात आली आहे. तेरी भी चुप अन मेरी भी चुप असा हा मामला आहे. सर्वांचेच कल्याण ह्यातून साधणार आहे.
सर्वांचे म्हणजे राजकारणी व त्यांचे पोरं-पोरी व नातेवाईकांचेच न ?’
‘आम्हाला हे असे कल्याणकारी राज्य नको. आमची भाकर तेवढी आमच्यासाठी राहू द्या, अन दारु नियंत्रणात आणा. एवढे झाले की आमचे कल्याण आम्ही करतो.’
‘तुमचं म्हणणं सोळा आणे खरं, पण राजकारणी पुढार्यांना त्यांचं, त्यांच्या पोरांच, चेल्याचपाट्यांचं भलं करायचं आहे. निवडणुका जिंकायच्या आहेत, त्यासाठी पैसा लागतो तो कसा मिळवायचा मग?
म्हणजे आमच्या कल्याणाच्या नावाखाली हे पुढारी स्वत:चे कल्याण करुन घेत आहेत. सामान्य माणूस दारुच्या पुरात वाहून गेला तरी चालते, नव्हे तो तसा वाहून गेलाच पाहिजे, दारुत त्याची सदविवेक बुध्दी बुडाली म्हणजे पुढार्यांना रान मोकळे. हे नेते काही करु देत, भ्रष्टाचार वाढू देत, सामान्यांच्या मुलांना उच्चशिक्षण अप्राप्य होऊ दे, रोगराईनी सर्व जण ग्रासू देत, शेतकर्यांच्या आत्महत्या वेगाने घडू दे, अन्नधान्याची टंचाई तीव्रतर होऊ दे...... त्याला कशाचेच काही वाटणार नाही. दारुचा प्याला मिळाला म्हणजे सर्व दुखांचा अंत .....हिशोब सांगतोच की आता जेवढी दारु बनणार आहे ती महाराष्ट्रातील सर्व पुरुषांना ‘एकच प्याल’ पुरवणार आहे.
उद्याचा महाराष्ट्र दारुत लोळत पडलेला बघणे आपल्याला परवडणार नाही. आपले अन आपल्या मुलांचे कल्याण,पर्यायाने उभ्या महाराष्ट्राचे कल्याण आपल्याच हाती आहे. आपल्या परिसरात सुरु होणार्या धान्यापासून दारुच्या कारखान्याला पूर्ण ताकदीनिशी विरोध करु या.
सर्वोदय प्रेस सर्विस (मराठी)
महाराष्ट्रात महागाई उतू चाललीय आणि लोकप्रतिनिधी मात्र याकडे कानाडोळा करून बाकी वाद करण्यातच गुंतले आहेत, आणि निवडणुकीच्या वेळेस दिलेली आश्वासने विसरून गेलीत. त्यांना महागाईची झळ पोचत नाहीये कारण अधिकृतरित्या त्यांना सरकारकडून सवलती मिळतात, शिवाय वरकमाई आहेच.
पहा त्यांना मिळणारे भत्ते - मासिक वेतन १२००० रूपये, वेगवेगळ्या कामकाजासाठी १०००० रूपये, कार्यालयीन खर्चासाठी १४००० रूपये, प्रवासभत्ता ४८००० रूपये, अधिवेशन काळातील हजेरी भत्ता रोज ५०० रूपये, देशभरात रेल्वेतून देशभर कुठेही पहिल्या वर्गातून प्रवास, विमानप्रवास बिझनेस क्लासमधून पत्नी अथवा पी.ए. सोबत ४० वेळा मोफत प्रवास, घरगुती वापरासाठी ५०००० युनिट पर्यंत मोफत वीज म्हणजेच साधारण ४००००० रूपये जमा, दूरध्वनीचे १ लाख ७० हजार मोफत कॉल्स, म्हणजेच प्रत्येक खासदारावर वर्षाला अंदाजे ३२ लाख रूपये खर्च सरकारी तिजोरीतून, आणि असे ५३४ खासदार आहेत म्हणजे आपल्या कराच्या पैशातून हे लोकप्रतिनिधी ८५५ कोटी रूपये खातात. कोण काय करू शकते, कारण आपणच त्यांना निवडून दिले आहे ना? आता आम्हाला सांगा कशी यांना समजणार महागाई म्हणजे काय ते? एवढे असूनही हे आपापसातच भांडत बसलेत. अगदी मराठी अमराठी वाद, शाहरूख खान काय म्हणाला, कोणी म्हणतो मी ज्योतिषी नाही, कोणी चित्रपटाचे राजकारण करतोय, कोणी लोकलमधून प्रवास करून स्टंटबाजी करतो पण यांना विद्यार्थ्यांच्या आत्महत्त्या दिसत नाहीत, साखरेचे भाव समजत नाहीत.
दुर्दैव आपले आपल्याला अशा देशात रहावे लागते ते.
जगात अनेक देशांमध्ये एक विकार समस्या बनून राहिला आहे, तो म्हणजे अल्झेमर्स डीसीज किंवा विस्मरणाचा विकार. यावर बरेच संशोधन झाले, पण सा विकार एक समस्या बनूनच राहिला आहे. इंग्लंड मध्ये तर सुमारे नऊ लाख लोक या विकाराने ग्रासले आहेत आणि हा विकार सर्व जगभर पसरण्याची भिती शास्त्रज्ञ व्यक्त करीत आहेत. भारतात भिती बाळगण्याचे कारण नाही कारण या देशात अनेक रोगांनी पाय रोवला आहे.
पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशा भारतात, उत्तरेला बल्लभगड नावाचे एक खेडेगाव आहे, तिथे मात्र विस्मरणाचा विकार वृद्ध मंडळीत अजिबात आढळत नाही. बहुतेक म्हातारी माणसे सकाळ्ची कामे उरकली की एका ठराविक ठिकाणी जमतात आणि प्रसन्न गप्पा मारतात. इंग्लंडमधील पीतसबर्ग विद्यापीठातील शास्त्रज्ञ या गावी ठाण मांडून या लोकांचा अभ्यास करीत आहेत. यांनी पाच हजारांहून अधिक लोकांची अल्झेमर्सची चाचणी घेतली आहे. आणि यावर निरनिराळ्या प्रक्रिया राबवत आहेत. हा मागासलेला भाग आहे, परंतु या लोकांची स्थानिक संस्कॄतीच यासाठी कारणीभूत असावी असे शात्रज्ञांचे मत आहे. या भागातील लोकांचे सरासरी आयुष्यमान तुलनेने प्रगत देशांपेक्षा खूप कमी आहे,पण यांना हा विकार नाही. जगात सर्वत्र हा रोग पसरलेला असताना सुद्धा या भागात लागण नाही, याचेच आश्चर्य डॉ. विजय चंद्रा यांना वाटते. त्यांच्या मते अल्झेमर्स विकारासाठी ’एपीओ ४ इ’ हे जनुक कारणीभूत असते, पण बल्लभगडच्या लोकांत हे जनुक आढळतच नाही, याचेच शात्रज्ञांना नवल वाटते.
बल्लभगडचे लोक शाकाहारी आहेत , ते खूप कष्ट करतात, शेतीवाडी चांगली पिकत असल्याने मानसिक ताण तणाव नाही, एकत्र आणि सुदृढ कुटुंब पद्धती ही प्रमुख कारणे, अल्झायमर विकार न होण्यासाठी असावीत. ह्या विचाराने असाच कार्यक्रम जगभर राबवावा असे जागतिक पातळीवर ठरत आहे.
बल्लभगडच्या लोकांकडून एक चांगला धडा शिकण्यासारखा आहे.
झी मराठी वरील सारेगमप कर्यक्रमाची अंतीम फेरी ३१ जानेवारीला झाली त्यात उर्मिला धनगर, अभिलाषा चेल्लम आणि राहुल सक्सेना यांनी अप्रतीम गाणी सादर केली. या गायकांना आणि अशा हजारो गायकांना झी मराठी जे प्रोत्साहन देते आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. शिवाय आम्हा रसिकांनाही काही तरी वेगळे ऐकायला मिळते, हा सुवर्णयोग आहे.
सारेगमपच्या कार्यक्रमामुळे महाराष्ट्रातील आणि देश, जगभरातील प्रेक्षकांना संगीतातील खाचाखोचा, त्यातील लय समजली आणि संगीताचा निखळ आनंद लुटता आला. राहुल सक्सेना आणि अभिलाषा चेल्लम हे दोघेही अमराठी असताना सुद्धा, त्यांच्याकडून अवधूत गुप्ते आणि सलिल कुलकर्णी याणी जी मेहनत करून घेतली, त्यास तोडच नाही. हे दोघेही गाताना अजिबात अमराठी वाटत नव्हते. शिवाय त्यांनी जी क्षमता सिद्ध केली ती कौतुकास्पदच आहे.
उर्मिला धनगर ही महागायिका बनली, तिला मायबाप प्रेक्षकांनी जी दाद दिली, ती तिच्यातील गायिकेला. तिची कौटुंबिक पार्श्वभूमी लक्षात घेता, तिचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. सुलोचना चव्हाण यांनी गायलेल्या लावण्या पेश करणे म्हणजे शिवधनुष्य पेलण्या सारखे आहे असे म्हणत पण उर्मिला धनगरने ते लीलया पेलले. एका कार्यक्रमात लावणी सादर केली तेव्हा सुलोचनाबाईंनी तिला भरभरून दाद दिली, हीच तिच्या यशाची पावती ठरली. लावणीतील तो नखरा, अदा, मादक सौंदर्य, अर्थवाहीपण फक्त उर्मिला धनगरनेच पेश करावे, तिच्यासारखी तीच.
अजय अतुल सारखे महान संगीतकार सुद्धा म्हणाले, उर्मिलाला कोणाचीही दृष्ट लागू नये. बस आणखी काय पाहिजे!
मराठी रसिकांनी उर्मिला धनगरची जी निवड केली, त्याबद्दल आम्ही सर्वांचे ऋणी आहोत.
काही वर्षांपूर्वी शाळेतील मुलांना ’परिक्षा’ या विषयावर चित्र काढायला सांगितले तेव्हा मुलांनी राक्षसाचे चित्र काढले. यावरून मुलांच्या मनात परिक्षेविषयी किती भिती आहे याचा अंदाज येतो. त्यांच्या मनात नकारात्मक भावना आहे हेच जाणवते. यावरून असा बोध होतो की, त्यांच्याकडे कानाडोळा करून चालणार नाही. जशा आपण मुलांकडून अपेक्षा करतो, त्याच प्रमाणे मुलांनाही पालकांकडून काही अपेक्षा असतातच ना? मुले नेहमी पालकांकडे आशेने बघत असतात. लहान मुलांना बागुलबुवाची भिती दाखवली, किंवा मुले घाबरली तर त्यांना आईच्या पदराशिवाय दुसरी सुरक्षित जागाच सापडत नाही.
पालकांनो जरा कामाधंद्यातून वेळ काढून मुलांच्या समस्या समजावून घ्याव्यात. चांगल्या शाळेत, मोठे डोनेशन देऊन घातले, आणि मोठा क्लास लावला म्हणजे आपले कर्तव्य संपले असे समजू नका. मुलांना शाळेत काही ताणतणाव आहे का? याची चौकशी करा. कधीकधी काय होते वर्गातील एखादा बंड मुलगा त्रास देत असतो, आणि आपला मुलगा त्याला घाबरून शाळेत जात नाही म्हणतो, मग त्याला धाक दाखवून शाळेत पाठविल्यास त्याची घुसमट होते आणि तो मग सगळे मार्ग संपल्यावर अतिरेकी होतो. त्याला जवळ बसवून त्याची विचारपूस करा.
आपल्याला सर्वांना मुलांची काळजी असते, आणि काळजी असावी, पण नुसतीच असू नये त्यासाठी सजग असावे. मुलांवर कोणतेतरी दडपण नाही ना, याची खात्री करावी. आपल्याला पाल्याची काळजी वाटते, हे मुलांना पटविण्यासाठी त्यांच्याबरोबर आपुलकीने मैत्रीपूर्ण संवाद साधावा, त्याच्याशी मित्रत्वाच्या नात्याने बोलावे. त्याच्या समस्या जाणून घ्याव्यात. त्याला अभ्यासाचे ओझे वाटत नाही ना ते पाहावे. शनिवार रविवारी मुलांना बागेत न्यावे, त्यांना काय हवे नको ते पहावे, म्हणजे मुलांना वाटते एक दिवस का होईना आईबाबा आपल्याल वेळ देतात, त्यामुळे मुलांची मने फ्रेश होतात. मुलांना आवडणारे पदार्थ शक्यतो घरीच उपलब्ध करून द्या. त्यांच्या आहारावर जातीने लक्ष द्या, नोकरांवर सोडू नका. रोज झोपण्यापूर्वी त्याची आपुलकीने चौकशी करा. त्यालाही बरे वाटेल.
शेवटी आपण सर्व कुणासाठे करतो, मुलांसाठीच ना? लक्षात घ्या मुलेच आपली भविष्यकाळ आहेत.
आपलं भूतकाळात चांगलं होतं की, आपण भविष्यकाळात चांगल्याची अपेक्षा करत आहोत, तर हे सर्व विसरा आणि विचार करा, आतचा जो आयुष्यातील बिंदू आहे तोच आपल्या जीवनात बदल घडवून आणणार आहे. आताचा हा बिंदू आहे तोच आपण होकारात्मक विचार करून एक चांगल्या सकारात्मक आयुष्याची सुरूवात करू यात. समजा जर आपला मेंदू काही नकारात्मक विचार करत असेल तर त्याला थांबवा आणि सकारात्मक विचाराकडे वळवा. एकदा का गाडीने रूळ बदलला ना तर काहीही करून आपण त्या गाडीची दिशा बदलू शकत नाही. तसेच विचारांचे आहे. यालाच म्हणतात विचारांतून बाहेर येणे.
कल्पना करा तुम्ही हॉटेलात बसलात, तेव्हा तुमच्या समोर मेनू येतो, हाच मेनू जर विचारांचा असेल तर? तुम्ही एक किंवा अनेक विचार निवडू शकता, आणि हेच विचार आपल्या भविष्यातील अनुभव ठरतील. बघा आपण एखादे अन्न खातो त्यापासून आजारपणा येते, आपण पुन्हा माहीत नसतांना तेच अन्न खातो पण मग लक्षात आल्यावर खातो का? नाही ना! तसेच विचारांचे आहे, द्या सोडून नकारात्मक विचार. जर समस्या निर्माण झाली तर ती कशी सोडवायची यापेक्षा ती का निर्माण झाली याचा विचार करा मग ती सोडविण्याचा. आपल्या मेंदूतील विचार आपले भविष्य घडवत असतात.
शाळा कॉलेजातून शिकविले गेले पाहिजे की विचार कसे काम करतात, त्या विचारांना वळण कसे द्यावे. काय शिकून फायदा आहे? की कोण कधी जन्मला आणि मेला. सनावळ्या पाठ करायच्या कशासाठी, तर काय त्यांचे वाढदिवस साजरे करायचेत. कशासाठी पाहिजे, पानिपत युद्ध कधी झाले?. त्यापेक्षा मुलांना शिकवा जगात धन चांगल्या मार्गाने कसे मिळवायचे, भ्रष्टाचार म्हणजे काय, मिळवलेले पैसे कसे व्यवस्थित जपून ठेवायचे, चांगले आईवडिल म्हणजे काय. लोकांशी चांगले संबंध कसे निर्माण करावेत,सकारात्म विचार कसा करावा, बाबा आता अशा ज्ञानाची गरज आहे. कल्पना करा असा अभ्यासक्रम असेल तर भावी पिढी कशी निर्माण होईल.
आकाशात पाहून हात वर करून,एक मंत्र रोज म्हणा ( कितीही वेळा ) -
या विश्वातील सर्व शुभ आणि पवित्र शक्तींचा स्वीकार करण्यास माझा आत्मा तयार आहे आणि या शुभ आणि पवित्र शक्ती माझ्या समस्या दूर करून मला सुख प्राप्त करून देतील याची मला खात्री आहे.
आणि बघा काय बदल घडून येतो ते.
जगात लोक यशस्वी होतात, पण ते वेगवेगळ्या क्षेत्रात, त्यांच्या यशाची कल्पना, संकल्पना वेगवेगळी असते. आता पहा झरे यशस्वी एकंदर लोकसंख्येच्या किती टक्के असतात, अगदीच नगण्य. आता यशस्वी कशाला म्हणावे? दोन उदाहरणे पाहू यात. एकजण साधा कामगार असतो, पण त्यातल्या त्यात पैसे वाचवून मुलांना चांगले शिक्षण देतो, मुलांना चांगली नोकरी, मिळते, त्यांची चांगल्या घरात लग्ने होतात, आणि मुले आईबापांना कधीही अंतर न देता सुखात ठेवतात. पण दुसरा भरपूर कमावतो आहे, गाड्या घोडे आहेत, भरपूर पैसा आहे, पणा मुलांना व्यसने आहेत याला काहीतरी शारिरीक समस्या आहेत, तसा हा सुखी आहे पैशाची चिंता नाही, म्हातारपणी कष्ट करण्याची गरज नाहे, मग हा सुखी का? तर सुखाची व्याख्या व्यक्तिनुरूप बदलते.
एखाद्याला शास्त्रज्ञ व्हायचे असते, पण आईवडिलांच्या हट्टाखातर त्याला वकिली करावी लागते तर आता तो आयुष्यभर पैसा मिळवूनही समाधानी असेल काय? त्याची शास्त्रज्ञ होण्याची खंत त्याला टोचतच राहील ना? आपले आयुष्य जेमेतेम पन्नास ते साठ वर्षांचे त्यातील आपण पंचवीस वर्षे शिक्षणात घालवतो, नंतर कामधंदा शोधण्यात दोन चार वर्षे खर्ची पडतात. उरली साधारण तीसएक वर्षे त्यात काय देवे लावणार. म्हणून माणसाला बुद्धी दिली आहे त्याचा उपयोग कष्ट आणि परिश्रम यातील फरक ओळखायला शिका. आपल्याला शिकवलेले असते, "आराम हराम आहे","कष्टाला पर्याय नाही", "कष्ट कर फळाची अपेक्षा करू नको ", "मेहनतका फल मिठा होता है" बाबा हे सर्व निबधात लिहायल सोपे आहे, वास्तविक आयुष्यात काय? दिवसभर रस्त्यावर काम करणारा मजूर काबडकष्ट करतो त्याला मिळतात चार हजार रूपये, पणा गल्ल्यावर बसलेला मालक काम न करता, किंवा वकील काहीही कष्ट न करता, काहीही भांडवल नसताना पैसे किती कमावतो तर महिन्याला वीस हजारांच्या वरच. कारणा त्यांनी बुद्धीचाबा पर करून घेतला आणि आपले ध्येय ठरवले.माण्साने बुद्धीच्या जोरावर मशिन्सचा शोध लावला, मग त्याचा वापर करून कष्ट कमी करायला पाहिजेत ना.
दुकानात पुस्तके मिळतात, यशस्वी होण्याचे शंभर मार्ग, मी यशस्वी कसा झालो, पण ही पुस्तके लिहीणार्याच्या आयुष्यात डॊकावून पाहिले असता, ती अयशस्वी असतात, म्हणून अशी पुस्तके लिहून पैसे कमावून यशस्वी होतात. यशस्ची होण्यासाठी घरची आर्थिक परिस्थिती, आजूबाजूचे वातावरण, वैयक्तिक स्वभाव या गोष्टी कारणीभूत असतात, मग पुस्तके वाचून काय हॊणार.
खूपशी मुले आजुबाजूला बघून आपले ध्येय ठरवितात, किंवा वडिल म्हणतात त्याप्रमाणे पुढे जातात, मग मुलांच्या मनाचे काय? म्हणून आयुष्याची दिशा ठरवणे अतिशय महत्वाचे आहे. आम्ही दहाचीचे क्लास घेतो, तेव्हा मुलांना समजावून सांगतो, आणि त्याला आयुष्याचे कोष्टक दाखवतो, मग तो मुलगा अंतर्मुख होऊन विचार करूल लागतो आणि मग त्याला काही सांगावे लागत नाही.
दहावीची परिक्षा, फक्त एकच वर्ष कष्ट उत्तम मार्क -डोनेशनची गरज नाही - चांगले मोठे कॉलेज - चांगले मित्र - चांगले शिक्षण - उत्तम नोकरी - वशिला नको - भरपूर पगार - मग उच्च जीवनमान - उत्तम सुस्वरूप मुलीचे स्थळ सांगून येणार - मुलगी सुद्धा शिकलेली असणार - घरात सुशिक्षीत वातावरण - समाधानी - अपत्ये गुणी होणार - कारण आईवडिल सुशिक्षीत म्हणून संस्कार चांगले - मुलांचं करियर उत्तम - काळजी नाही - म्हातारपण सुखात .
हे सर्व कशामुळे? दहावीचा अभ्यास कष्टाने करून चांगले मार्क मिळविले तर.
आज ६१वा भारतीय प्रजासत्ताक दिन.
अनिवासी भारतीयांनो, आता तुम्ही पण प्रजासत्ताक सोहळा बघु शकता.
http://72.78.249.125/esakal/20100125/5599782320145400743.htm
केंद्राच्या जाहिरातीत पाकच्या अधिकाऱ्याचे छायाचित्र!
नवी दिल्ली - पाकिस्तानचे माजी हवाई दल प्रमुख तन्वीर अहमद यांचे गणवेशातील छायाचित्र पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या छायाचित्रांसह महिला व बालकल्याण मंत्रालयाने वृत्तपत्रांमध्ये आज प्रसिद्धीस दिलेल्या पूर्ण पान जाहिरातीत प्रसिद्ध झाले आहे. या गफलतीबद्दल पंतप्रधान कार्यालयाने देशाची माफी मागितली असून, चौकशीचे आदेश दिले आहेत.
वाचा समस्त भारतीयांनो वा्चा ही बातमी, आणि सरकारी कारभारात कायकाय होऊ शकते हे समजावून घ्या. राष्ट्रीय बालिका दिनानिमीत्ताने केंद्रीय महिला व बालकल्याण खात्यातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या सोबत पाकिस्तानी हवाई दलाचे माजी प्रमुख तन्वीर मेहमूद अहमद यांचाही फोटो झळकला आहे. कोणालाही कशी लाज वाटली नाही, कळत नाही. सर्वांनी फक्त दिलगिरी व्यक्त केली. झाले प्रकरण संपले. खरेतर ह्याला जे जबाबदार आहेत त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. कारण हे पहिल्यांदाच घडले आहे, तर भविष्यात घडणार नाही.
महिला व बाल कल्याण खात्याच्या मंत्री कृष्णा तिरथ म्हणतात, ’"ही घोडचूक आपली नाहीच. या जाहिरातीत प्रतिमांपेक्षा जो संदेश देण्यात आला आहे, तो महत्वाचा आहे. छायाचित्र केवळ प्रतिकात्मक असते." अरे अशा लोकांना जे बेजबाबदार विधाने करतात त्यांना हाकलून द्यायला पाहिजे.
आमचा नातू श्रीहरी कदम ऑस्ट्रेलियात इयत्ता पहिलीत शिकतो. भारतात आपण २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो, त्याचप्रमाणे तेथे त्यांचा हा दिवस स्वातंत्र्यदिन असतो.
जेव्हा हा शाळेत जात होता तेव्हा काल त्याने पाहिले काही मुले त्यांचा झेंडा हातावर टॅटू करून घेत होते. याची आई म्हणाली तुला टॅटू करायचे काय? तर हा म्हणतो आई भारतात मुले झेंडा छातीवर लावतात, ते एखाद्या मेडल प्रमाणे, किती proud आहे ना! एथे तर त्या झेंड्याचा टॅटू करतात.
एवढ्या लहान वयात फक्त भारतीय मुलेच असा विचार करू शकतात. परदेशांना तर खूपच लांब आहे. आम्ही अमेरिकेत असताना पाहिलेय, त्यांच्या झेंड्याच्या पॅंट शिवतात, हातरूमाल शिवतात काय आदर्श आहे ना? आपल्याकडे भारतात रस्त्यावर झेंडे विकतात आणि दुसर्यादिवशी ते रस्त्यातच फेकून देतात. शाळेतील मुलांना दुसर्या दिवशी ते झेंडे गोळा करायला लावून त्यांना आदर्श लावून दिला पाहिजे. पण लक्षात कोण घेतो?
आहेत भारतात कायदे भरपूर आहेत. पण ते पाळण्यासाठी नसतात. तर कोर्टात वकीलांच्या उपजीवीकेचे ते साधन बनून आहेत.
ही आहे दैनिक लोकसत्तातील एक बातमी -
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=27&Itemid=4
नवी दिल्ली, २० जानेवारी/पीटीआय
दिवंगत माकप नेते व पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योती बसू हे वयाच्या पंचाण्णव्या वर्षीही अतिशय चपळ होते, त्यामुळे त्यांच्या मेंदूचा अभ्यास बंगलोर येथील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ अँड न्यूरो सायन्सेस (निमहंस) ही देशातील अग्रगण्य वैद्यकीय संस्था करणार आहे.
आता यावरून काय लक्षात येते, की ज्योती बसूंचा मेंदू तपासायचा आहे, की ते पंचाण्णव्या वर्षी एवढे चपळ कसे. तपासा आमचे काय जाते? पण आता मुद्दा येतो की मग इतरांचे मेंदू का तपासायचे नाहीत? अतिरेकी एवढ्या लहान वयात, एवढे जीवावर उदार होऊन कामे करतात, त्यांना फाशीची शिक्षा दिल्यावर त्यांचासुद्धा मेंदू तपासा, कायकाय भरलंय त्यांच्या मेंदूत ते तरी एकदा कळू देत. म्हणजे तसेच धर्म आणि देशप्रेम आपल्या कोणाच्या मेंदूत भरता येईल काय? आता त्यावर संशोधन होणे जरूरीचे आहे. भारतात एवढा भ्रष्टाचार माजलेला आहे, त्यांचे ही मेंदू ते मेल्यानंतर तपासून, जतन करून ठेवावेत. शिवाय आताचे राजकारणी एवढे निगरगट्ट कसे हे सुद्धा त्यांचा मेंदू तपासून बघता येईल. जन्म झाल्यानंतर त्यांच्या मेंदूत अशी काय प्रक्रिया घडत होती, ते तरी संशोधनातून बाहेर येऊ देत. अशा सर्वांचे मेंदू जतन करून ठेवावेत, आणि जमल्यास हे मेंदू, जुने मेंदू काढून त्याजागी, रोपण करता येतात का ते पहावे. काही काही राजकारणी, भ्रष्टाचारी असे काही सुपीक मेंदू चालवतात, ज्याचे नाव ते. आम्ही तर म्हणतो अशा मेंदूचे एक कायमस्वरूपी संग्रहालय बनवावे. मग त्यात सर्वांचे मेंदू ठेवावेत.
राजकारणी जेव्हा शपथ घेतात, तेव्हाच त्यांच्याकडून देहदानाचे प्रतिज्ञापत्र करून घ्यावे. नव्हे तसा कायदा करावा. देहदानानंतर फक्त त्यांचा मेंदू काढून घ्यावा आणि बाकी निरूपयोगी भाग नातेवाइकांच्या स्वाधीन करावा. अंडरवर्ल्ड मधील जे अतिरथी महारथी आहेत त्यांचे मेंदू तर काय विलक्षण असतील ना! त्यांचा अभ्यास करणार्या डॉक्टरांनाच घेरी येईल.
खरे तर हा विचार आपल्या पूर्वजांना का सुचला नाही कोणास ठाऊक. नाहीतर आज आपल्याला चंगेजखान, हिटलर, नेपोलियन, सिकंदर, म.गांधी, नेहरू, लो.टिळक, इंदिरा गांधी वगैरेंचे मेंदू तपासून एक डाटा तयार करता आला असता. म्हणून आम्ही म्हणतो आपल्या पुढील पिढीसाठी, त्यांना स्फूर्ती येण्यासाठी आतापासूनच तयारीला लागले पाहिजे आणि कोणाकोणाचे मेंदू जमा करून त्यावर संशोधन करायचे आहे त्याची यादी बनवून त्याप्रमाणे संसदेत कायदा पास करून लगोलग त्याची अंमलबजावणी करावी.
आज राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत ठरले की, यापुढे टॅक्सीचालकांना परवाने देताना मराठी लिहीता, वाचता येणे जरूरीचे असणार आहे आणि मगच परवाने देण्यात येणार आहेत. खूप दिवसांनंतर अक्कल आली म्हणायची, आता आली हे काय थोडके झाले. सर्व महाराष्ट्र परप्रांतीयांच्या हातात जाण्यापुर्वी हे पाऊल उचलले हेच आम्हां मराठी जनतेवर सरकारचे उपकार झाले म्हणायचे.
आता हाच नियम सर्व क्षेत्रात लागू झाला पाहिजे. R.T.O. अधिकार्यांचे एकदां मराठी तपासून पहायला पाहिजे, कारण त्यांना मराठी आलेच पाहिजे. आता यावर काही अतीशहाणे लोक टीका करतील, कारण काही लोकांना संवयच असते फक्त विरोध करायची. सरकारने मनावर घेऊ नये. आता महाराष्ट्रात परप्रांतीयांची संख्या दिवसेदिवस वाढू लागली आहे. त्यातच वेगळ्या विदर्भाच्या हालचाली चालू आहेत. दुसर्या प्रांतातले राजकारणी लोकांचा विकास करण्याऐवजी आपलाच विकास साधतात, मग तेथील जनता देशोधडीला लागेल नाहीतर काय? जर त्यांनी त्यांच्या राज्यात उत्पन्नाची साधने निर्माण केली असती तर तेथील जनता परराज्यात, आपला संसार का सोडून आली असती? त्यांना नको वाटते काय आपल्या मुलाबाळांत रहायला. असो आपण त्याचा विचार करून काय उपयोग? पण राज्य सरकारचा निर्णय योग्य आहे. आपल्या घरात जर कोणी घुसखोरी करत असेल तर, कोण सहन करेल? त्याला हुसकावून दिले पाहिजे ना. नाहीतर तो़च आपल्याला घराबाहेर काढेल त्याचे काय? हे आम्हीच मागे एकदा आमच्या ब्लॉगमधून लिहीले होते. मग यांच्यासाठी काहीतरी नियम केलेच पाहिजेत. तसाच प्रकार राज्य सरकारर्ने केला आहे.
मागे एकदा एक ICICI चा ऑफिसर घरी आला होता, काही माहिती देण्यासाठी, तो बोलत होता हिंदीत, इंग्रजीत आणि आम्ही मराठीत. पण तो काही केल्या मराठीत बोलत नव्हता, तर आम्ही त्याला त्याच्या गावाविषयी विचारले तर तो होता दिल्लीकडचा. त्याला मराठी येत नव्हते. आम्ही त्याला सरळ घालवून दिले आणि मराठी शिक आणि मगच आमच्याकडे ये असे खडसावून सांगितले. आम्ही खूप वेळा मुंबईला जाताना पाहिलेय लोक मुंबईत हिंदीतच बोलतात, जरी मराठी येत असेल तरी. आपल्याला वाटते समोरच्याला मराठी येत नाही, पण त्यालासुद्धा तसेच वाटते. लक्षात ठेवा समोरचा कोणत्याही भाषेत बोलू देत आपण मात्र आपली मराठी भाषा सोडायची नाही. अगदी भांडायचे सुद्धां मराठीतच, कारण एकएक इरसाल शिव्या फक्त मराठीतच आहेत. ऐकल्यास अगदी नाकातले केस जळतील. सांगू? नको, ही ती जागा नाही. आपण काय समजून गेला असताल. मराठी कशी मर्दा सारखी वाटते, वाटते नाही आहेच. मराठी बोलतांना कसे मिशीला पीळ दिल्यासारखे वाटते. बाकी भाषा गुळगुळीत दाढीवरून हात फिरवल्यासारख्या वाटतात.
महाराष्ट्र राज्याचे या निमीत्ताने ’ जय हो ’. असाच आपल्या माय मराठीला तिचा पदर ओढणार्यांपासून, वस्त्रहरण करणार्यांपासून वाचवा.
ऐका हो ऐका, भारतात इंडियन प्रिमियर लीगचा लिलाव सुरू झाला. लिलाव भाग घेणारे मालक सरसावून बसले आहेत. जिंकणार्या घोड्यावर पैसे लावले जातील. ज्यांचा लिलाव होणार आहे, ते एखाद्या गुलामाप्रमाणे मालकाची वाट बघत आहेत. १२ मार्चला या स्पर्धेचा बिगुल वाजणार आहे, आणि या तमाशात कोणाकोण कलाकार आपली कला कोणाकडून सादर करणार आहेत ते कळणार आहे.
यावेळी पाकिस्तानी खेळाडूंना टाळण्यात आले आहे. त्याला कारण दहशतवादात पाकिस्तानवर संशय. ऑस्ट्रेलियात भारतीयांवर हल्ले होतायत त्याचेही परिणाम या लिलावावर जाणवू लागले आहेत, कारण त्या खेळाडूंना सुद्धा बाजारभाव नाही. ज्या प्रकारे हा लिलाव चालतो, ते पाहून घोडेबाजाराची आठवण होते. नंतर हे घोडे त्या त्या मालकासाठी जिवाचे रान करून पळणार, नाहीतर पुढ्च्या वेळेस लिलावात भाव मिळणार नाही ना! या वेळेस किरण पोलार्डला सर्वात जास्त म्हणजे ३.५० क्प्टी भाव मिळाला. भारतातील तीन खेळाडूंची लिलावत विक्री झाली. या पुढील का्ळात अजून कशाकशाचा लिलाव होईल, ते एक परमेश्वरच जाणो.
या वेळेस ’ सायलेंट टायब्रेकर ’ हा नवीन नियम करण्यात आला आहे. एका खेळाडूला खरेदी करण्यासाठी जास्तीतजास्त ३.५ करोड करोडचीच बोली बोलता येते, पण जर एका पेक्षा अनेकांची बोली समान झाली तर टाय होतो अशा वेळेस या पेक्षा जास्त रक्कम बोलता येते, पण ही जास्तीची रक्क्म खेळाडूला न मिळता आयपीएलला मिळते. आहे की नाही मज्जा!
सर्वात जास्त जळफळाट झाला तो पाकिस्तानी खेळाडूंचा, कारण त्यांना कोणीच लिलावात विकत घेतले नाही.
आतापर्यंत जे खेळाडू मायभूमीसाठी खेळायचे ते आता कोणत्यातरी पैसेवाल्या मालकासाठी खेळणार. खेळाडूंनी आपले अवमूल्यन तरी किती करून घ्यायचे. पैसा मिळतो पण गुलामाप्रमाणे.
आपण सामान्य माणसे हे खेळ पाहणार पण त्यात देशप्रेमाचा जिवंतपणा असणार आहे काय? यात जाहिरातवाल्यांची चांदी, दुसरे काय?
यापुढे हे लिलाव बंद झाले पाहिजेत. प्रत्येकाने देशासाठी खेळावे. याच लिलाववाल्यांजवळ जर एवढा पैसा असेल तर त्यांनी भावी खेळाडू तयार करण्याकडे लक्ष द्यावे, ज्यायोगे आम्ही ऑलिंपीक मध्ये डोळे लावून पदकांची वाट पाहतो ते स्वप्न तरी साकार होईल.
पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्ट्या खेड्यातील हाल पहायलाच नकोत. ति्थे तर टॅंकरने पाणी आणलेलेही पुरत नाही.
ही टंचाई दूर करण्याचे काम सरकार जरी करत असेल तरी आपलेही काही कर्तव्य आहे की नाही. आपण पाणी कुठे वाया घालवतो त्याचा अभ्यास करण्याची वेळ आली आहे.
आपली उपनिषधे सांगतात, दुसर्याचे काहीही घेऊ नये, कारण ही सृष्टी परमेश्वराच्या मालकीची आहे, आणि आपण आपल्या गरजेइतकाच भाग घ्यावा. कारण ह्या जगातील सर्व सर्वांसाठी आहे आणि ते देवाने सर्वासाठी निर्माण केले आहे. निसर्गाची नासाडी थांबवणे आता आपल्या हातात आहे. जागतिक तापमान वाढीमुळे जगात चिंतेचे वातावरण पसरले आहे, त्या तापमान वाढीला आपण हातभार न लावणेच बरे. नाही का? पाण्यावरच हे सृष्टीचे चक्र फिरत आहे, आपण पाण्याशिवाय पॄथ्वीची कल्पनाही करू शकत नाही. सगळे मोठमोठे देश पाण्यासारखा पैसा खर्च करून परग्रहावर फेर्या मारताहेत, पण फक्त पाणी नाही म्हणून हतबल आहेत. जागतिक तापमान वाढीमुळे लोकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
आपण आपल्या दैनंदिन जीवनातही थोडा विचार करून, योग्य नियोजन करून, पाण्याचा दुरूपयोग टाळू शकतो. पण त्यासाठी काय केले पाहिजे -
पाण्याखाली घागर किंवा कोणतेही भांडे ठेवले तरी ते वाहून जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. खूपजण दात घासताना बेसिनचा नळा उघडाच ठेवतात, त्याचा काय फायदा माहित नाही?. काहीजणांना शॉवरखाली आंघोळ करण्याची भारी हौस असते, अगदी धबधब्याखाली आंघोळीचा आनंद घेतात, पण त्यांच्या लक्षात येत नाही की आपण किती पाणी वाया घालवतो ते. हॉटेलमध्ये ग्लासातील पाणी अर्धवट प्यायल्यानंतर बाकीचे पाणी फेकून देतात, त्यापेक्षा हॉटेल मध्ये छोट्या ग्लासात पाणी दिल्यास वाया जाणार नाही, पण का्ळजी कोण घेतो. खूप ठिकाणी रस्त्यावर पाणी मारतात, त्याचा काय फायदा ते एक तो दुकानदारच जाणो. आम्ही रोज सकाळी जाताना पाहतो स्वारगेटला एका छोट्याशा मंदिरासमोर असा भला मोठा पाईप घेऊन रोज पाणी मारतात, एवढे की पाण्याचे पाट वाहू लागतात, त्याला एकदा मी सांगण्याचा प्रयत्न केला तर त्याने सुनावले, आम्ही तुमच्या घरचे पाणी वापरतो काय? हे तर सरकारचे पाणी आहे. मोठमोठया सोसायटीत टाक्या भरून वाहतात पण एक बॉल कॉक बसविल्यास पाणी वाहणार नाही, थोड्याशा विचाराने, एका बॉलकॉकने आपण किती पाण्याची बचत करू शकतो, हे सांगून पटणार नाही.
खरे तर पाणी वाचविण्यावी मानसिक तयारी जरूरी आहे, प्रबोधन जरूरी आहे. सांडपाण्याचाही पुनः वापर करता आला पाहिजे.
यासाठी कायदा करून काही उपयोग होणार नाही.
एक बातमी, सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निकाल दिला की, स्वसंरक्षणासाठी केलेली हत्या हा खून नव्हे.
त्याचे असे झाले, लुधियानातील दर्शनसिंग यांनी आपल्या काकाची हत्या जमिनीच्या वादातून केली होती. दर्शनसिंगने न्यायालयात सांगितले, त्याचा काका गुरूचरणसिंग याने त्याच्या वडिलांवर शस्त्राने हल्ला केल्यानंतर त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला, म्हणून स्वसंरक्षणासाठी त्याने काकावर गोळी झाडली. असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यावर न्या.दलबीर भंडारी आणि न्या. अशोककुमार गांगुली यांनी नमूद केले की, स्वतःचे रक्षण करण्याचा अधिकार कायद्याने प्रत्येकाला दिला आहे. त्यामुळे आक्रमकपणे हल्ला करणार्याला ठार मारले, तर तो खून होऊ शकत नाही. त्याने जिवावर बेतणार असेल तर, घाबरून पळ काढणे अपेक्षित नाही.
आम्हांला वाटते, जेव्हा एखादा न्याय सुप्रीम कोर्टकडून दिला जातो तेव्हा त्याचे रूपांतर कायद्यात होते, तर त्याचे समाजावर काय दूरगामी परिणाम होतील हे पाहिले जात नाही, असे खेदा्ने नमूद करावे लागते. या निकालाचा भविष्यात गुन्हेगारांकडून गैरफायदा घेण्याची शक्यता अधिक आहे. गुन्हेगार सरळ सरळ खून करतील आणि न्यायालयाला हे पटविण्यचा प्रयत्न करतील, की त्याने तो हल्ला स्वसंरक्षणासाठीच केला होता. कारण त्यावेळेस तेथे कोणीच साक्षीदार असणार नाहीत, मग कोणाचे खरे मानायचे.
जर उद्या एखाद्या नवर्याने पत्नीचा खून केला आणि त्याने कांगावा केला की, पत्नी माझ्यावर हल्ला करत होती म्हणून मी स्वसंरक्षाणासाठी खून केला, तर काय? आणि पत्नीने पतीचा अशाप्रकारे खून केला तर? अशा गोष्टी सिद्ध करायला वकीलांना काय वेळ लागतो. नायमूर्तींनी पुढे म्हटले आहे की, स्वसंरक्षाणाच्या अधिकाराचा वापर बदला घेण्यासाठी केला जाणार नाही, या साठी परिस्थितीजन्य पुराव्यांची नोंद घेणे आवश्यक आहे. पण हे समाजातील सर्व स्तरावर शक्य आहे काय? परिस्थितीजन्य पुरावा निर्माणसुद्धा केला जाऊ शकतो त्याचे काय?
एकंदरीत भारतात न्याय? पैसेवाल्यांचे काम, दंडेलशाहीचे काम.
ही बातमी आहे, दैनिक ’सकाळ’ मधील भारतीयांवरील, ऑस्ट्रेलियातील हल्ल्यांसंदर्भात.
व्हिक्टोरिया शहरातील टॅक्सीचालक सतीश थत्तीपामुला (वय 24) याला पॉल जॉन ब्रॉगडेन (वय 48) याने दारूच्या नशेत वर्णद्वेषातून शिवीगाळ करत मारहाण करत, त्याच्या टॅक्सीचीही मोडतोड केली. पोलिसांनी आज सकाळी त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयात ब्रॉगडेनचे वकील फिलिप लॅंच यांनी सांगितले, की ब्रॉगडेन याने भरपूर मद्यप्राशन केल्यामुळे काल रात्री काय झाले, हे त्याला आठवत नाही. न्यायालयात सांगितलेल्या घटनाक्रमानुसार ब्रॉगडेनने एका पार्टीत भरपूर मद्यप्राशन केल्यानंतर बुधवारी रात्री स्थानिक वेळेनुसार सुमारे दोन वाजता एक टॅक्सी भाड्याने घेतली. त्याने पार्टीत अमली गोळ्याही खाल्ल्या होत्या. टॅक्सीतील इतर प्रवासी जेव्हा त्याला शिवीगाळ करू लागले तेव्हा भारतीय चालकाने त्याची टॅक्सी तत्काळ एका सर्व्हिस स्टेशनमध्ये नेली. तेथे ब्रॉगडेनने चालकास मारहाण केली.
ब्रॉगडेनला मद्यसेवनप्रकरणी यापूर्वी शिक्षा झाल्याचे सरकार पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. या प्रकरणी न्यायाधीश मिचेल हॉगसन यांनी निर्णय देत ब्रॉगडेनला तीन महिन्यांची शिक्षा सुनावली. समाजात मद्यप्राशन करून हिंसाचार करण्याची वृत्ती वाढीस लागणे, ही बाब चिंताजनक आहे. वर्णद्वेषातून हल्ले करणे, हा प्रकार कधीही खपवून घेतला जाणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
कल्पना करा असा प्रकार आपल्या भारतात घडला असता तर? तो हल्लेखोर उजळ माथ्याने फिरून शिवाय गुन्हा नाकारून, मोठा वकील देऊन मोकळा झाला असता. मग तारखांवर तारखा. तो खटला उभारण्यासच दोन चार वर्षे गेली असती. त्यात कितीतरी साक्षीदार तपासले गेले असते. शेवटी न्याय मिळण्याची आशा धूसर होते, आणि लोक ही घटना विसरून जातात.
पहा ऑस्ट्रेलियातील न्यायालयाने पोलीसांचे म्हणणे ग्राह्य धरून आरोपीला शिक्षा सुनावली. ऑस्ट्रेलियात जर चुकूनही चुकीचे पार्किंग झाले तर पोलीस गाडीवर दंडाची पावती लावून जातो, बस त्या माणसाने दंड भरायचाच. कोणत्याही सबबी चालत नाहीत. आणि तो पोलीसही ऐकत नाही. लाच हा प्रकार तर नाहीच. कोठेही दलाल नाहीत, बस आपले काम आपणच करायचे. आणि ते काम सरकारी कर्मचारी इमानदारीने करतो.
इथे तर म्हणे न्यायालयातही आर्थिक व्यवहार चालतात, आणि ते आर्थिक व्यवहार करणारेही दलाल असतात. कसा लोकांना न्याय मिळणार?
खटले वर्षानुवर्षे चालत राहतात, आजोबाची केस नंतर नातू चालवतो, त्याला सुद्धा न्याय मिळण्याची खात्री नसते.
२६-११ च्या हल्ल्यातील कसाबची केस कशी मस्त चाललीय. त्याने केलेल्या गुन्ह्याचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत, T.V. वर आख्ख्या जगाने पाहिलेय, एवढा पुरावा न्यायालयाला पुरेसा नाही काय? त्या कसाबचे लाड पुरवत, जणू तो आपला पाहुणाच आहे आणि त्याच्यावर अन्याय होतो आहे, अशा थाटात खटला चाललाय. त्याला काळजीच नाही, जरी फाशीची शिक्षा झाली तरी तरी आधीची फाशीची शिक्षा झालेले आरोपी नंबरात आहेत ना. तेव्हा याचा नंबर लागेल तोपर्यंत आख्खे आयुष्य निघून जाईल, हे त्याला चांगले माहीत आहे. शिवाय आत आरामच आराम, रोज मेजवानी.
आता आपल्याकडील कायदे आणि न्यायदानाच्या पद्धती बद्लायला पाहिजेत. टाईम लिमीट पाहिजे. त्यासाठी न्यायालयांचे कामकाज दोन पाळ्यांमध्ये चालले पाहिजे हे आम्ही मागेच या ब्लॉग मधून लिहीले होते. आताच्या कामकाजाच्या वेळा आणि कामकाजाची पद्धत पाहिल्यास अडाणी माणसालाही कळेल की न्याय उशीरा का मिळतो ते.
आता आपल्याला काहीतरी केले पाहिजे.
दूरदर्शनवर बातम्यांचे चॅनेल आहेत, त्यांच्याकडून अपेक्षा असते, त्यांनी बातम्या वेळेवर आणि योग्य दाखवाव्यात, पण तसे होत नाही, त्यांना काय आणि केव्हा दाखवायचे याचे भान नसते.
आम्ही कंकणाकृती ग्रहण पाहण्यास कन्याकुमारीला जाऊ शकलो नाही म्हणून बातम्यांच्या वाहिन्या पहात होतो, वाटले हे चॅनेल वाले Live दाखवतील आणि आपण कंकणाकृती ग्रहण पाहू शकू, घरात बसल्या बसल्या. पण कसले काय? ते लोक फार हुशार ना. त्यांनी काय दाखवले माहित आहे?
सर्वात जास्त विनोद केला Star News वाल्यांनी. त्यांनी बोलावले होते काही तर्कशास्त्री, वैज्ञानिक आणि ज्योतिषांना, ग्रहणावर चर्चा करण्यासाठी. चर्चा कसली नुसते भांडण. प्रत्येकजण आपली बाजू कशी बरोबर ते ओरडून सांगत होता, अगदी दुसर्याच्या हातातील माईक ओढून. सगळे अति शहाणे ना? त्यांना हे भानच नव्हते की ते ज्या विषयावर भांडत आहेत, ते ग्रहण मात्र प्रेक्षकांना दाखवले जात नाही. एवढ्या वर्षानंतर जर अशी संधी येत असेल तर चॅनेलवाल्यांनी फक्त ग्रहण नको दाखवायला? त्य मंडळींना एवढी सधी गोष्ट कळत नव्हती की, एका वेळेस एकानेव बोलायचे असते. ते जे काही बोलत ( भांडत ) होते त्यातील एक अक्षरही समजत नव्हते. झोपडपट्टीतील नळावर बायका भांडतात ना अगदी तसे. चॅनेलवाली मंडळी शांतपणे पहात होती, त्यांना एवढेही कळत नव्हते की, आपल्याच चॅनेलचे नाव खराब होत आहे.
आजतक चॅनेलवर ग्रहणाची दृष्ये दाखवत होते, पण जेव्हा कंकणाकृती ग्रहण अवस्था आली त्यावेळी नेमक्या जाहिराती दाखवल्या, कंकणाकृती अवस्था संपली आणि त्यांच्या जाहिरातीही संपल्या. आहे की नाही मज्जा.
NDTV, Doordarshan News यांनी वेगळीच कमाल केली, कन्याकुमारीला होत असलेले कंकणाकृती ग्रहण दाखवायचे सोडून, बाकी ठिकाणांचीच ग्रहणे दाखवत होते.
बातम्यांच्या चॅनेलवाल्यांना खरंच एवढे सुद्धां ज्ञान नसावे, की प्रेक्षकांना काय पाहिजे आहे? आणि आपण काय दाखवत आहोत. हे सर्व जण जे ज्ञानी लोक तारे तोडत होते, ही सर्व माहिती ग्रहणानंतर सुद्धा सांगता आली असती ना?
मागील दोन भागात आपण अभ्यास कसा करावा हे पाहिले, आता पाहू यात, शेवटच्या दीड महिन्यात, काय काळजी घ्यावी.
ज्यांची सकाळची शाळा असते, त्यांना साधारणपणे दुपारची झोपायची संवय असते, मग तीच संवय पेपराच्या वेळेस हानीकारक ठरते, मग तिथे पण झोप येते. तेव्हा आता शाळा कमी असते, तेव्हा दुपारची झोप घेण्याचे टाळा. जर अकरा ते तीन यावेळेत जेवण्याची संवय असेल तर, ती बदला नाहीतर परिक्षेच्या वेळेत भूक लागते.
आताचा शेवटच्या दीड महिन्यातील अभ्यास म्हणजे शेवटचा हात फिरवल्या सारखे आहे. पुन्हापुन्हा तोच तोच विषय घेता येणार नाही. गाळलेल्या जागा भरा, एका वाक्यात उत्तरे द्या, जोड्या लावा अशा छोट्याछोट्या प्रश्नांची उत्तरे पाठ करा. म्हणजे ते मार्क हातचे होतात. गणितात अधिक, ऊणे च्या चिन्हात गोंधळ होतो, आणि चिन्हे चुकतात मग सगळे गणितच चुकते, मार्क तर नाहीतच, पण वेळही वाया जातो, कारण प्रत्येक मिनीट महत्वाचा आहे. परिक्षेत प्रश्न नीट वाचा, समजावून घ्या, काय लिहायचे ते नीट ठरवा, नाहीतर निम्मे उत्तर झाल्यावर लक्षात येते आणि वेळ गेलेला असतो. निबंधात मुले नेहमी गोंधळ करतात, विषय ठरवत नाहीत, मग दहाएक ओळी लिहील्यावर लक्षात येतच नाही, काय लिहावे पुढे. मग एक प्रकारची भिती वाटायला लागते. असे करू नका. आतापासूनच ठरवा की आपल्याला निबंधाचा काय विषय घ्यायचा त्याचाच अभ्यास करा.
आता फक्त वाचन आणि मनन करण्याची वेळ आहे. लिखाणे कमीतकमी करा. मात्र जर असे वाटत असेल की, एखाद्या विषयाला वेळ पुरणार नाही तर प्रत्येक विषयाचा एकेक पेपर वेळ लावून सोडवा, पण विकल्पाचा विचार न करता, सर्व प्रश्न सुटले पाहिजेत, म्हणजे परिक्षेत सर्व प्रश्न सोडवायला वेळ पुरतो. लक्षात घ्या भाषा, इतिहास, भूगोल या विषयांना वेळ पुरत नाही. कारण गणित एकतर येते किंवा नाही, तिसरा पर्याय नाही. कारण सविस्तर उत्तर नसते. तेव्हा शक्यतो याच विषयांचे पेपर सोडवायचा सराव करा.
बाकी नंतर परिक्षेच्या आठ दिवस आधी पाहू की, परिक्षेच्या दरवाजात काय करावे, याचा विचार करू यात.
पळण्याच्या शर्यतीत भाग घेणारा खेळाडू ज्याप्रमाणे, शेवटच्या टप्प्यात जास्तीचा ठेवणीतला जोर लावतो आणि शर्यत जिंकतो तसा आपल्याला अभ्यासाला जोर लावायचा आहे आणि दहावीची शर्यत जिंकायची आहे
बिलकुल काळजी करू नका, काळजी करण्याचा वेळ अभ्यासाला द्या, मग बघा कसे फ्रेश वाटते.
बाकी परिक्षेच्या आधी आठ दिवस सूचना आणि पंधरा दिवस आधी अपेक्षित गणिताचा आणि इंग्रजीचा पेपर, सरावासाठी आणि मूल्यमापनासाठी.
काल दहावीचा अभ्यास करताना वेळेचे नियोजन कसे करावे ते आपण पाहिले. दहावी ही महत्वाची आहेच पण त्यासाठी टेन्शन घेऊ नका. शांतपणे अभ्यास केला तर सर्व सुरळीत होईल. एवढा अभ्यास कसा होईल? मला हे सर्व जमेल का? दिवस थोडेच राहिलेत, मग आता मी कसा अभ्यास करू? ह्या सर्व काळज्या आता सोडा. कारण काळजी करण्याची वेळ गेली आहे. उरलेल्या वेळेचा उपयोग करून घ्या. एकेक विषय पूर्ण करा. जसजसा अभ्यास पुढे जाईल तसतसी काळजी कमी होत जाईल. अवघड विषय कुठला आहे, त्याचा अभ्यास पहिल्यांदा करा. सोपा विषय वेळेवर सुद्धा करता येतो, कारण तो सहज पार होतो. किती सोपं असतं पहा. गणित जमत नाही ना? काल आम्ही सांगितल्या प्रमाणे गणिताचा अभ्यास करा, म्हणजे पाचही प्रश्नपत्रिकेतील पहिला प्रश्न सोडवायचा, जर तो बरोबर झाला तर झाले ना १० मार्क. आठ प्रमेय पाठ करा, दोन परिक्षेला येतात, झाले ना आठ मार्क. त्याचप्रमाणे क्षेत्रफळ, घनफळाची फक्त सूत्रे पाठ करा, बघा कशी गणिते फटाफट सुटतात, याचे सहा मार्क मिळतात, मग झाले ना २४ मार्क. कशाला पाहिजे बाकी काय? अशा प्रकारे प्रश्न आणि मार्क निश्चित करा, आणि त्याच प्रमाणे अभ्यास करा, सर्व सोपे होऊन जाईल.
जिथे पुस्तके, वह्या ठेवता त्याठिकाणी नीट मांडणी करा. एका विषयाचे पुस्तक, त्याचे गाईड (असेल तर), वह्या, पुस्तिका वगैरे एकच ठिकाणी ठेवा म्हणजे त्या विषयाचा अभ्यास करताना सर्व साहित्य एकाच वेळेस मिळेल, शोधायला वेळ जाणार नाही. आणि अभ्यास झाल्यावर ते सर्व साहित्य जागेवर ठेवल्याशिवाय दुसर्या विषयाला हात घालायचा नाही. एकापेक्षा जास्त मित्रांना सोबत घेऊन अभ्यासाला बसायचे नाही, त्याने मतांतरे होतात आणि अभ्यास होत नाही. शिवाय मित्रांची संवय होते आणि एकादा मित्र जर आला नाही तर अभ्यासाला मूड येत नाही. शिवाय गोंधळ जास्त होतो. सर्वात उत्तम आपण एकट्यानेच अभ्यास करणे. कारण आपणच आपले गुरू असतो.
आता पासूनच आहार हलका ठेवा.पचायला जड आहार नको. कारण आजारपण आल्यास नुकसान होईल. पोट सांभाळा. जागरण करू नका, त्याने पोट बिघडते मग सगळे वेळापत्रकच बिघडते. चिडचिड करू नका. आणि महत्वाचे वेळेवर आहार घ्या. अजिबात उन्हात फिरू नका.
बाकी उद्या.
Popular Posts
-
आत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...
-
************CLARIFICATION******************* बरेच विरोप आल्याने मला हे स्पष्ट करावेसे वाटत आहे की.... मी लिहिल्याप्रमाणे, मी चोराची बाजु अज...
-
१२ जुलै १९६१, आम्ही ११ वर्षांचे होतो, त्या वेळेची आठवण ठेऊन ’सकाळ’ने आठवणी जाग्या केल्या त्याबद्दल धन्यवाद. खरोखर त्या भयानक पुरापेक्षाही,...
-
पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...
-
नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी...
-
विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...
-
कोणत्यातरी कामासाठी मी बायकोला घेऊन मोटरसायकलने बाहेरगावी गेलो होतो. परतायला रात्र झाली, पण सकाळी तातडीचे काम असल्यामुळे घाईने निघालो. मध्ये...
-
मानवाच्या मूलभूत गरजा काय तर अन्न, वस्त्र, आणि निवारा. निवार्यासाठी माणूस घर बांधु लागला. त्या घराने त्याला सुख, शांती, समाधान मिळते. दिवस ...
-
मुस्लीम समाजाने पावसासाठी केलेली प्रार्थना हे अल्लाह, आमच्या हातून गुन्हे घडल्यामुळे तू पाऊस रोखून धरला आहे, याची आम्हाला जाण आहे. आमच्या ...
-
Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock...